Wednesday, February 26, 2014

" अवकाळी पाऊस "

" अवकाळी पाऊस " 



यौवन बहरात  होते 

भ्रमर हि पिंगा घालीत होते 

नव कोंबाना  , नव्या कळ्यांना 

नवी स्वप्ने खुणावत होते 


झुळूक ती हवेची . . . 

प्रीती खुलवीत होती 

बेधुंद आणि बेभान 

जगणे हे झाले होते 


अशातच आला " अवकाळी " 

होत्याचे नव्हते  करुनी गेला 

 स्वप्नांच्या त्या कळ्या , फुलांचा 

खच चोहीकडे पसरला 


स्वप्ने देठातूनच  उखडली 

खाली धरती , वर नभे हि आसुसलेली 

१० : ११ . . . . . . .  २ ७ / ० २ / २ ० १ ४ . . . . .  . गुरुवार ( महाशिवरात्री ) 

No comments:

Post a Comment