मी कविता करतो , पण " कविता " मला आवडत नाहीत
आपली कविता स्वच्छंदी आहे , ती छंदातील नाही . .
ती वळणा वळणाने जाणारी आहे , सरधोपट नाही
त्यातले मला काही कळत नाही , कळून सुद्धा घ्यायचे नाही . . .
छापायच्याच नाहीत , कुणाला ऐकावायाच्याच नाहीत , त्यामुळे काही घोर नाही
कविवर्यांच्या लोक चार हात दूर असतात याची मला जाण आहे . .
जिथे ऐकणारा कान दिसतो , तिथे यांचे वाचन सुरु होते . . . .
मी २५ वर्षापूर्वी अशीच एकाला , कविता शिकवली . . .
त्याने मला " गुरु " मानलं , मलाच कविता ऐकवू लागला . .
मी तिथेच राहिलो , तो कविता संमेलन गाजवू लागला . . .
आता तो मला हैराण करू लागला , नुसत्या कविता वाचून दाखवू लागला . . .
माझी मुसिबत वाढली , त्याच्या वह्या वाढू लागल्या . . .
कुठलीही कविता वाचणे , हि घोर शिक्षा वाटू लागली . . .
त्यानेही ते ओळखले , त्यानेही त्याचा गुरु बदलला . . .
आम्हीही " कवितेचा " नाद कायमचा सोडला . . .
७ : ५९ pm - - - - - - ६ /९/ २०१४ - - - - -- सोमवार
No comments:
Post a Comment