Tuesday, June 10, 2014

सरीवर सरी बरसाव्या , . . . . दाट कोंदाटून यावे . . .



सरीवर सरी बरसाव्या 

दाट कोंदाटून यावे . . . 

विजांचा कडकडाट  व्हावा . . . 

ढगांचा गडगडाट व्हावा . . . 

रस्ताही निर्मनुष्य व्हावा . . . 

अंगावर झेलत सरी . . . 

अन मनात तुझ्या आठवणी . . . 

मुक्त वाहू द्यावे वाटे अश्रूंनाहि . . 

एक एक पाऊल . . . 

एक एक आठवण 

विसरून सर्व काही . . . 

विसरून सर्व काही . . . .  

९ : ५३  - - - - - --  १० / ६ / २०१४  - - - - - - मंगळवार 

Monday, June 9, 2014

मी कविता करतो , . . .. पण " कविता " मला आवडत नाहीत



मी कविता करतो , पण " कविता " मला आवडत नाहीत  

आपली कविता स्वच्छंदी आहे , ती छंदातील नाही . . 

ती वळणा वळणाने जाणारी आहे , सरधोपट नाही 

त्यातले मला काही कळत  नाही , कळून सुद्धा घ्यायचे नाही . . . 

छापायच्याच नाहीत , कुणाला ऐकावायाच्याच नाहीत , त्यामुळे काही घोर नाही 

कविवर्यांच्या लोक चार हात दूर असतात याची मला जाण आहे . . 

जिथे ऐकणारा कान दिसतो , तिथे यांचे वाचन सुरु होते . . . . 

मी २५ वर्षापूर्वी अशीच एकाला , कविता शिकवली . . . 

त्याने मला " गुरु " मानलं  , मलाच कविता ऐकवू लागला . . 

मी तिथेच राहिलो , तो कविता संमेलन गाजवू लागला . . . 

आता तो मला हैराण करू लागला , नुसत्या कविता वाचून दाखवू लागला . . . 

माझी मुसिबत वाढली , त्याच्या वह्या वाढू लागल्या . . . 

कुठलीही कविता वाचणे , हि घोर शिक्षा वाटू लागली . . . 

त्यानेही ते ओळखले , त्यानेही त्याचा गुरु बदलला . . . 

आम्हीही " कवितेचा " नाद कायमचा सोडला . . . 

७ : ५९ pm - - - - - -  ६ /९/ २०१४ - - - - --  सोमवार 

ना " जय हिंद " म्हणूशी वाटत . . . ना " जय महाराष्ट्र " म्हनुशी वाटत . . . ..



ना " जय हिंद " म्हणूशी वाटत . . .  ना " जय महाराष्ट्र " म्हनुशी वाटत 

ना " छत्रपतींचा " जयजयकार करुशी  वाटत . . .  ना आंबेडकरांना " जय भीम " बोलुशी  वाटत . . . 

काही मंडळीनीच त्यावर मालकी मिळवल्या सारखे वाटत आहे , . . 

मोठ्या महा-पुरुषांना  खुजेपणा आणला आहे काही लोकांनी 

लुटायला देश सोडला नाही कि जात सोडली नाही 

बलत्कार करायला अबला सोडली नाही कि बाहुलीशी खेळणारी मुलगी सोडली नाही 

प्रत्येक धर्म आता शिव्यांचा कोठार  झाला आहे . . . 

तो ह्याला अन हा त्याला " खिंडीत " पकडू पाहत आहे 

विद्वेष पसरवणारी नवीन तंत्रे अन माध्यमे निर्माण झाली आहेत . . 

राजकारण आता प्राणाशी , जीवाशी खेळले जातंय . . . 

माशाला पकडायला आकडा टाकताना ज्या सहजतेने गांडूळाचा धारदार टोकाला लावले जाते 

त्याच सहजतेने गरिबाला मरण्यासाठी पुढे केले जात आहे 

कधी कधी हा देश फक्त काहींचाच वाटतो . . . 

कारण " काहीच " इथे सत्ता गाजवत आहेत , 

आपल्याच वैभवात , आपल्या मस्तीत , दिखाव्यात , राहत आहेत . . .  

आम्ही केवळ भरडली गेलेली , भरडण्यासाठी असलेली प्रजा . . .  

आमच्या देशाभिमानाला कसली आली आहे किमत , अन कसला आलाय गौरव ? 


९ / ६ / २०१४  - - - - -  १२ : ५३ Pm . . . , , ,   सोमवार 

Sunday, June 8, 2014

तरुणांच्या भविष्याला हे असले " खत - पाणी " कोण घालतय ?



एक धर्म आंधळा " तलवार " उपसतोय . . .

दुसरा धर्म मार्तंड तरुणांचे " माथे " भडकवतोय . . .

तिसरा धर्म- वेडा " बॉम्बस्पोट " करतोय . . .

चौथा धर्म-पिशाच्च " द्वेषभाव " वाढवतोय . . .

पाचवा नपुसंक विकृत होवून " गालबोट " लावतोय . . .

हे अचानक " तन " कसे काय माजले ?

ह्यांचा धर्म " कमी " कुठे पडला ?

जिकडे संधी तिकडे तोंड फिरवणाऱ्या " गांडूळाच्या " औलादी ह्या ?

तरुणांच्या भविष्याला हे असले " खत - पाणी " कोण घालतय ?

९ : ४ ४ - - - - -- ८ / ६ / २०१४ - -- - - - रविवार

Thursday, June 5, 2014



ती तशी खूप वेगळी होती . . . 

तशी ती खूप बोल्ड वाटायची , चालू हि वाटायची , पण . . . 

पण तो तिचा निरागसपणा होता अन माझा मूर्खपणा 

ती माझ्यावर प्रचंड इम्प्रेस झाली होति म्हणे . . . . 

पण तो तिचा भ्रम होता , हे हि तिने बोलून दाखवले होते . . . 

तिचे बोलणे खूप लाडिक होते , तिची लगट सहज होती . . . 

तशी ती माझी सहकारीच . . . . 

परंतु तिचे बोलणेच वेगळे , 

कधी अरॆ - कारे  नाही कि कधी अहो - काहो  नाही 

आपणाला , स्वतःला  , हे असेच काहीतरी  तिचे शब्द होते 

वेगळे , पण गोड वाटणारे तिचे बोलणे आकर्षित करत होते 

ती जवळ आली . . . 

तिला काय वाटले कुणास ठाऊक , 

ती दूर दूर राहू लागली 

मी नैराशेत असताना  

माझ्या अति आग्रहामुळे परत जवळ आली . . . . 

माझाकडून अगतिक झाली , निष्ठुर शब्द बांध  फुटला 

ती माझापासून कायमची दूर निघून गेली . . . 

गेले कित्येक वर्षे ती सावली शोधतो आहे . . . 

ती पडछाया दृष्टीआड जरूर गेली . . .  

पण अपराधीपणाची छाया अजून हि व्यापून आहे . . . 

तिला एकदाच  सॉरी बोलायचेय 

अपराधातून मुक्त व्हायचंय . . . .   

६ /६ / २०१४ - - - - - -  शुक्रवार - - - - -- -  १० : ०७ . . . .  




Monday, June 2, 2014

उठ , आता तू बंड कर . . जमलच तर त्याच्याशीच " सोयरिक " कर . . . .



 मुळात सारेच भटके . . .  आम्ही " राह " भटकल्यामुळे भटके 

मूळत: सारेच गुन्हेगार . . . आम्ही " पिंजऱ्यातून  मुक्त " म्हणून विमुक्त 

मुळात सारेच रानटी . . . आम्ही जास्तच " ढोसली " म्हणून वनवासी 

मुळात सारेच अत्याचारी . . .  आम्ही " झाकून ठेवले " म्हणून ते भारी 

मुळात सारेच गोजिरे  . . . आम्ही उन्हातले काळे अन ते सावलीतले  गोरे 

मुळात सारेच भिकारी . .  . आम्ही कामासाठी अन ते रक्ताचे भुकेले 

मुळात आम्हीही चतुर . . . आम्ही सुस्त होतो ते दाखवत सुटले 

मुळात आमचाही हक्क . . . आम्ही सहन केले , त्याने केला बलत्कार 

मुळात आम्हीच केले रक्षण . . . आम्ही झालो परागंदा , त्याने केले शोषण ( भक्षण ) 

त्याच्यात अन आपल्यात फरक काय ? . . . 

आपल्या महिलाकडे वाकडी नजर टाकताना त्याला त्याचे काहीच वाटत नाय 

उठ , आता तू बंड  कर . . . . 

जमलच तर त्याच्याशीच " सोयरिक " कर . . . . 

८ : ०७ pm - - - - - - -  २ / ६ / २०१४ - - - - - - - सोमवार 

Sunday, June 1, 2014

एक था कुसाळकर ब्रदर्स . . . एकटा कुसाळकर ब्रदर्स . . .



एक था कुसाळकर ब्रदर्स  . . . एकटा कुसाळकर ब्रदर्स . . . 

जो समाजाच्या गोष्टी करायचा . . . . 

जो सतत समाजाचा विचार करायचा . . .  


बऱ्याच  जणांना ते पटायचे नाही . . .  

बऱ्याच  जणांना ते रुचायाचे नाही . .  


बरेच जन गोड गोड बोलायचे . . . 

बरेच जण  स्तुती करत रहायचे . . . .  


खूप आव्हाने झेलले . . . . 

खूप जणांचा रोष ओढावून घेतला . . .  


दूर दूर पर्यंत पोहोचला 

सहभाग खूप कमी लोकांनी दाखवला . . . 


 जिंकला  तरीही हरला . . . 

अस्तित्व गमावून बसला . .  


एक था कुसाळकर ब्रदर्स  . . . एकटा कुसाळकर ब्रदर्स . . . 


१० : ३१ . . . . . १ / ६ / २०१४ . . . .  रविवार