Sunday, January 19, 2014

जीवन कि शतरंज वही रहेगी ....( और ) बाजी लगायी जायेगी ...

अंदाज अपना अपना , खुशिया अपनी अपनी

हकीकत अपनी अपनी , नजरिया अपना अपना

चाहत अपनी अपनी , मजबुरीया अपनी अपनी

नशीब अपना अपना , रास्ते अपने अपने

कल तक " वो " था ...आज दिखाई नही दे रहा है ...

आज " ये  " है ..अपने नाम का ढोल बजा रहा है ...

कल कोई और होगा ....नयी शोहरत , नये अरमान लिये

परसो , नरसो , तरसो ...कोई और दाव पे लगेगा ....

जीवन कि शतरंज वही रहेगी ....( और ) बाजी लगायी जायेगी ...

फेसबुक वरील प्रेम विरानो ,.....प्रेमात रक्त व रक्तपात चांगला नाहीं

फेसबुक वरील प्रेम विरानो ,.....प्रेमात रक्त व रक्तपात चांगला नाहीं ....प्रेमात शेवटच्या टोकाचा विचार करणे योग्य नाहीं ...मला हे कुणाला तरी सांगायचे आहे , परंतु " तसे " सांगू शकत नाहीं म्हणून " असे " सांगत आहे ...जबाबदारीने वागायची शिकवण दुसर्यांना देणे सोपे आहे ,परंतु आपण कसे वागत आहोत हे पाहणे हि महत्वाचे आहे ... आपल्या मागे आपली छोटी भावंडे असतील , आमच्या सारखे काही मंडळी बोलत नाहीत पण लक्ष्य ठेवून असतात ...चरित्र जपा बंधू हो , अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे ...नको तिथे आपली उर्जा का वाया घालवत आहात ....हल्ली मी एक डायलॉग वारंवार वापरत आहे .....तो इथे हि वापरतो .....दोस्ती , प्रेम - संबंध व नाते -संबंध हे आपल्या बरोबरीच्या लोकांशीच करावा ....जास्त त्रास , मनस्ताप व मानहानी होत नाहीं ......

आपल्या कडून आपल्या लहान्यानी काय आदर्श घ्यायचा व मोठ्यांना काय वाटत असेल ह्याचा जरूर विचार करावा ...आशा आहे माझे हे बोलणे संबंदिता पर्यंत पोहचेल ....बाकी मंडळीनी कृपया relax राहावे ...

सुविचार

सुविचार 


जिथे आपल्या सावलीचाही भरवसा नाहीं तिथे कुठल्याही नात्याचा , 

मैत्रीचा काय टिकाव लागणार आहे ? सावली पहा कशी आपल्याशी

 एकरूप झाल्या सारखी वाटते परंतु ती असते सूर्याबरोबर ....सूर्य 

मावळतीला जायला लागला कि सावली हि हळूहळू लुप्त होवून जाते ....


नाती , मैत्री व विश्वास जो पर्यंत आहेत तो पर्यंत तो पर्यंत टिकवण्याचा


 प्रयत्न असावा ...बालपणीचे मित्र शालेय जीवनात नसतात .....शालेय 

जीवनातील मित्र कोलेज च्या जीवनात नसतात .....कोलेजच्या 

जीवनातील मित्र नोकरी / धंद्यातील जीवनात नसतात ....नोकरी 

धंद्यातील मित्र म्हातारपणात नसतात ...

माणसाने कसे प्रवाह बरोबर वाहावे ...ओंजळीत येईल तेवढ्याच 


पाण्याला आपले म्हणावे .....

वडार समाजातील लग्न - कार्यात म्हणत असलेले लोकगीत




वडार समाजातील लग्न - कार्यात म्हणत असलेले लोकगीत 

काल आई गावा वरून आली आहे ..देवाक काढतात ते गाणे , गंधाच्या वेळेचे गाणे , आहेर घ्यायच्या वेळेचे गाणे तिच्याकडून लिहून घेतले ...आज हि काही लिहून घेणार आहे ...जुना ठेवा , पूर्वी जरी त्याबद्दल एवढे प्रेम नसायचे तरी आता शब्दामध्ये गोडवा व जिव्हाळा जाणवतो आहे ...आई कडून बरीचशी माहिती मिळवली आहे ...विशेषत: वाड-वडील , आजोबा - पणजोबा पासून , सोयरे -सोयरे कुठे कुठे आहेत त्या बद्दल हि ....त्यांची आता नामावलीच करायची ठरवली आहे ...ती पुढील पिढीला खूप उपयुक्त अशी ठरणार आहे .....आमच्या कुसाळकर कुटुंबीय व त्यांची वंशावळ ( सग्या -सोयर्या सहित ) ह्यावर मी एक पुस्तिकाच काढणार आहे ....त्याचा माझ्या पाहुणे - रावल्याना नक्कीच भविष्यात उपयोग होईल ...असो ..

आपल्यात लग्नाच्या वेळी देवाक काढताना म्हणतात ते गाणे ....पण आणि सुपारी ह्यांची एकेक ने संख्या वाढवायची आहे त्याच शब्दांची लांबट लावत बसायचे ....परंतु हे सुरात नीट पणे ऐकले कि खूप छान वाटते ..शब्दांचा गोडवा व त्यांची लय साधली कि ऐकणारही त्यात तल्लीन होवून जातो ...साधे - सोपे शब्द , बिन -वाद्याचा ठेका , लांबवलेला सूर ...एकदम मस्तच ...

......लग्नाच्या वेळी देवाक काढताना म्हणतात ते गाणे .....

रोन्डू आकाल , रोन्डू फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकर अण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकर अण्णा ...| | धृ | |

मुडू आकाल , मुडू फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...| | १ | |

नालग आकाल , नालग फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...| | २ | |

आईद आकाल , आईद फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...| | 3 | |

आर आकाल , आर फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...| | 4 | |

योड आकाल , योड फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...| | ५ | |

येन्मिद आकाल , येन्मिद फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...| | 6 | |

तोमिद आकाल , तोमिद फोकाल... उप्पे गंगम्मा , निम्मे सेसा ....

निम सेसा निमगिरी , तुंबी कडवा ....तुम्बी कडवा आईराले ...

गंगाक वाराम येवार येशिरी ?....गंगाक वाराम येवार येशीर ?

गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...गंगाक वाराम येशीर शंकरअण्णा ...| | 7 | |

Saturday, January 18, 2014

प्रिय आमुचा एक इंडिया .....महान देश हा




August 3, 2012 


प्रिय आमुचा एक इंडिया .....महान देश हा

भारत देशाला जर खरोखरेच " महान " देश बनायचे असेल तर प्रथम हे चित्र बदलायला हवे ....नाहीतर इंडिया सुपर power होईल ह्यात काही शंका नाहीं परंतु ...भारत हा नेहमी ...एकवीस (२१) कलमीच राहील ....( एकवीस कलमी गरिबी हटाव कार्यक्रम ...फक्त पानावर )

ऐश्वर्या राय बच्चन च्या बाळाच्या डायपर चा खर्च हा ,,वरील चित्रातील आईच्या संपूर्ण दिवसातील रोजंदारीच्या पेक्षाही जास्तअसावा ... आमची हि फक्त शंकाच आहे ..त्या व्यतिरिक्त त्या बद्दल आम्हाला काही म्हणायचे सुद्धा नाहीं ....परंतु जगण्यातला हा किती मोठा विरोधाभास आहे ...काही जण करोडोत खेळतात , लोळतात तर काहीना कोथिंबिरीच्या जुडीसाठी विचार करावा लागतो ..... ज्यांचे रोजचे जगणेच रोज काम करून मिळणाऱ्या मोबदल्या वर असेल तर ..त्यांच्या मुलांनी शिकायचे तरी कसे ?...त्या बदल्यात त्यांना थोडे " आरक्षण " दिले ..थोडे " अनुदान " दिले तर बिघडले कुठे ?...नाहीतरी आपण सरकारी , राजकारणी ..खाऊ - गधडे " पांढरे -हत्ती " पाळले आहेतच ...आपल्या देशात " दलाल " ह्या जातीची हि कमतरता नाहीं ....हे दलाल सर्वच क्षेत्रात व्यापून आहेत ...कष्ट नको , गुंतवणूक नको ...नुसते टाळू वरील लोणी हाणायचे .....

...आता ह्या चित्रातील आई ने व बाळाच्या बापाने सुद्धा ..थोडे मनावर घेवून ..व्यसना पासून दूर राहिले पाहिजे..नुसतीच रोज " काळी पिशवी " व दारू - गुटाक्याची संगत सोडली पाहिजे ...आळस झटकला पाहिजे ...दोन दिवस कामावर व तीन दिवस बायकोच्या पुढे बसने सोडले पाहिजे ...देव-देव , अंधश्रद्धा , नको त्या ठिकाणी खर्च , जुगार , शर्यत लावणे ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत ....गरिबीला शाप न समझता चार पैसे सोबत बाळगून श्रीमंतीच्या वाटेवरची पावुले चढायला सुरु केले पाहिजे ..." असतील शिते ..तर जमतील भुते " हा जगाचा व जगण्याचाही मुलभूत नियमच आहे ...

वैभव , संपत्ती , नाव लौकिक , हे हि काही उगीच येत नसतात ..त्या हि पाठीमागे प्रत्येकाची त्याग व तपश्चर्या असतेच ...उगीच कुणाला उठ-सुठ नाव ठेवणे हि योग्य नाहीं ...असो.
 

बाप्पा हनुमंता , बजरंगा , मारुती राया ....आम्हा सर्व वडार बांधवा वर कृपा दृष्टी ठेव ...




जय बजरंग ....जय वडार

बाप्पा हनुमंता , बजरंगा , मारुती राया ....आम्हा सर्व वडार बांधवा वर कृपा दृष्टी ठेव ...


आम्हाला सदैव कार्यरत ठेव ...आम्हा सर्व वडार बांधवा मध्ये मैत्रीचे नाते दृढ होऊ दे ...

आमच्या भावंडा मध्ये कुणीही हीन-दिन राहू नये....

कुणी शिकून खूप मोठा झाला किंवा अचानक " धनलाभ " होवून धनवान झाला तरी ....

वडार बांधव व वडार समाजा प्रती त्यांची नाळ जोडलेली राहू दे.....

बाप्पा , आम्हाला आधुनिक दृष्टीकोन दे , आमचा हि " इतिहास " सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा .....


अशी बुद्धिमान वडार बांधव आमच्या समाजात निर्माण होऊ दे ...

प्रत्येक जन संघटनेशी जोडला जावो व प्रत्येकाचा उत्कर्ष होवो ...

जय बजरंग ....जय वडार 

गोमातेची कत्तल - खाण्यात चाललेली कत्तल ह्याचा निषेधच परंतु गो -बळी चे काय ?





गोमातेची कत्तल - खाण्यात चाललेली कत्तल ह्याचा निषेधच परंतु गो -बळी चे काय ? 


August 8, 2012 


गाय ह्या आशराप ( गरीब ) प्राण्याला " गोमाता " असे म्हणतात  ...तिच्या मध्ये ३६ कोटी देवांचे वास्तव्य असते असे आपल्याला लहानपणा पासून बिंबवण्यात आले आहे ....एवढेच नाहीं तर गायीला " कामधेनु " असे हि म्हटले गेले आहे ...आणि तशी ती आहे ह्यात वादच नाहीं ...

परंतु काही धर्म-पंडित ह्याचे राजकारण करत आहेत किंवा स्वताच्या फायद्यासाठी हा मुद्धा राहून राहून उकरून काढत आहेत ....रक्ताळलेले , अति भीषण असे दृश्य facebook व अन्य माध्यमावर लोड करत आहेत ..हि चित्रे पाहून कुठल्याही संवेदनशील माणसाला गरगरून आल्या शिवाय राहणार नाहीं ...व ह्यातून असा एक समज निर्माण होत आहे कि गाय ( अथवा बैल ) ह्यांची सर्रास अशी कत्तल आपल्या देशात सुरु आहे ...



गाईची कत्तल हि आम्हाला कधीही निषेधार्ह आहे ..व तिची कत्तल होऊ नये ह्या मताचे आम्हीही आहोत ....परंतु काही लोकांचा ढोंगीपणा आम्हाला सलत आहे ...तेच तुमच्यापुढे विचार करण्यासाठी मांडतोय ...कारण का तर आपण हि सर्व ह्या गोष्टीशी ह्या ना त्या कारणाने जुडले जात असतो ...

(१) जे लोक गाईला गोमाता , कामधेनु , व देव स्वरूप मानतात तिचे दर्शन घेतात ...त्या गायीला ते लोक स्वताच्या घरी कधी पळताना दिसत नाहीत ...( १/२ % अपवाद वगळता )


(२) जो शोर - शराब चाललेला असतो ...तो फक्त शहरातूनच ....


(३) हे सर्व शेतकऱ्यांनी व इतर जातीतल्या लोकांनी करावे .अशी समजूत काही ढोंगी , लबाड ,हरामी लोकांची असते ...


(४) प्रत्यक्षात ज्यांच्या कडे गायी आहेत ..त्यांचे दुखणे हे लोक कधी लक्षात घेतच नाहीत


(५) हा मुद्दा खुप महत्वाचा आहे ...


....काही ठराविक जाती - जाती मध्ये सामाजिक असंतोष व दंगल -सदृश्य परिस्थिती नेहमी कशी राहील ....ह्यासाठी ह्यांचे चर्वित -चर्वण सतत चालू असते ..व हे आवर्जून सांगायला हवे कि ..हे एकूणच समाजासाठी व देशासाठीही हितकारक नाहीं ..

मुद्दे अजूनही आहेत ...माझी गायींच्या कत्तलीला विरोध आहेच परंतु माझी अशी भाबडी धारणा आहे कि ....



काही ठराविक लोकच अशी मागणी करतात त्यांनी आपापल्या घरी गायी पाळणे सुरु करावे व ३६ कोटी देव आपल्या घरी आणून आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्याव्यात ..असो .

ताजा कलम .....माझ्या घरी गाय नाहीं व मला म्हशिचेही दुध चालते .....