Saturday, May 31, 2014

माझी कुणाशी मैत्री नाही . . . माझे कुणाशी वैरत्व नाही



माझी कुणाशी मैत्री नाही . . . माझे कुणाशी वैरत्व नाही 

म्हणून मी जपले नाते . . . म्हणून मी जोडले नाते 


मित्र हे सोडून जाणारे असतात . . .तशीच  तू हि गेलीस ( गेलास ) 

म्हणून मी जपली प्रीती . . . म्हणून मी जपली नाती 


मैत्रीतच कायपण प्रेमात हि . . .  कुणी कुणाला दुखवायचं नसतं  

म्हणून मी फिरवले अश्रू , . . म्हणून मी जिरवले अश्रू 


आता तुला भेटायची इच्छा नाही  . .  आता तुला भेटणार नाही  

मी प्रेम जपणार आहे  . .  मी प्रेमाला बदनाम करणार नाही 


६ : ४७ ( a m ) . . . . .  १ / ६ / २०१४ . . . . .  रविवार 

Friday, May 30, 2014

" समझने " में जरूर कुछ भूल हो गयी होगी





" समझने " में जरूर कुछ भूल हो गयी होगी 

दिल को  जरूर " ठेंच "  लग गयी होगी 

" गले लगाना  " रह गया होगा 

" प्यार जताना  " रह गया होगा 

उसको जरूर " नजर अंदाज " किया होगा 

जानबुझ के उसको " तड़पाया " होगा 

यूँ ही कोई  " मुख मोड़ता " नहीं , . . . . 

उसके नाम से " इसका दिल " अभी भी धड़कता होगा 

९ : १८ . . . .  ३१ / ०५ / २०१४ . . . .   शनिवार 

Tuesday, May 6, 2014

एकाच छंदाचे लोक एकत्र येतात




एकाच छंदाचे लोक एकत्र येतात 


एकाच रंगाच्या अनेक छटा निर्माण होतात 

मतभेदांना शंकेची पुष्टी मिळते 

एकाच उद्देशाची दोन शकले होतात 

कधी चकमक होते तर कधी ठिणग्या उडतात 

सावरण्यासाठी पुढे केलेला हात विसरला जातो 

विश्वासाने डोके ठेवावा असा खांदा दुखावला जातो 

आपलं  कोंबड इकडं  झाकलेलंच असत 

तिकड त्याचं कोबड आरवून मोकळ झालेलं असत . 

इकडे काही सुचत नसते . . . परंतु 

तिकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात 

६ : ०५  - - - - - -  ०६ / ०५ / २०१४  - - - -  मंगळवार 

कुसाळकर ब्रदर्स 

Monday, May 5, 2014

चिघळलेल्या जखमा अन ओघळणारे रक्त





चिघळलेल्या जखमा अन ओघळणारे रक्त 

सडलेली त्वचा अन त्यातून वाहणारा पु 

असह्य होणाऱ्या  वेदना अन त्यात वळवळणारे किडे 

विचारहीन मती  अन आकसलेली गती 


खोलवर धर्म रुतला आहे . . . 

खोलवर व्यक्तीचा प्रभाव गुतला आहे . . . 

खोलवर जातीद्वेष पसरला आहे . . . . 

खोलवर स्वार्थ जपला जात आहे . . . . 


मरतोय  एक अन उरतोय भलताच 

त्याग एकाचा अन भोगतोय भलताच 

इथे सिझरिंगचाच सल्ला , नैसर्गिक इथे काहीच नाय 

इथे देव हि अनेक धर्मात वाटलेला अन बाटलेला हाय ! 

१० : ३८ - - - - -  ०६ / ०५ / २०१४  - - - -  मंगळवार 

कुसाळकर ब्रदर्स 


Tuesday, April 29, 2014

परतीचा प्रवास . . . .




परतीचा प्रवास . . . . 

माघे वळून पाहणे 

अन स्वतःला  सावरणे 

सुरु झाला माझा परतीचा प्रवास 


अश्रूंना थोपवणे 

अन उर दडपून ठेवणे 

नजर चुकवीत सुरु झाला परतीचा प्रवास 


मला टाळणे 

अन तिला अनेक पर्याय असणे 

उपरा ठरून , सुरु झाला माझा परतीचा प्रवास 

१० ; ४० - - - - -  २९ / ०४ / २०१४ - - - - -  मंगळवार 

Wednesday, April 23, 2014

रात्र वैऱ्याची , मतदारांना पैसे देवून भूलवण्याची



रात्र वैऱ्याची , 
मतदारांना पैसे देवून भूलवण्याची 
लोकशाहीला पायदळी तुडवू पाहणाऱ्यांची . . . 

सभ्य , जाणते , उगवते , आशास्थानी असलेले नेते 
आज उद्या निर्ढावलेले गरीब गुरिबाना विकत घेणार 
त्यांचे बटबटीत चेहरे रात्रीच्या काळोखात मायाळू दिसणार 

सरकारच्या पैशावर यांची बायका मुले सुखासनी 
सरकारच्या भरवश्यावर आपली जनता वाऱ्यावरी 
एक दिवसाचा मतदार राजा अन तो एक दिवसाचा भिकारी 

गुंड , अशिक्षित , मवाली आज आहे शिक्षण महर्षी 
कधी काळी चपला उचलणारा आज आहे सहकार महर्षी 
भूखंड लाटतो , कर्ज बुडवतो , असते याची साखर कारखानदारी 

६५ वर्षे झाली , तू स्वतःला विकतच आलास 
६५ वर्षे झाली , तू हडकुळा अन तो संस्थानिक झाला 
चकणा, दारू,भेळ अन गांधी नोटेसाठी , तू तर आख्खा देश बुडवला 

रात्र वैऱ्याची आहे , आता तरी तू जागा रहा 
मत तुझे तू विकणार नाही , बायका मुलाची शपथ वहा 
तू बदल , देश बदलेल , 
देशाची दशा च नाही तुझी हि व्यथा बदलेल 

११: ५६ - - -- - १५ / ४ २०१४ - - - - - - मंगळवार    कुसाळकर ब्रदर्स 

Sunday, April 20, 2014

माणसाचा प्रवास हा " अतर्क्य " आहे . . .





ती माती खुणावते आहे , . . 

काळ निर्णय घेण्यास मजबूर करत आहे …. 

उलट्या पावलाने चालणे  आता भाग आहे 


तो डोंगर अन ती वळणाची वाट . . . . 

अन अवचित असाच कुणीतरी केलेला घात . . . . 

विसरून सारे , उगवत्याला नमस्कार करणे आहे 


जरी अंधारून आले , जरी हाडे ठिसूळ झाली 

जगण्यासाठीची अगतिकता 

……… अजूनही कायम आहे 


माणूस जन्मतो कुठे अन मरतो  कुठे ?

थेंब पडतो कुठे अन तो विरतो कुठे ?

माणसाचा प्रवास हा " अतर्क्य " आहे . . . 

८ ; ५५ am . .------- २१ / ०४ / २०१४ --------------सोमवार 

कुसाळकर ब्रदर्स