Sunday, February 9, 2014

तुम अगर , तुम्हारी जगह बेमिसाल हो ..... तो हम भी एक मिसाल है




तुम्हारा गुस्सा जायज है
हमारा मझाक नाजायज
तूम्हारा सोचना नाजायज है
हमारा हसना जायज

हमारी सादगी अजीब है
तुम्हारी चलाखी बेहतरीन
तुम अगर ..तुम्हारी जगह बेमिसाल हो
तो हम भी एक मिसाल है

वक़्त अगर तुम्हारे साथ था
लो अब ....हमारी भी बारी आ  गयी
पिछले 15+  साल तुम्हारे थे
तो गिनना शुरू कर...
अगले 15 +  साल  मेरे  होंगे 

मै  तुझसे  मिलूँगा  नहीं  
ना  ही  तुझे  देखूंगा 
हर दम तुझे याद आवूंगा
और ना ही तेरे सोच से जाऊंगा

मुझे कुछ करना नहीं ......ना ही कुछ करूँगा
" अमर " हूँ ......"अमर -आत्मा " बनके रहूँगा

              3 : 00 ...........30/03/2011................................बुधवार

Saturday, February 8, 2014



आज राज ठाकरे यांची पुण्यात सभा आहे …. 

मनसे " जातीचे राजकारण " करत नाही असे ऐकून आहे परंतु गरिबीला जात नसते व महाराष्ट्रात वडार समाज बांधवावर आता पर्यंत खूप अन्याय झाला आहे . 

हाताच्या बोटावर मोजता येतील अशा तुरळक व्यक्तींना सोडले तर बहुतांश वडार समाज हा बेघर व बेरोजगार व त्यामुळेच अडाणी , व्यसनी व त्या अनुषंगाने अंधश्रध व अज्ञानी राहिलेल्या आहे . आज राज ठाकरे जी जीवनशैली जगत आहेत व आमचा वडार समाज जी जीवनशैली जगत आहेत यात दिवस - रात्रीचा फरक आहे . 

आज वडार समाजाचे कित्येक तरुण राज ठाकरे यांच्या शब्दाखातर हातात दगड घेवून काहीही करायला आघाडीवर असतात . 

राज ठाकरे यांच्याकडून खरे तर सुरुवातीच्या काळात खूपच अपेक्षा होत्या , त्यांनी महाराष्ट्र सुता सारखा सरळ करण्याची भाषा केली होती . उद्धव ठाकरे जेंव्हा शिवसेनेत नव्हते तेंव्हा पासून राज ठाकरे यांना आम्ही पहात  , ऐकत आलो होतो त्यामुळे आमचे नैसर्गिक समर्थन हि त्यांनाच होते व आमचे शिवसेने वरील निस्सीम प्रेम नेतृत्व परिवर्तन झाल्यानंतर , पुत्र प्रेम आडवे आल्यानंतर कायमचे संपुष्टात आले . ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच घराणेशाहीवर कडाडून आसूड  ओढले , पवार व नेहरू , गांधी कुटुंबावर घणाघाती ताशेरे ओढले व आम्ही ठाकरे वाक्य प्रमाण असे समजत होतो त्याला नेहमीसाठी तडा गेला होता . राज ठाकरे यांच्यावर झालेला अन्याय मनात कुठेतरी जाणवत होता . 

राज ठाकरे यांच्या त्याच प्रेमापोटी आमचा काहीही संबंध नसताना त्यांचा उमेदवार पडणार हे माहित असून हि आम्ही मनसे ला मतदान केले होते . एक संधी दिली होती . 

परंतु वाघ जसा एकदा शिकार केल्यानंतर गुहेत जावून बसतो व परत कधीतरी येवून त्याला भुकेची आठवण झाली कि आरोळी ठोकतो तशी परिस्थिती आज मनसे ची झाली आहे . " खळ - खाट्यक  " व वर्षातून अथवा सहा महिन्यांनी एखादी जाहीर सभा घ्यायची व वातावरण तयार करायचे हेच मनसेचे काम करायचे सूत्र झाले आहे कि काय कळत  नाही . 

टोल  बंद करण्यासाठी आंदोलन , हे काय काम झाले ? सरकारने तसे धोरण बनवून चांगल्या पद्धतीचे रस्ते जनते साठी तयार केलेले आहेत . त्यात काही गुंडाड  लोक घुसले आहेत हे खरे आहे परंतु setting  चा हा खेळ महाराष्ट्राच्या जनतेला चांगला कळतो आहे . 

मनसेची ताकत  हि बहुत करून शहरात आहे व काहीतरी गडबडी करून ती प्रसिद्धीच्या झोतात नेहमी राहण्याचा प्रयत्न करत असतात . तसे पहिले गेले तर मनसे हि पूर्णत " event manage " करून उभी राहिलेला पक्ष आहे . त्यांचे event  manage  होणे जेंव्हा संपेल तेंव्हा पक्षाची अवस्था खूप अवघड असेल वाटते आहे . 

मनसे ने सर्व सामन्यांच्या भावनांना हात घातला हे सत्य आहे , आम्हीही त्या भावनेला बळी पडलेलो एक होतो . परंतु ती भावना  मनसेला माणसे  जोडून ठेवण्यात जमलेले नाही हे मी माझ्यावरून ठाम पने सांगू शकतो .गेल्या ३ / ४ वर्षात मनसेचा कुणीही माणूस आमच्या भागात फिरकलेला आम्हाला दिसला नाही . याचा अर्थ मनसे हा पक्ष हि इतर पक्षा सारखाच आहे व वेळ आली तरच हा क्रियाशील होतो व आरोळी ठोकतो व जंगल दणाणून सोडतो . 

मनसे जात / पात मानत नाही  , हि गोष्ट आम्हाला हि भावते व आमचे वडार समाज बांधव हि त्या पक्षात खूपच कार्यरत आहेत हे आम्ही पाहतो आहोत . 

परंतु थोडे राजकीय बोलायचे आहे म्हणून बोलतो आहे . किती हि जात / पात नाही मानले तरी शाळेच्या प्रमाण पत्रावरील जात जो पर्यंत संपत नाही व भारतातील आरक्षण जो पर्यंत चालू आहे तो पर्यंत जात मानणे  हे क्रमप्राप्त आहे . काही जातीवर इथल्याच काही स्वताला श्रेष्ठ म्हटल्या गेलेल्या जातींनी कित्येक शतके अमानुष असा अन्याय केलेला आहे . त्यांच्या पासून संधी हिरावून त्यांना सामाजिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या भयंकर असे खच्चीकरण केलेले आहे . त्यांना गुलामगिरीत ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे . त्याचं आवाज सातत्याने दबला  राहील यासाठी त्यांच्यावर सतत दबाव ठेवला आहे . त्यांच्यावर थोडीफार मेहरबानी करून त्यांचे अतोनात असे शोषण केलेले आहे . 

आज २०१४ मध्ये हि वडार समाजाला ते या देशाचे मूलनिवासी असून सुद्धा त्यांना १९६१ चा  रहवाशी असल्याचा पुरावा मागत  आहे .  सरकार हे कबुल करत आहे कि वडार समाज हा भटका समाज होता व आहे म्हणून व सरकार ला हे हि माहित आहे कि वडार समाज हा अशिक्षित व अज्ञानी व अंधश्रध आणि व्यसनी समाज होता म्हणून , असे असून हि सरकार या समाजाकडून अशी अपेक्षा करत आहे कि या समाजाने १९६१ साली त्यांच्या नोंदी ठेवलेल्या असतील . काय मूर्खपणा चालवला आहे या सरकारने व सत्तेतील व विरोधी पक्षातील लोकांनी .वडार समाजातील लोकाकडून तलाव , रस्ते , बंधारे व सरकारी इमारती बांधून घेणारे हेच , वडार समाजाला अज्ञानी व व्यसनात अडकवणारे हेच आणि हेच १९६१ चा पुरावा मागत आहेत . 

संपूर्ण भारतात वडार समाज हा आदिवासी जमात म्हणून ST  या कॅटेगरी मध्ये गणला गेलेला आहे परंतु या अतिशहाण्या ( पुरोगामी ) महाराष्ट्र सरकारने वडार समाजाला स्वतंत्र असे भटके - विमुक्त असा गट  तयार  करून त्यात अशा बर्याच जातींचा समावेश करून टाकलेला आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत असे काहीही सांगितलेले नाही . 

हे सर्व असे असताना २०१४ मध्ये आमचा वडार समाज उघड्यावर , बेघर , कुठल्याही सुविधा वाचून जगत आहे हे सरकारचेच नव्हे तर प्रत्येक पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेचे अपयश आहे , हि महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे . 

सरकारमधील पक्ष व विरोधी प्रमुख पक्ष हे वडार समाजातील काही धनवान लोकांना वडार समाजाचे म्हणून ओळखत असतील परंतु खरा वडार बांधव हा दूर कुठेतरी दगडाच्या खाणी जवळ वस्ती करून राहत आहे , कुठेतरी रस्त्याच्या कडेला दगड घडवत बसलेला आहे , उन्हां तान्हात कुठेतरी मातीचे ढिगारे उचलत आहे त्यामुळे वडार समाजातील असे काम करणारे पुरुष व स्त्रिया या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत . वडार समाजाची मुले शिक्षणा पासून वंचित राहत आहेत . त्यात भर म्हणून कि काय १९६१ च्या पुराव्याची अट  ? 

कधी कधी असे वाटते आहे , असला कसला हा वैभवशाली भारत देश ? हे जे स्वतंत्र आपल्याला भेटले आहे ते ठराविक लोकासाठी तर नाही ना ? 

आज राज ठाकरे यांची जीवनशैली पाहिली  , राजकीय लोकांची जीवनशैली पहिली कि वाटते यांना सामान्य लोकाशी काहीही घेणे देणे नाही आहे . यांना फक्त सत्ता हवी आहे . व काही लोक यांना गुलाम म्हणून हवे आहेत . यांची मानसिकता हीच आहे . 

आज राज ठाकरे पुण्यात येत आहेत , मोठी जंगी सभा होईल , शब्दांचे बॉम्ब  व शब्दांचे तीक्ष्ण बाण सोडले जातील , काहीजण निशाण्यावर असतील , राजकारणातील चाली खेळल्या जातील . 

परंतु या निमिताने मला मनसेची वडार समाजाच्या रास्त मागण्या बाबतीतील त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका जाणून घ्यायची आहे . अशी भूमिका जाणून घेणे हा आमचा हक्क आहे कारण वडार समाजाचे खूप कार्यकर्ते हे मनसे मध्ये कार्यकर्त्या पासून पदाधिकारी पदा पर्यंत कार्यरत आहेत . व वडार समाजात  मनसेचे खूप मतदार आहेत . 

मनसे पक्ष असा  राजकीय निर्णय जरी घेवू शकत नसला तरी त्यांनी तो जाहीर करावा , परंतु अपेक्षा आहे मनसे वडार समाजाची मागण्यांना पूर्ण पाठिंबा देवून तसे समर्थन हि देईल . 

आम्ही फक्त मनसे लाच नाही तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकी पूर्वी प्रत्येक पक्षाला आमचे अशा पद्धतीचे निवेदन देणार आहोत . 

जो आम्हाला साथ देईल , आम्ही त्यांच्या सोबत असू . जो आम्हाला वाटण्याच्या अक्षदा दाखवील त्यांना आम्ही कायमच्या अक्षदा देवू व जिथे जमेल तिथे उमेदवार पाडण्यासाठी मोलाचे योगदान देवू . 

वडार समाजाला आमच्या मर्यादा माहित आहेत , तशी शक्तीस्थळे हि माहित आहेत . बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला मतदानाचा अधिकार कुणीही आमच्या पासून हिरावून घेवू शकत नाही . वडार समाजाला अद्याप कुणी हि प्रतिनिधित्व दिलेले नाही , आम्ही स्वताच्या बळावर जरी निवडून आलो नाही तरी आम्ही प्रस्थापितांना झटका दिल्याशिवाय राहणार नाही . 

६६ / ६७ वर्षे होवून गेले आहेत स्वातंत्र्याला …… आमचा अजून हि विचार होत नाही … ? ? ? 

जय बजरंग . . .  जय वडार …. 

जय हिंद . . .  जय महाराष्ट्र 

मैंने तेरी सुन्दरता की बात छेडी है , तो ये मेरे मन की सुन्दरता है



मैंने तेरी सुन्दरता की बात छेडी है  ,
तो ये मेरे मन की सुन्दरता है
देख मुझे ...ये 
बबुल का पेड़ भी ..अति सुन्दर लग रहा है

मै उसके ..पीले - पीले फुल से मोहित हूँ
मुझे उसके काँटों से प्यार है
मुझे उसके नाजुक पत्ते ,लुभाते  है
मै उसके फल से ,खिलवाड़ करते रहता हूँ

मै ऐसा कम-नशीब हूँ
जो मुझे आम के पेड़ की छांव नशीब नही
इक ये ही जगह ऐसी है
जंहा मै चैन की नींद सोता हूँ

अपने ही यादों में खोता हूँ
यंहा कोई आता - जाता नही
यंहा मुझे किसीसे कुछ लेन - देनं नही है
यंहा से मुझे ...हर एक चीज सुन्दर दिखती है

हर वो नजारा मेरी आगोश में रहता है
अलग - अलग लोंगों के ......
अलग - अलग बर्ताव भी अच्छा लगता है
धुप भी अछि लगाती है
पत्थर भी " हसीन " दिखते है

ये सुन्दरता मेरे मन की है
और
मन में बसे " आत्मा " की है
और
आत्मा जानता  है के वो " अमर " है

.........

Friday, February 7, 2014




श्री राकेश विटकर 
मुख्य संघटक 
वडार समाज संघ , महाराष्ट्र राज्य 

मी फेसबुक वर येण्याच्या अगोदर माझा वडार समाजाशी गेल्या ४५ / ४६ वर्षात संबंध फक्त लग्नानंतर सासुरवाडीला गेलो तरच यायचा . अन्यथा माझ्या संपर्कात अथवा मी वडार समाजाच्या संपर्कात अभावानेच आलो असेन . मी फेसबुकवर ठरवून वडार समाजाचे काम करू लागलो . परंतु त्या आधी २००७ / २००८ साली माझ्या ऑफिस मध्ये व नंतर माझ्या घरी आलेले श्री राकेश विटकर हे खर्या अर्थाने तळमळ असलेले एक सच्चे वडार समाज सेवक ( कि संघटक ? ) मला भेटल्याचे जाणवले . आमच्यात त्यावेळी व माझी वडार समाजावर कुणा बरोबर झालेली ती प्रथम चर्चा असावी . 

मला आठवते आहे , मला विटकर साहेबांनी प्रश्न केला होता कि आपल्याला वडार म्हणून वडार समाजच अभिमान पाहिजे म्हणून . मी तेंव्हाही त्यांच्या त्या विधानाशी सहमत नव्हतो , मी कुठल्याच बाजूने वडार समाजाचा नव्हतो परंतु माझी भूमिका सर्व समावेशक होती व मी अध्यात्मिक व पांडुरंगाचा वारकरी / माळकरी असल्यामुळे माझी विचार करण्याची पद्धत वेगळी होती व आज हि आहे . मी विटकर साहेबाना सरळच म्हणालो कि - जातीचा अभिमान असायलाच हवा हे म्हणणे खरे आहे परंतु अभिमान हा त्या गोष्टीबद्दल बाळगला जातो त्यात काही अभिमानस्पद गोष्टी असतील , गौरवपूर्ण घटना व कर्तृत्ववान व्यक्ती समाजात निपजल्या असतील ., मी विटकर साहेबाना सरळच विचारले कि आपण अशा आपल्या वडार समाजातील अभिमानस्पद गोष्टी सांगाव्यात . आपला वस्तीतील वडार माणूस दारू पितो त्याचा आपण अभिमान बाळगायचा का? तो बायकोला मरेपर्यंत मारहाण करतो त्याचा आपण अभिमान बाळगायचा का ? वडार माणसाची भांडणे हे नेहमी उगड्यावर व चावडीत ( पूर्वी ) होतात , त्याचा आपण अभिमान बाळगायचा का ? उघड्यावरचे आयुष्य , उघडी नागडी  मुले , अशिक्षित समाज याचा अभिमान बाळगायचा का ? असे एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार मी त्यांच्यावर केला . परंतु श्री विटकर साहेबांनी अत्यंत संयमाने व संयतपणे माझे समाधान केले होते . 

पुढे मी २०११ पासून फेसबुक माझ्या अध्यात्माच्या आधारावर व फक्त सामाजिक दृष्टीकोन ठेवून वडार समाजात खूपच सक्रीय झालो . इतका कि मला संपूर्ण महाराष्ट्रातील बराचसा वडार समाज ओळखू लागला , वडार समाजातील संघटना व संघटनेचे नेते सुद्धा माझी दखल घेवू लागले . नुकतेच मी " वडार समाज संघ " या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व जन संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे . 

काही लोकांनी ( दोन अथवा तीनच ) मध्ये अशी हूल उठवली कि मी पदासाठी तडफडत आहे व पद मिळावे म्हणून मी काम करत आहे , थोडे विषयांतर होईल परंतु यावर मी थोडा प्रकाश टाकू इच्छित आहे . सर्व प्रथम सगळ्यात जुन्या असलेल्या एका संघटनेने मला त्यांच्या कार्यकारिणीचे सदस्यत्व २०१२ ला देवू केले होते , मी ते नाकारले होते . अजून एक संघटना तिचा आता महाराष्ट्रात खूप बोलबाला आहे व त्या संघटनेसाठी मी निस्वार्थ बुद्धीने खूप काम केले आहे त्यांनी मला महाराष्ट्राच्या कमिटी मध्ये घेतो असा शब्द दिला होता . तो खरा कि खोटा होता मला माहित नाही परंतु मी तशी मागणी केली नव्हती व त्यामुळे त्या पद वाटपाच्या कार्यक्रमालाही मी हजार झालो नव्हतो . राहता राहिली गोष्ट वडार समाज संघाची . या संघाचे प्रदेश अध्यक्ष पद निवडण्याचे अगोदर पासून श्री श्रावण रेपणवाड साहेब व मी  माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होतो व ते माझा खूप आदर करायचे , त्यांना फेसबुक वरील समाज बांधवांची साथ हवी होती व मी त्यातील एक महत्वाचा दुवा होतो हे ते हेरून होते . आज चे पद स्वीकारायचे अगोदर हि गोष्ट ऑगस्ट २०१३ लाच होणार होती परंतु मी काही गोष्टी  श्री श्रावण रेपणवाड साहेबाना स्पष्ट केल्या होत्या कि मी काही राजकीय व्यक्ती नाही व मला माझ्या क्षमता व मर्यादा माहित आहेत आणि मी जबाबदारी घेवून काम करणारा व्यक्ती आहे , एवढेच नाही तर मी त्यांना एक गोष्ट ( वाटेल तर अट म्हणा ) स्पष्टच सांगितली कि या संघटनेतील श्री राकेश विटकर यांचे योगदान मला माहित आहे त्यामुळे मला माझी जबाबदारी देताना तुम्ही प्रथम त्यांच्याशी बोलून घ्या . 

श्री राकेश विटकर यांच्याशी २००७ / २००८ नंतर गाठ भेट झालेली नव्हती व मध्यंतरीच्या काळात त्यांनीही माझ्याबद्दल ऐकले होते , परंतु माझे एकाच म्हणणे होते कि मला संघटनेतील कुणालाही न दुखावता वा कुणाच्याही अधिकाराला धक्का न लागता मला स्वीकारले गेले पाहिजे . परंतु काही कारणामुळे त्या गोष्टी सहा महिन्या पूर्वी जुळून आल्या नव्हत्या . 

तत्पूर्वी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटत आहे कि हि गोष्ट सहजासहजी झालेली नाही . सामाजिक कार्यात कार्यरत असताना व माझ्याकडे एक " वडार समाज चारीटेबल ट्रस्ट "हि सामाजिक संस्था तिच्या पारदर्शक व विश्वासार्थ कार्यामुळे नाव लौकिकाला आलेली असताना मी हे काही प्रमाणात संघटनात्मक राजकीय पावूल टाकणे कितपत योग्य आहे हे ठरवण्यासाठी मी आमचे मोठे भाऊ व समाजाचे जाणकार श्री भरत  विटकर यांच्या बरोबर मी कुठल्याही संघटने बरोबर जावे कि नाही जावे या संदर्भात काही मुद्दे लिहून काढले होते व सर्व जावे तर का जावे ? व का जावू नये ? या मुद्द्यांचा विचार केल्या नंतर आम्ही कुठल्यातरी संघटने बरोबर सलग्न राहायला हवे या निष्कर्षावर आलो होतो . श्री भरत  विटकर साहे यांच्या बरोबर आमचे फोन वरील संभाषण हे रात्री साडे दहा ते साडे बारा वाजे पर्यंत झालेले होते . ( त्याच्या नोट्स माझ्याकडे आहेत . ) . या बाबत श्री भरत  विटकर सरांचे आभार मानाने उचित ठरेल . असो 

जी गोष्ट १५ ऑगस्ट २०१३ च्या आसपास  होणार होती ती गोष्ट २२ जानेवारीला झाली . 

मी श्री राकेश विटकर यांना बर्याच वर्षातून भेटत होतो , मध्यंतरी एकदा धावती भेट झाली होती परंतु ना ते मला विसरले होते ना मी त्यांना विसरलो होतो . दोघानाही एकमेकाबद्दल  आदर कायम होता .

सर्वसाधारण एक गोष्ट अशी असते कि कुणाही व्यक्तीला तो राहतो तिथे अथवा त्याच्या आजू बाजूला पाहिजे तेवढा सन्मान भेटत नसतो , अशा व्यक्ती बद्दल ऐकीव गोष्टीच खूप असतात . मी हि अशीच एक ऐकीव गोष्ट श्री विटकर साहेबाना सांगितली . ( कारण मला सांगणारे , मला भरून देणारे मला भरपूर भेटतात , मी त्यांना तेवढे गंभीरतेने घेत नाही . ) 

त्यांनी मला ८ / १० लोका मध्ये सांगितले , " अहो  दादा , मी माझ्या बायकोचे मंगळसूत्र ठेवून काही कार्यक्रम केले आहेत व तुम्हाला ज्यांनी सांगितले आहे कि त्यांनी मला पैसे दिले होते असे म्हणताय  तर ते साफ चुकीचे आहे . ज्यांना फक्त दुसऱ्याची बदनामीच करायची असते त्यांना त्या शिवाय काही सुचत नाही . " 

आज मी जालना मेळाव्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे . जालना मेळाव्याला जवळ जवळ दीड दोन लाख रुपये प्रसिद्धी पत्रके व धरून खर्च आलेला आहे . त्यातील बहुतांश खर्च हा स्वतः श्री राकेश विटकर यांनी स्वताच्या खिशातून केलेला आहे . रात्र रात्र बाहेर काढली आहेत , महाराष्ट्रातील जिल्हा जिल्ह्याचा दौरा केला आहे , कुठे कमी जास्त आहे ते सांभाळलेले आहे , त्यासाठी आलेला खर्च वेगळाच . तो त्यांनीही गृहीत धरलेला नाही व अन्य ज्यांचा दूर दूरचा संबंध येत नाही ते तरी कशाला धरतील ? 

समाज कार्य करणे वाटते तितके सोपे नाही , इथे टीका करणे सर्वात सोपे आहे . श्री राकेश विटकर साहेब हे अगदी तरुण वयापासून १९९४ च्या मेळाव्यापासून वडार समाजाशी संघटनात्मक पातळीवर जोडले गेले आहेत . त्यांच्या सारखा अनुभव पाठीशी असलेले आज शोधून सापडणार नाहीत . अनुभव असलेल्यांनी " हाय " खावून माघार घेतलेली आहे . ते आता फक्त पडद्या अदच्य गप्पा झोडण्या पुरते उरलेले आहेत परंतु समाजासाठी नाउमेद न होता , कुठलाही प्रकाश झोत स्वतावर न घेता समाजाचे कार्य करत राहणारे श्री राकेश विटकर हे दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे . 

श्री राकेश विटकर यांच्या क्षमते विषयी व त्यांच्यात असलेल्या अंगभूत काही गुणामुळे ते कुठल्याही मंत्र्यांना , मोठ्या अधिकार पदावरील व्यक्तीला सहज भेटू शकतात , आपले म्हणणे कुठल्याही विपरीत परिस्थिती मध्ये अत्यंत हिकमतीने मांडण्याची त्यांची कला अजबच आहे . त्यांना प्रशासकीय व सरकारी कागद पत्रांचा खेळ खूप चांगला जमत आहे . अशी कागद पत्रांची मांडणी करणारे आपल्या वडार समाजात खूप कमी व्यक्ती आहेत . सरकार दरबारी वडार समाजाची लढाई यशस्वी पाने लढायची असेल तर खरेच श्री राकेश विटकर यांना पर्याय नाही . 

ज्या काही घडामोडी मी वडार समाज संघ या संघटनेत आल्या नंतर मला दिसत आहेत त्यावरून मला पुढील पाच वर्षात शासकीय पातळीवरून वडार समाजासाठी खूप भरीव कार्य झालेले दिसेल असा मला स्वताला आत्मविश्वास आहे . 

आज च्या दुनियेत कुणाचीही ओळख त्याचे प्रोफाईल पाहून होत असते . श्री राकेश विटकर यांनी १९९४ पासून केलेले कार्य व त्याचे पुरावे म्हणून त्यांच्याकडे असणारे फोटो व कागदपत्रे पहिले कि वाटते असा व्यक्ती सध्या तरी वडार समजत एकमेव असावा . 

मला संघटक या शब्दाचा अर्थ कळतो परंतु वडार समाज संघ या संघटनेतील संघटक म्हटले कि मला त्याचा अर्थच काळात नाही . लोक अध्यक्ष म्हणून मिरवतात ( मी हि त्यातलाच अपघाताने ) , कुणी अन्य नावाने मिरवतात व आपले विटकर साहेब हे संघटक म्हणून मिरवतात . किती लोकांना संघटक म्हणवून घ्यायला आवडत असेल कुणास ठावूक ? सर्व पदाधिकार्यांना सन्मान देवून , सर्वांचा मान  राखून संघटनात्मक कार्य करण्याचे वित्कर साहेबांचे कौशल्य अजबच आहे . 

वडार समाज संघाची स्थापना करण्यात श्री राकेश विटकर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे व त्याचे मुख्य ऑफिस हि पुण्यातच आहे . 

श्री राकेश विटकर साहेबांच्या अनेक कार्याची मला खास ओळख करून द्यायची आहे . त्यांचे एक कार्य त्यांच्याच बाकी अनेक कार्यावरून ओवाळून टाकाव्यात असे आहे . त्यांचे ते कार्य ऐकून महाराष्ट्रातल्या वडार तरुणांना नक्कीच अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही . 

तूर्त थांबतो . पुढील वेळी प्रत्यक्ष श्री विटकर साहेबांच्या कार्या बद्दलच चर्चा करूयात . 

जय बजरंग जय वडार 

Thursday, February 6, 2014

एका वडार समाज बांधवाची वेदना . . .



एका वडार समाज बांधवाची वेदना . . . 

आपले समाज बांधव श्री बजरंग धनवट रात्रीचे दोन वाजता मला सांगत होते . . .

" मी तेंव्हा ३ वर्षाचा होतो , माझ्या पाठीवरील धाकटा भाऊ दीड दोन वर्षाचा होता व माझी सर्वात छोटी बहिण तेंव्हा आई च्या पोटात होती … तेंव्हा माझा बाप गेला हो सर , मला माझा बाप काळा का गोरा मला काहीच आठवत नाही हो . . . पोटासाठी गावोगावी फिरून , रोज गाव बदली करून अचानक आजारी पडल्यामुळे काहीही उपचार न करता आल्यामुळे माझा बाप गेला हो . आज माझ्या कडे सर्व सुख आहे पण माझा बाप मला माहित नाही हो कसा होता तो . साहेब , त्यामुळे जीव तुटतो व कुणा आपल्या वडार बांधवावर अशी वेळ येवू नये म्हणून मी जिथे समाजाचा कार्यक्रम असेल तिथे पोहचत असतो , हा आपला वडार समाज सुधारावा म्हणून , मी वाटेल ते करायला तयार आहे . "

पहारीसारखे पिळदार शरीर असलेला हा गोरा गोमटा धिप्पाड शरीर यष्टीचा व्यक्ती येवढा भावनिक असावा असे वाटलेच नव्हते . नंतर त्यांनीच सांगितले कि ते मिलिटरी मधून मेजर म्हणून निवृत्त झालेले आहेत .

. . . . वडार समाज संघाच्या जालना येथील चिंतन शिबिराला जाण्यासाठी आम्ही पुण्यातून रात्री आकरा वाजता प्रवास सुरु केला . कॅलेंडर वाले म्हणून माझे खूप चांगले स्वागत केले गेले . श्री धनवट साहेब यांच्या हातात कॅलेंडर होते व ते वाचतच होते व मीच समोर आल्याने त्यांना खूप आनंद झाला होता . माझी एक दोन तास तरी ते स्तुती करत असावेत येवढा त्यांच्या बोलण्यात गोडवा आहे .

ते पुढे सांगत होते . . .

" मला वडिलांबद्दल काहीही माहित नाही , जे काही आई सांगते व अन्य लोक सांगतात तेवढेच माहित आहे . लोक सांगतात कि तुझा बाप खूप तगडा होता व काय कुस्ती खेळायचा ?, एकदा जोर मारायला लागल्यावर ५०० / १००० झाल्या शिवाय थांबायचा नाही . "

" परंतु वडार समाजात जन्माला आल्यामुळे पोटासाठी दररोज गाव बदली करायला लागायचे , आई सांगते कि आमच्या कुटुंबा सोबत तेंव्हा चुलत भावंडाचे वगैरे ३ / ४ पालं असायचे व गावात कुणी उतरू देत नव्हते त्यामुळे कुठेतरी ओढयाच्या कडेला अथवा म्हसनवट्यात ( स्मशान भूमीत ) थांबायला लागायचे . उपासमार व अन्न साठी विवंचना तर सतत असायचीच . "

" असेच एका दिवशी एका सावकाराची थोडी बाकी असल्यामुळे त्याची बाकी चुकती करून पुढील गावाला निघायचे होते , बाकीच्यांची बिऱ्हाडे पुढे गेली होती व आमचे एकच बिऱ्हाड म्हसनवट्यात त्या दिवशी मुक्कामाला होते . "

" मला तर काही आठवत नव्हते व कळत हि नव्हते पण त्या दिवशी माझा बाप मध्य रात्रीच्या वेळी उठला व बाहेर गेला , परंतु परत आला तेंव्हा त्यांच्या अंगावर एक हि कपडा नव्हता . त्यांनी पूर्ण कपडे काढलेले होते व काही तरी बडबडत होते . संपूर्ण अंग तापाने फ़नफ़नलेले होते , आई ने त्यांना विचारले - काय झाले ? असे काय करताय ? परंतु माझ्या बापाला झपाटल्या सारखे काहीतरी झाले होते . "

" रात्रीची वेळ , सगळीकडे अंधार दाटलेला , ते दोघे जाणते व आम्ही दोघे भाऊ काहीही कळत नसलेले व आई च्या पोटातील वाढीला लागलेले बाळ . . . कुणाला आवाज द्यायचा ? कोण मदतीसाठी येणार ? वडाराच घर उघड्यावर म्हणतात तसा संसार , कुणाला काय लागून गेले आहे इथे कुणी मरो अथवा उरो . नात्या - गोत्यातील जे होते ते पुढे निघून गेलेले . काय करावे ? "

" बापाची अवस्था खूप वाईट झाली होती , अचानक असे काय झाले , काहीही कळायला मार्ग नव्हता . सकाळची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते . सकाळ झाली . परंतु पुढे काय करायचे हे अडाण्या माणसाला काय कळावे ? शेजार गावाच्या सरकारी दुकानात न्यायचे ठरले , आम्हा दोघा भावांना घरी ठेवून माझी आई माझ्या बापाला घेवून निघाली . पैसे तर सोबत नव्हतेच परंतु तरीही निघाली , कपाळाचे कुंकू होते , काहीतरी करणे भाग होते . बापाची तब्येत अजूनच खराब होत चालली होती . त्या हि परिस्थितीत गयावया करून , कुणाचा तरी आधार घेवून गावा पर्यंत त्यांना आणले परंतु पुढील गावा पर्यंत न्यायचे तर काहीही मार्ग नव्हता , कुणी गाड्या मध्ये हि बसवून घेत नव्हते . माघे आम्ही दोघे जन भुकेने व्याकुळ होतो परंतु आमचे दुख आम्हाला आता आठवत नाही . परंतु ते आई ला कळत असावे . तिची खूप तगमग चाललेली होती , आम्हाला व जेवढा संसार आहे तेवढा संपूर्ण संसार उघड्यावर ठेवून ती जीवाचा आटापिटा करत होती . मध्येच वडिलांना तिथे एकटेच सोडून ती आम्हाला पाहायला आली होती असे आई सांगत असते . "

" पुढे कसे तरी , कुठल्यातरी वाहनाची सोय झाली , वडिलांना दवाखान्यात नेण्यात आले परंतु खूप उशीर झाला होता . "

" साहेब , माझा बाप असाच अचानक निघून गेला हो , लोक सांगतात त्यांना दारू चे हि व्यसन नव्हते , खूप चांगले चांगले बोलतात . जे काही आई वडिलांबद्दल सांगते तेवढेच आम्हाला माहित आहे "

" आपल्या वडार समाजाच्या कुठल्याही समाज बांधवावर हि वेळ येवू नये . कुणाचेही आई - बापाचे छत्र हिरावले जावू नये . कुणीही अचानक अनाथ होऊ नये असे मला खूप वाटते . "

" वडार समाजाचा कुठे हि काही कार्यक्रम असेल तर मी तिथे नक्की जातोच सर , मला जरी कळले कि कुणी वडाराचा आहे तरी मी त्याच्याकडे जावून त्याच्याशी बोलतो . "

. . . . . श्री धनवट सांगत होतो व मी दगड बनून ऐकत होतो . त्यांना मला भेटून खूप आनंद झाला होता . ते माझी शब्दा शब्दाला स्तुती व गौरव करत होते , माझ्या सारखा माणूस त्यांना आयुष्यात भेटला नाही इतपर्यंत त्यांचे म्हणून झाले परंतु माझे मन त्यांच्या आई ने ह्या भयंकर घटने नंतर कसे सांभाळले असेल या भोवतीच घुटमळत होते .

श्री धनवट साहेब यांनीच नंतर खुलासा केला - " लहानपण किती वाईट गेले हे सांगण्याच्या पलीकडचे आहे , माझे शिक्षण आश्रम शाळेत झाले . जेवणाची भयंकर आभळ असायची , कालवण वाढले जायचे त्याला फक्त कलर असायचा व त्यात आळ्या ह्या ठरलेल्याच असायच्या . खाण्या वाचून गत्यंतर नसायचे , खूप भूक लागायची , शाळेला दांडी मारून , कुणाच्या शेतात जावून कुणाची गाजरे चोरायचो , कुणाचे तंबाटे चोरायचे , कुणी पकडले कि ते खूप मारायचे पण खूप भूक लागलेली असायची . कधी बाजारात गेलो कि तिथे केळी खावून कुणी साल कधी टाकतोय त्यावर अधाशा सारखे पाहायचो व ती साल उचलून खायचो . "

" साहेब , तुम्हाला खरे सांगतो - मी माझ्या शिक्षणाचा खर्च माझा मीच केला , वाटेल ते काम केले परंतु शिक्षण घेत राहिलो . त्यात मी कब्बडी खूप चांगला खेळायचो , कब्बडी तील लॉंग जंप व पाय मारणे हे मी खूप अफलातून रित्या करायचो व त्या बळावर मी माझ्या शाळा कॉलेज मध्ये कॅप्टन झालो होतो . कॉलेज ला असताना एक असेच मोठे बक्षीस मिळाले होते , ते स्वीकारायचे होते परंतु माझ्या कडे कपडेच नव्हते , एका मित्राची आखूड व पार्श्व भागावर दोन्ही ठिकाणी फाटलेल्या चड्डीवर मी ते बक्षीस स्वीकारले होते . त्यावेळी मोठ मोठाले घराच्या मुलाकडे सर्व काही होते परंतु मी त्यांचा माझ्या खेळा मुळे कॅप्टन होतो याचा मला खूप अभिमान वाटत आहे . "

असे हे आपले श्री बजरंग धनवट साहेब हे पुढे कब्बडी च्या त्यांना अवगत असलेल्या तंत्राच्या जोरावर मिलिटरी मध्ये सामील झाले . त्यांनी देशाची यथायोग्य सेवा हि केली . एवढेच नाही तर आपल्या सर्वाना माहित असलेले कारगिल युद्धात त्यांनी सहभाग हि घेतला होता . ते ज्या ठिकाणी युद्ध भूमीवर होते तिथे एक शत्रू पक्षाचा बॉम्ब अचानक येवून पडला व त्यात त्यांचे ३० / ३२ सहकारी क्षणार्धात देशाच्या क|मी आले होते . श्री धनवट साहेबांचे नशीब बलवत्तर म्हणून ते आज आपल्या सोबत आहेत .

असे हा अनुभवाने सिद्ध झालेला आपला वडार समाज बांधव आज आपले सुखी आयुष्य जगत आहे . गावी आल्या नंतर यांनी आपल्या गावात राजकारणात सहभाग घेवून उप सरपंच पदा पर्यंत जावून गावाची चांगलीच सेवा केली आहे . परंतु आपल्याच काही वडार समाजातील घर भेद्यानी त्यांच्या विरुद्ध षंड रचून त्यांना बदनाम व वेगळे करण्याचा प्रयत्न केला . परंतु वडार समाजात दुफळी नको म्हणून त्यांनी गाव सोडून पुण्याला आलेले आहेत . मध्यंतरी त्यांनी सिविल डिप्लोमा केला होता त्या जोरावर आता ते एका चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आपली जबाबदारीची नोकरी करत आहेत .

मला धनवट साहेब सांगत होतो . साहेब तुम्ही कधीही सांगा , मी गावाकडून २००/ ३०० लोक कधीही आपल्या कार्यक्रमाल घेवून येत जाईल . मला खूप इच्छा आहे वडार समाजातील लोकासाठी काम करण्याची . मला तुम्ही आवर्जून काही कार्यक्रम असेल तर सांगत चला .

जालना येथील चिंतन शिबीर यशस्वी तर झाले आहेच , मी त्या बद्दल समाधानी हि आहेच व त्यावर मी सर्व समाज बांधवाना चांगली बातमी हि सांगणार आहे .

परंतु मला श्री धनवट साहेबा सारखे काही व्यक्ती भेटल्या कि अजून खूप हुरूप येतो . श्री धनवट व अशाच काही निवडक लोकामुळे मी इथे अजून टिकून आहे . आपल्या वडार समाजात अशा काही व्यक्ती आहेत त्यांच्या भावनांना ओलांडून पुढे जाऊशी वाटत नाही .

श्री धनवट साहेबा बरोबर च्या एकाच रात्रीत पुढील कित्येक वर्षांचा स्नेह दडलेला असेल याची मला पूर्ण खात्री आहे .

अशाच काही लोकामुळे माझीही ओळख आहे , माझे हि व्यक्तिमत्व खुलते आहे .

जय बजरंग . . . . जय वडार

संघटनात्मक कार्य करू इच्छिणाऱ्या वडार समाज बांधवा साठी " कुसाळकर ब्रदर्स " यांच्याकडून काही मार्गदर्शक तत्वे .

संघटनात्मक कार्य करू इच्छिणाऱ्या वडार समाज बांधवा साठी " कुसाळकर ब्रदर्स " यांच्याकडून काही मार्गदर्शक तत्वे .

वडार समाज संघ व वडार समाज चारीटेबल ट्रस्ट च्या कार्यकर्त्यांना जे सामाजिक कार्यात कार्यरत राहू इच्छितात , संघटनेचा विचार करतात . आपल्या वडार समाजाची चांगली संघटना व्हावी असे ज्यांना वाटत आहे त्यांनी एक खूप महत्वाचे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे ते म्हणजे ----

" प्रत्येक कार्याला / कामाला कार्यकर्ता असायलाच हवा व प्रत्येक कार्यकर्त्याला नेमून दिलेले कार्य / काम हे असायलाच हवे . "

दुसरी एक खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे - - -

" संघटनेत / संस्थेत येणारा प्रत्येक जण हा तावून सुलाखून व समाजोन्मुख धडा घेवून तयार झालेला कार्यकर्ताच असावा व त्यानंतरच त्याला कुठलीही जबाबदारीचे पद दिले जावे व त्या कार्यकर्त्याला त्याच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव असायला हवी , "

संघटनात्मक कामात " संघटनेचे हित " याला प्राथमिकता असायला हवी , असे असले तरी प्रत्येकाने माणूसपण हे टिकवून ठेवलेच पाहिजे .

संस्थेत / संघटनात्मक कार्य करत असलेल्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक समाज बांधवांच्या घरी जाण्याचा अभ्यास ठेवला पाहिजे . लोकांना संघटनात्मक पातळीवर जोडण्यासाठी त्यांच्या पोटात शिरून प्रत्येकाशी मनमोकळे पणाने संवाद साधला पाहिजे व कुणी कितीही अडाणी , सदोष समाज बांधव असला तरी सदैव त्याला मदतीची भावना ठेवली पाहिजे .

संघटनात्मक जबाबदारी तून कार्यकर्ता निर्माण होवून त्या समाज बांधवाची कार्य करण्याची क्षमता , त्याची प्रतिभा यांचा विकास झाला पाहिजे . समाज बांधवाचा हर प्रकारच्या कामात सहभाग वाढला पाहिजे तसेच त्या समाज बांधवाला एक जीवन दृष्टी प्राप्त झाली पाहिजे हा हि शुद्ध हेतू असायला हवा .

अशा संघटनात्मक जडण घडणी तून खरा वडार समाज बांधव घडला पाहिजे , खरा कार्यकर्ता घडला पाहिजे , त्याच्यात असलेला राग - लोभ , रुसवा - फुगवा , आवड - निवड , स्वार्थ - अहंकार , यांचा नाश व्हायला हवा व त्याने पूर्णत समाजाभिमुख होणे गरजेचे आहे . असे झाले तरच पुढील नेतृत्वावरून अहंकाराच्या गोष्टी घडणार नाहीत व समाज हित प्रथम हे व्रत आचरता येईल .

कार्यकर्ता हा सदैव समरसून कार्य करणारा हवा , सम विचारी हवा , सुसंवादी हवा , सहकार्याचे तत्व स्वीकारलेला हवा . आपण एकटे सर्वज्ञानी व सर्वकार्य करू शकतो असा अहंकारी विचार कधीही मनाला शिवत| कामा नये तर " आपण एक अपूर्णांक आहोत व वडार समाज बांधवांच्या पूर्ण प्रगती शिवाय आपल्याला पूर्णत्व नाही " हे मनात चांगले ठसवायला हवे .

संघटने मध्ये काम करत असताना वैयक्तिक जबाबदारी व सामुहिक जबाबदारी हि कधीही टाळू नये . असे केल्याने संपूर्ण संघटनेला त्याचे परिणाम भोगावे लागतात हे कधीही लक्षात ठेवले पाहिजे .

संघटनेत कार्य करताना विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन हा ठेवलाच पाहिजे तसेच प्रत्येक धर्माचा आदर हि करता आला पाहिजे . एवढे सगळे करून आपल्या अंतर्मनाचा आवाज हि ऐकता आला पाहिजे म्हणजेच अध्यात्मिक बैठक हि असायलाच हवी .

कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्राच्या , अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा म|न राखला पाहिजे , भारतीय लोकशाहीचा आदर राखला पाहिजे . भारतीय घटने बद्दल त्याला निस्सीम प्रेम व आदर पाहिजे व त्याच्या रक्षणासाठी त्याने सदैव तत्पर राहिले पाहिजे .

संघटने मध्ये काम करताना सामुहिक निर्णय प्रक्रियेला अनन्य साधारण महत्व असते व तो एक संघटनेचा निर्णय प्रक्रिये मधील महत्वाचा भाग असतो त्यामुळे झालेल्या सामुहिक निर्णयाचा स्वीकार करणे हे सर्वावर बंधनकारक असते व तो स्वीकार कधी कडू असला तरी समाज हित म्हणून तो स्वीकारायला हवा व सामुहिक निर्णय म्हणून त्याचे दायित्व हि स्वीकारायला हवे .

आपल्या संघटने मुळे केवळ आपल्याच नाहीतर अन्य कुठल्याही समाजाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान , हानी , मानहानी होता कामा नये याचे भान असायला हवे .

संघटनेची भूमिका हि वाहत्या पाण्याच्या प्रवाहासारखी असायला हवी . पाण्याचा प्रवाह आपल्या वाटेने पुढे जात असतो व मध्येच एखादा खळगा / खड्डा लागला तर तो खळगा भरून नंतरच पुढे मार्गक्रमण करतो त्या प्रमाणे संघटनाने सर्व सामान्य समाज बांधवांचे दुख दूर करूनच पुढे मार्गक्रमण केले पाहिजे ,

संघटन हे ज्या समाजात सामाजिक एकता व सामाजिक समरसता आपसूकच आलेली असते त्यांच्यात लवकर व शिस्तबद्ध रित्या होते परंतु एकता व समरसता हे गुण नसलेल्या समाजात यावर खूप मेहनत व कष्ट घ्यावे लागतात . वडार समाजात या वर खूप चिकाटीने काम करण्याची गरज आहे . म्हणून संघटनेतील कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करणे गरजेचे आहे .

वडार समाज संघटना मध्ये कार्य करणाऱ्या वडार समाज बांधवानी " सामाजिक जाणीवा " निर्माण करून सर्व वडार समाज आरक्षण , सरकारी सवलती , मिळणाऱ्या सुविधा यांची सर्व - सामान्य समाज बांधवाना ओळख करून द्यावी . सगळीकडे सर्व समाजात सरकारी योजना व त्यांची अंमलबजावणी करून द्यावी म्हणजे आपल्या समाजाचा जीवनस्तर सुधारण्यास खूप मदत होईल .

आणखी काही मुद्दे परत कधी तरी …….

जय बजरंग . . जय वडार
 — 

जालना येथे २ फेब्रुवारी ला झालेल्या चिंतन शिबिराला महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री राजेश टोपे उपस्थित होते .

जालना येथे २ फेब्रुवारी ला झालेल्या चिंतन शिबिराला महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री राजेश टोपे उपस्थित होते .

त्यांचा सत्कार करताना वडार समाज संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री श्रावण रेपणवाड , वडार समाज संघाचे मुख्य संघटक श्री राकेश विटकर , वडार समाज संघाचे सरचिटणीस श्री दिलीप गुंजाळ व अन्य मान्यवर .

श्री मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने आपल्या वडार समाजाला मार्गदर्शन केले त्यावरून असे म्हणता येईल कि येणाऱ्या एक / दोन वर्षात वडार समाज संघाकडून वडार समाजासाठी निश्चितच भरीव असे कार्य केलेले संपूर्ण महाराष्ट्रातल्या वडार समाजाला दिसेल .

मेळावा झाल्यानंतर आम्ही पहिले हे काम केले कि तातडीने " मंत्रालयीन कामासाठी - पाठपुरावा समिती " स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे . त्यानंतर ताबडतोब श्री राजेश टोपे साहेब यांची मंत्रालयात बैठक बोलावून तिथे त्यांना आवश्यक ती कागदपत्रे देवून त्यांच्या मार्फत ती कागद पत्रे सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेली आहेत .

वंजारी समाजाला जसे भगवान गड आहे तसा वडार समाजासाठी " बजरंग गड " अथवा त्या संकल्पनेवर केवळ वडार समाजासाठी वन विभागाची १०० एकर जागा सरकार कडून मिळवायची आहे . श्री राजेश भैय्या टोपे साहेबांनी त्यांच्या भागात अशा कार्यासाठी त्यांची पूर्ण मदत होईल असा शब्द आपल्या वडार समाजाला दिला आहे व त्यांनी ताबडतोब मंत्रालयात तशी बैठक बोलावून ते त्या बाबत गंभीर आहेत हे त्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले आहे .

दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्यात वडार समाजाच्या नावाने २० गुंठे जमीन आहे त्यावर वडार समाजाच्या विध्यर्थिनि वसतिग्रह अथवा वडार समाजाच्या अन्य सामाजिक व सार्वजनिक हितासाठी ती जागा विकसित करता येण्यासाठी श्री टोपे साहेब हे श्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्याशी बोलून महानगर पालिकेकडून ५० % निधी उपलब्ध करून देण्यासाठी बोलतील व निम्मा निधी वडार समाजाने उचलावा अशी त्यांनी सूचना केली आहे . या कार्यात काही तांत्रिक अडचणी असू शकतात परंतु वडार समाज बांधवानी दूरदृष्टीचा विचार करून समंजस पणा दाखवून यातून मार्ग काढावा अशी अपेक्षा आहे . हे जर कार्य पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात झाले तर महाराष्ट्रातल्या वडार समाजाला एक हक्काचे स्थान पुण्यात निर्माण होईल . वडार समाज संघ यावर आपले प्रयत्न निच्शितच पुढे चालू ठेवणार आहे .

तिसरी गोष्ट , १९६१ च्या पुराव्याच्या संदर्भात आपल्या वडार समाज संघा मार्फत एक निवेदन सरकारला देण्यात आलेले आहे . सरकार वडार समाजाला भटके आहे हे कबुल करत आहे व वडार समाज शिक्षित नव्हता हे हि सरकारला माहित आहे तरीही सरकार महाराष्ट्रातील वडार समाजाकडून जातीच्या प्रमाण पत्रासाठी १९६१ च्या पुराव्यासाठी अडून बसलेले आहे . त्या संदर्भात सरकारने आपली आडमुठी भूमिका जर वेळीच सोडून दिली नाही अथवा लोकसभे च्या निवडणुकी पूर्वी त्यावर ठोस असे निर्देश दिले नाहीत तर सरकारला जोरदार हिसका देण्याचे वडार समाज संघ ठरवत आहे . आमचा शक्यतो संघर्षाचा विचार नाही , सरकारने हा विषय अतिशय गंभीरतेने घ्यावा एवढीच अपेक्षा आहे , परंतु तसे नाही झाले तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील हा सज्जड इशारा आम्ही यातून देवू इच्छितो .

वडार समाजाने ६६/६७ वर्षे कॉंग्रेस ला साथ दिली , आता लाथ हि द्यायला विसरणार नाही , १९६१ चा आम्हाला पुरावा मागून आम्ही महाराष्ट्राचे सन्माननीय नागरिकच नाहीत असे सरकारला म्हणायचे आहे काय ? आमच्या ताकतीने तुम्ही निवडून येत नाहीत हे आम्हाला कबुल परंतु वडार समाजाने ठरवले तर तुम्हाला जागोजागी पाडू शकतो , हा विचार डोक्यात असू द्यात .

१९६१ च्या प्रश्नांवर संपूर्ण वडार समाजाला , त्यातील प्रत्येक संघटनांना निर्णायक स्थितीला येणे गरजेचे आहे . वडार समाज संघ या बाबत कुणाही संघटने बरोबर सहकार्याची भूमिका ठेवेल हे वडार समाज संघाचे वडार समाजाला दिलेले वचन आहे .

वडार समाज बंधुनो , श्री राजेश टोपे साहेब व अन्य काही सरकारमधील अथवा सरकारच्या बाहेरील प्रभावशाली व्यक्ती या आपल्या वडार समाजासाठी हितचिंतक व्यक्ती म्हणून हव्याच आहेत . जो वडार समाजाच्या हितासाठी वडार समाजाला साथ देईल त्याला वडार समाज हि साथ दिल्या शिवाय राहणार नाही . वडार समाजाला प्रत्येक पक्षात आपले हितचिंतक वाढवणे खूप गरजेचे आहे . ( हितचिंतक वाढवताना काही जन आपले वैयक्तिक हितसंबंध वाढवतात व संपूर्ण वडार समाज त्यांच्या पाठीमागे आहे हे दर्शवतात हे वडार समाजासाठी खूप घातक आहे , )

जालना मेळावा हा एका अर्थाने खूपच स्फूर्तीदायी झाला आहे यात काहीही शंका नाही . वडार समाज संघांतर्गत काही बाबी खटकल्या आहेत , नियोजनात काही बाबी राहून गेल्या आहेत , काही मंडळी या बाबत जास्त गंभीर नाहीत , आर्थिक बाबतीत खूप अवघड परिस्थिती आहे , यावर वडार समाज संघाने अत्यंत तातडीने आपल्यात बदल घडवून घ्यावा . संघटनात्मक बर्याच गोष्टी अजून करायच्या राहून गेल्या आहेत . एखादा मेळावा घेणे अथवा तो यशस्वी होणे यापेक्षा आपले संघटन किती मजबूत आहे यावर जास्त जोर असायला हवा . प्रत्येक गाव पातळीवरील शाखा , तालुका पातळीवरील कार्यकारिणी , जिल्हा पातळीवरील कार्यकारिणी यांचे योग्य ती सांगड अजून झालेली नाही . पदे दिलेली आहेत परंतु कामाचा हि पत्ता नाही व जबाबदारीचीही जाणीव नाही अशी एकंदरीत अत्यंत दयनीय अवस्था आहे . संघटनात्मक काम अत्यंत तातडीने , जिद्दीने व स्पुर्तिने होणे खूप गरजेचे आहे .

वडार समाज संघाचे नेते श्री श्रावण रेपणवाड व मुख्य संघटक श्री राकेश विटकर साहेब हे संघटनात्मक बदलासाठी खूप अनुकूल आहेत व त्याचाच भाग म्हणून त्यांनी अनेक जिल्ह्यांचे दौरे केले आहेत , करत आहेत . कार्यकर्त्यांनी आपल्या महत्वाकांक्षाना आवर घालावा व संघटने मध्ये शिस्तीला खूप महत्व असते याची जाणीव ठेवावी .

संघटन मजबूत असेल तर , सरकारला आपण वडार समाजाच्या भल्यासाठी वाकवू शकतो हि गोष्ट सर्व समाज बांधवानी लक्षात ठेवावी . आपला समाज मागे आहे याचे हे हि एक कारण आहे कि आपले संघटन मजबूत नाही व आपण खर्या अर्थाने संघटीत कधीच झालो नाही .

जुन्या खपल्या न काढता , आपल्याच कुठल्याही संघटनेशी संघर्ष न करता फक्त वडार समाज हितासाठी प्रत्येकाने आपले योगदान देत राहिले पाहिजे .

तेच प्रत्येक वडार समाज बांधवाचे कर्तव्य आहे .

जय बजरंग . . . . . जय वडार