Saturday, January 18, 2014

राम नवमी , श्रीकृष्ण अष्टमी , हनुमान जयंती , शिवरात्र , दत्त जयंती , गणेश जयंती




( ९ ऑगस्ट २०१२ ची हि जुनी पोस्ट  आहे . ) 

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा ...

आपण राम नवमी , श्रीकृष्ण अष्टमी , हनुमान जयंती , शिवरात्र , दत्त जयंती , गणेश जयंती इत्यादी इत्यादी अनेक प्रकारचे सोहळे , उत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरे करतो ...परंतु आपल्या पूर्वजांनी ज्या उद्देश्यानी हे सर्व " आखून " देलेले आहे त्या कडे आपण साफ दुर्लक्ष्य करतो ...ह्या मधील आध्यात्मिक अर्थ शोधण्याचा प्रयत्न आपण यत-किंचितही करतनाहीं ..

खरे तर देवाचा जन्मच संभवत नाहीं ...तो मूळचाच स्वयंसिद्ध आहे ..तो कुठल्या उपाधीला भूलेल असेही नाहीं ...त्यामुळे त्या सर्वेश्वराला जन्म मरणाच्या चक्रात आपण त्यांना अडकवायला नको ..संतानी एका ठिकाणी म्हटले आहे कि " देवा नाहीं रूप , देवा नाहीं रंग ...देवा नाहीं पाठ , देवा नाहीं पोट ...."

असे सोहळे साजरे करण्याचे कारण संपूर्ण समाजात एक सामाजिक संदेश पोहचावा व सर्वांचे अध्यात्मिक व पारलौकिक आयुष्य संपन्न व्हावे असा असावा..

आपण म्हणतो हिंदू धर्म खूप श्रेष्ठ आहे ..वगैरे वगैरे ...परंतु त्यातील रहस्य , गूढ अर्थ कळले तर ...अन्यथा ...हिंदू धर्म हा एक परंपरांचा , खुळचट कल्पनांचा , अनेक देवांचा , अनेक जातींचा , अनेक रुढींचा ...बुवा - बाबांचा सूळ सुळात असणाऱ्या तथागतीत धर्मगुरूंचा धर्म म्हणायला हवे ...बरे तri ह्यातील काही वाईट प्रथा बंद झाल्या ..सतीची चाल , विधवा विवाह निशिब्द , विधवा केशवपन , स्त्री शिक्षण ...गावा- गावातून चालणारी कोंबड्या - बकर्यांचे , मेंढ्यांचे बळी , त्यासाठी केले जाणारे नवस ...अशा एक ना अनेक तर्हा ह्या हिंदू धर्माचे अभिन्न भागच होत्या ..

.महाराष्ट्रात होवून गेलेल्या संतांचे , पुरोगामी विचार सरणीच्या श्रेष्ठ व कर्तृत्व वाण युग पुरुषांचे सामाजिक बदला मध्ये खूप मोठे योगदान आहे ...आपल्या सारख्या " शुद्र " म्हणून हिणवल्या गेलेल्या जातीसाठी तर त्यांचे योगदान बहुमोल आहे ...त्यांच्या मूळेच आपण आज विकासाची थोडी बहुत रसाळ फळे चाखत आहोत ....अजूनही विसंगती आहेत , फरक आहे ...परंतु आपण लोक हि जागृत आहोत ...

परत एकदा सांगतो ...हिंदू धर्म श्रेष्ठ आहेच ...परंतु त्यातील मर्म लक्ष्यात आले तरच ...अन्यथा अशा किती देवाच्या जयंत्या येतील व जातील ...

असो . ...परत एकदा सर्वाना शुभेच्छा

Friday, January 17, 2014

फेद्डोड....



शिण्याप्पुड (आंटे नाद वय १० उंड्या) आपुडद कथा उन्डाद....

मां फळ्यांम ला वागा फेद्डोड निल्चुतुड्या. सना थकाशिन्ड्या. वानिक इद्दार कोडकुल आन्न मुग्गुर आंड्बीऴ उंडीर. अन्दार्द फेंडली शेशी इचीन्ड्या. फ़ेद्दोन्द वडती फाडी फैन्ड्या. वार इद्दार्द वार मिन्दा सना जेम उंड्या. वडती इडशी फैनुट फेद्डोड सना खचाशी फैन्ड्या.... इद्दार सुखाम ला संसार शेस्तुन्डीर." वार इद्दार्द सुकुम देवून्क सुडाबुदि कालेद आन्केन वडती इड्शी फो".....इळा फाळ्यामोर आन्तुडीर.

बिळाद फेंडली आयिनुट फेद्डोड कडाक निल्चेतोड. फळ्यांमालोनी म्याकाल कादेंक फ़ैयेतोड. अंदाटलोणी दुड्लामिंदा वाड दिनाल तीसतुनड्या. फद्दीना ८ वाग्याळा अन्दारी म्यकाल येत्केन वाड शेरूला आणि शेनला फैयेतोड आंन मापाक ६ वाग्याळा वच्चेतोड. मां इंटल्या रोन्डू म्यकाल आन वागा शिन्या बोकुड उंड्या. मिम पण वान्तुकुडे म्याकाल इडशेतोम. वागा फिर फेद्डोड म्याकाल तुस्कुदेंक फेद्दोड वच्च्या.

मोम्मा वानिक " च्या तागी फो ......." अन्केन शेप्या. " लाग्गाना इ अम्मा ..... इबाद रवा उशीर आईनाद ......" फेद्दोड आन्या .....
" फेद्डोडा च्या आईनाद ...रव्वा थांबाय ....." मा अम्मा
रवा गडफद्तोन अम्मा वानिक च्या इच्या. वाड मेलामेलागा तागीगस म्याकाल येत्केन फो.

धीन्नाम वाड वच्चेतोड आन म्याकाळ तुस्केन फैतोड.

" आये फेद्डोड म्यकाल यक्कड येत्केन फोताड ?" ...नीन अम्माक अडगतीन ...
"शेरूला आन शेनला येत्का फोताड ..... मेशिगस येत्कास्ताड ....." ना अम्मां शेप्या ..
"नाक पण फ़ैयेद उन्दाड ...." नीन आटिन ...
" नु शाळा नेरू अण्णा ....." " फेद्डोड सना फानी शेस्ताड ..... वान बिळ वानतिक सुशेद लेर ......"
" आन्केन फेद्डोड फानी शेस्ताड ........" इला आनिगास ना आम्मा गप्प अय्या .... आणि शेप्पुदेंक आंट्या.......


"फेद्डोड खरेम सना कष्ट्याम शेशी बीळान फद्दावर शेश्या आणि वनीक इर बीळ येम इच्चीर? नाक सना वाईट वाटाशा . इद्दार बीळ वारद वारद फानी शेशिगस कडाक निल्चेतोर. वार फेद्दोनतिक सुडाकुन्डीर. वान बिळा वडतील फेद्दोंक येळा बी मांटलाडेतोर. वाणिक रोट्या सुद्धा तिन्देंक इचेत नेकुन्डेतोर. सना हाल उंड्या वान्द. फेद्दोन वडति आणि फेद्दोड बीळाइचाका इन्ता कष्ट्याम शेशी वानिक एम शिक्या?"

" इदार्द बीळाद फेंडली धूम-धामता शेशी इच्चा ..., मुग्गुर कुतुर्लु फेंडली शेश्या....... इन्ता शेशी वाड इंकाना हार मानाया लेद.........
वान वडती इप्पुड वानसंगा उंटे फेद्दोंक हान्ते आधार औउतुन्ड्या...... वाड वग्गाडे उन्डाड...इंत्ता अय्या तरी फेद्दोड हार मानाया लेकुंड्या. वान्द जिद्द खरेम मानाया बेक.

इबद अन्ता फळ्यांम फेद्दोन वळकास्ताद ...वान जिद्द इचाका... वान कष्ट्याम इचाका... वान बीळान आणि कोडालक अंदार तीट्टतार...... फेद्दोड म्याकाल काशी येळा ना दिनाल तीस्तुन्ड्या.... वान जिद्द नाक इप्पुड पण प्रेरणा इसताद.

........................शंकर माने / कुसाळकर ब्रदर्स

केसाला शाम्पू कसले ?, साधे तेल हि नाही ...




केसाला शाम्पू कसले ?, 

साधे तेल हि नाही ...


चेहऱ्यावर fair and lovely कसली ?, 


साधी ponds dream flower talk हि नाही ...


अंगावर ओढून घ्यायला shawl कुठली ?,


..हि तर आमच्या यम्माची ( आजीची ) नववारी सुती साडी ...


चेहऱ्यावरचे smile तर बघा ?


 ....जणू काही जगातील सर्वात सुखी हीच आहे .... 

. . . . . . . . . .  . कुसाळकर ब्रदर्स 

Thursday, January 16, 2014

वडिल हाच आधार , वडील हेच अस्तित्व व वडिलांचे असणे हीच सुरक्षिततेची भावना



( हि पोस्ट १२ एप्रिल २०१२ रोजी पोस्ट केली होती . . .आज पुनः पोस्ट करत आहे ) 

वडिल हाच  आधार ,  वडील हेच अस्तित्व व वडिलांचे असणे हीच सुरक्षिततेची भावना


आपल्याकडे वडिलाबद्दल फारच कमी बोलले जाते .आई बद्दल भरभरून बोलले जाते . आईचा महिमाही तसाच आहे , परन्तु आज वडिलाबद्दलच .

काल आमच्या एका धर्माच्या ताईला , त्यांच्या वडिलांची आठवण झाली .ते त्यांच्या वडिलांना " अन्ना " असे म्हणायचे . आम्हालाही आमचे वडील आठवले .आम्हीही त्यांना " अन्ना " असेच म्हणायचो .
आमच्या वडिला बद्दल पुन्हा कधी तरी लिहील परंतु " पुरुष हृदय " काय असते ह्याचा एक नमुना अवश्य सांगतो . 

१९७२ चा दुष्काळ होता , सूर्य अक्षरश: आग ओकत होता , पाण्यासाठी लोक कित्येक किलो मीटर अनवाणी जायचे . गावाचे सरपंचच काय गावाचे पाटील व गावातील प्रतिष्टीत लोक रोजगार हमीच्या कामावर काम करायचे . अमेरिकन लाल मका , मिलो व सुकडी वर संपूर्ण गुजराण चालायची ...उन्हाने जमिनी सहित माणसेही करपून गेली होती . कधी कधी नाहीं , घरात खाण्याची दररोज मारामार असायची ...उपाशी तपशी दिवस व रात्र काढणे तर नित्याचेच होते . मी तेंवा ६ / ७ वर्षांचा असेल , म्हणजे काहि कळण्याचे ते वय नव्हते . त्या दिवशी , कुठलातरी सण होता ..साजरा करायचे सोडून द्या , खायालाही काहि नव्हते ..

घरात खाणारी आम्ही सहा भावंडे व आई वडील ..शिळ्या तुकड्या वरून हि आम्हा भावंडात ओढा ओढी होत असे ..ते शिळे तुकडे हि शिल्लक नव्हते ..आई ने सांगितले , वडिलांना बघ म्हणून ....मी अनवाणीच दगड काटे तुडवीत ( तेंवा चप्पल असते हे काहि आम्हाला ठाऊक नव्हते ) मी दूर माळ रानावर वडिलांना एका दगडावर बसलेले पहिले ...आजू बाजूला दूर दूर पर्यंत कुणीच नव्हते ...जवळ जाऊन पाहतो तर आमचे आण्णा जोरजोरात ओक्सा- बोक्षी रडत होते ,..अगदी हंबरडा फोडूनच...मी हि त्यांच्या सुरात सूर मिळवला ...पण कळले काहीच नाहीं ...तो प्रसंग अजूनही मनात घर करून राहिलेला आहे ...रात्रीच्या अंधारात सगळे झोपी गेल्या नंतर एकटेच अंथरुणात विचार करत बसलेले वडील हि अजून आठवतात ...

......तर सांगायचा मुद्दा हा होता कि " पुरुष हृदय " हे विशाल वट ( वड ) वृक्षा सारखे असते ...वरून सर्व आलबेल दिसत असते ...सर्वांची काळजी घेत असते ..सर्वांची किलबिल ह्यांच्या हृदयाला फुटलेल्या फांद्यावर ,पानावर , फुलावर , फळावर सुरु असते ...आणि हे असते तटस्थ , कुठल्याही भावना मनातल्या मनात जिरवून ....ओरबड नार्यांचा त्रास सहन करत , ओरखडे देणाराकडे अगतिकपणे पाहत...आतल्या आत कुजून ..वरून जरी हिरवेगार दिसत असले तरी आतून पूर्ण चिंता रुपी किड्या मुंग्यांनी पोखरलेले असतात ....अन एक दिवस ...काहि कळायच्या आत धाडदिशी उन्मळून पडतात ....कोसळतात ......नंतर आपल्याला कळते ...अरे आपण पोरके जालोय ...आपले आकाशच हरवले आहे ....आपल्या पंखाना जरी बळ आलेले असले ,..तरी , पाय स्थिर पणे ठेवावेत असा आधारच राहिला नाहीं ....आमचाही आधार असाच ८ वर्ष पूर्वी निघून गेला ...आता राहून राहून वाटतंय " आण्णा " आता असते तर बरे झाले असते .......असो

.......आमची एक मल्याळंम मैत्रीण आहे. सध्या एका मोठ्या mnc कंपनी मध्ये मोठ्या व जबाबदार पदावर कार्यरत आहे . आम्ही काही वर्षे एकमेकांचे सहकारी होतो .दोन वर्षा पूर्वी तिच्या ( त्यांच्या ) वडिलांचे निधन झाले . वडील अचानक गेले . एकुलती असल्या मुळे ( व एकूणच सासुरवाशीण मुलींचा वडिलावर जास्त प्रेम असते ... ) ते दुख: तिला पचवायला जड गेले. गेल्या वर्षी वर्ष श्राद्ध असल्यामुळे सगळे नातेवाईक एकत्र (कदाचित ) शेवटचे जमणार होते ....मी तिचे दुख: हलके करण्यासाठी व वडिलांचे मोठेपण शब्द बद्ध करण्यासाठी मी माझ्या वडिलांना समोर धरून काही ओळी लिहिल्या होत्या ...कदाचित शब्द प्रभावी नसतील हि , परंतु भाव पुरेपूर भरलेला आहे .... किंवा दोष असेल तर माझ्या मांडणीत असावा ...

हमने आसमान को हिलते - गिरते देखा है
हमने हमारे आँखों से सागर बहते देखा है
हमारे प्यार का साया हटके हमें अब घुप नशीब हुई हैं
आप कहा हो पप्पा ?......हमारा चलाना मुश्किल हो गया हैं

आप के होते , हम कितने बेफिक्र थे
जिंदगी से, ज़माने से
आप के होते ,हम कितने खुशहाल थे
अपने आप से , अपने आप me
आप कहा हो पप्पा ?........हमारा हसना मुश्किल हो गया हैं

आप की यादे धुंदली सी होती जा रही हैं
हर एक आनेवाला दिन अब तो कल में तब्दील हो रहा है
किसी मोड़ पर हम अपने आप को देखते हैं तो......
तो पता चलता हैं .आपने हमारे लिए कितना कुछ किया
आपके संस्कार,आपके विचारो पे हमें फक्र हैं ,नाज हैं
(लेकिन ) आप कहा हो पप्पा ?......हममे कुछ कमिया आ गयी हैं ...

आपकी उंगली पकड़ के हम बड़े हुए ,आपके कन्धो पे खेले-कूधे
आपने हर मुश्किल को ,हमारे लिए बांध के रखा ,...हमको खरोच तक नहीं आने दी
आपने आपके आंसू खुद पीके ,हमें इस मक़ाम तक ले आये
आप कहा हो पप्पा ?.. देखो हममे कुछ समज आ गयी है

आप कहा हो पप्पा?......हमारी नज़रे आप को दुंद रही है

आप कहा हो पप्पा? .......देखो तो हम सब इक जगह जमा हुयें है

आप कहा हो पप्पा ?.....नन्हे नन्हें हाथ आपसे कुछ मांग रहे है

आप कहा हो पप्पा ?.....अब हमारी बारी है ,आप के लिए कुछ करने की

हम को इक मौका दो पप्पा ........आप कहा हो ?

५.०० .....................रविवार........................ १० / ०४ / २०११

संघटनेसाठी " कुसाळकर ब्रदर्स " ह्यांच्याकडून काही मार्गदर्शक मुद्दे



संघटनेसाठी " कुसाळकर ब्रदर्स " ह्यांच्याकडून काही मार्गदर्शक मुद्दे

( १ ) सर्व समाज बांधवाना आपल्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची त्यांच्या समाजकार्य व कौटुंबिक पार्श्वभूमी सहित माहिती करून द्यायला हवी . त्यांचे संघटनेतील स्थान , त्यांचा संपर्काचा पत्ता व त्यांचा संपर्क क्रमांक इत्यादी तपशील असावेत .

( २ ) संघटनेचे " उदिष्टे " व निश्षित केलेले " ध्येय " हे स्पष्टपणे अधोरेखित केलेले असावेत .

( ३ ) संघटनेची वर्षभराची करणाऱ्या / हाती घेणाऱ्या कामांची " कार्यक्रम - पत्रिका " हि अगोदरच तयार असावी .

( ४ ) संघटनेचे " आर्थिक धोरण " हे सुस्पष्ट असावे , संघटना हि आर्थिक - दृष्ट्या सक्षम असावी व त्यासाठी आर्थिक फंड उभे करण्यासाठी संघटने अंतर्गत एक जबाबदार समितीचे गठन करावे जेणे करून आयत्या वेळी माननीय अध्यक्षावर वा इतरावर आर्थिक बोजा पडू नये .

( ५ ) संघटने मध्ये एखादे बाहेरून सल्ले देणारे " सल्लागार मंडळ " अथवा एखादी " टीम " असेल तर त्या मंडळाने ने फक्त संघटनेच्या कार्यकारिणी शी धोरणात्मक दृष्ट्या चर्चा / मार्गदर्शन करावे व संघटनेच्या अंतर्गत कारभारात ढवळा - ढवळ करू नये . ( तशी संघटनेने पूर्ण वेळ जबाबदारी सोपवली असेल तर काहीच हरकत नाही )

( ६ ) पार्ट - टाइम अगर " on - duty " संघटनेचे कार्य करणे ह्या मुळे आपण संघटनेच्या कार्याला पूर्ण न्याय देवू शकत नाही व त्या मुळे संघटनेची वाढी ची गती व कार्य थांबते . संघटने मध्ये काही पदे व काही कर्मचारी हे पगारी हवेत त्यासाठी संघटने कडे आर्थिक धोरण व राखीव निधी हवा . ( ज्यांचा संघटनेच्या कार्य पद्धतीशी कर्तव्य नसून त्यांना सोपवलेल्या कामाशी निष्ठा असली पाहिजे )
.

( ७ ) कुठलेही उदिष्ट्य हे पूर्ण करण्यासाठी एकट्याचे प्रयत्न अपुरे पडत असतात त्यामुळे supporting टीम व back - up टीम असणे खूप गरजेचे आहे .

( ८ ) जबाबदाऱ्या ह्या वाटून घेतल्या पाहिजेत त्याचे व्यवस्थित distrubution झाले पाहिजे .

( ९ ) पदाधिकाऱ्याना व जबाबदार कार्यकर्त्यांना जेवड्या शक्य आहेत तेवढ्या powars दिल्या पाहिजेत .

( १ ० ) पदाधिकारी व जबाबदारी सोपवलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्य-कक्षेच्या मर्यादेत decision making चे अधिकार द्यायला हवेत .

( १ १ ) decision making अर्थात निर्णय प्रक्रिया हि कार्यकर्ता , पदाधिकारी , अध्यक्ष अशा पद्धतीने असावी व मधल्या जबाबदार व्यक्तीला decision making मध्ये गाळू नये नये त्यामुळे दुर्लक्षिले गेल्याची भवन निर्माण होवून व्यक्ती बद्दल व पर्यायाने संघटने बद्दल आपुलकी जिव्हाळा कमी होण्याची शक्यता आहे .

( १ २ ) संघटनेच्या अध्यक्षा पर्यंत सामान्य कार्यकर्त्याने केलेल्या कार्याची माहिती नियोजन बद्ध रित्या व step by step ने गेलीच पाहिजे व त्याची दखल अध्यक्षा - सहित संघटनेच्या पदाधिकार्यांनी घ्यायला हवी . तशी रचना बनवायला हवा , तशी पद्धती स्वीकारायला हवी .

( १ ३ ) संघटनेने घेतलेले निर्णय , सूचना , आदेश हे संघटनेच्या अधिकृत पत्रा मार्फत शेवटच्या कार्यकर्त्या पर्यंत , समाज बांधवा पर्यंत पोहोचली पाहिजे .

( १ ४ ) प्रत्येक जबाबदार कार्यकर्त्याचे कार्याची saparate file बनवली गेली पाहिजे व त्याला उत्तेजन / प्रोत्साहन दिले गेले पाहिजे .

( १ ५ ) कार्यकर्ता आर्थिक दृष्ट्या संपन्न कसा होईल व तो आर्थिक विवंचनेत न राहता समाज कार्यात कसा जास्तीत जास्त सहभाग घेईल हे संघटनेने त्यांच्या क्षमतेत पाहायला पाहिजे .

( १ ६ ) काही कार्यकर्त्यामुळे संघटनेची तसेच समाजाची बदनामी होत असेल तर संघटनेने त्याची त्वरित दखल घेतली पाहिजे व अशांना प्रसंगी समज देवून व गंभीर प्रसंगी संघटनेच्या बाहेर काढून संघटनेची प्रतिमा सतत जपली पाहिजे .

( १ ७ ) संघटने कडून नित्य नियमाने ठराविक दिवस , ठराविक उत्सव व ठराविक कार्यक्रम हे घेतलेच गेले पाहिजेत व त्याच्या तारखा ह्या पूर्व - नियोजित अथवा ठरलेल्याच असाव्यात .

( १ ८ ) संघटने कडून समाजातील जेष्टांचा , समाजातील विशेष कार्य केलेल्या गुणवंतांचा , महिलांचा व मुलांचा सत्कार हा वर्षातून एकदा ठराविक दिवशी घेतलाच गेला पाहिजे .

( १ ९ ) संघटनेच्या नावावर शिष्य - वृत्ती , उच्च - शिक्षणसाठी मदत , अभ्यस - दौरे इ. कार्यक्रम आखले गेले पाहिजेत .

( २ ० ) समाजातील वृद्ध , विधवा , निराधार कुटुंबीय बद्दल संघटनेचे उदार धोरण अवलंबून त्यांचा आधार बनले पाहिजे . तसे आपल्या संघटनेच्या घटने मध्ये त्यांना स्थान दिले पाहिजे

( २ १ ) समाजातील सर्व थरातील व्यक्तींना समाज प्रबोधन होईल असे / समाजाच्या हिताचे निर्णय पोहोचतील ह्या साठी प्रसिद्धी विभाग अथवा जाहिरात ह्या संबंधी सु - निश्षित असे दूरदृष्टीचे धोरण हवे .

( २ २ ) स्थानीय शाखा , तसेच तालुका / जिल्हा संपर्क कार्यालये व मुख्य संपर्क कार्यालय हे संघटनेच्या मालकीची अथवा भाड्याने अथवा तात्पुरत्या स्वरुपात असतील तर ते मुख्य संघटनेच्या नावावर असावेत .

( २ ३ ) स्थानिक / तालुका / जिल्हा वा कुठलेही कार्यालय हे कुणाच्याही घरात असू नये व व त्यावर कुणा एकाची मालकी आहे असे स्वरूप येवू नये . ते संघटनेच्या वाढीच्या दृष्टीने हानिकारक आहे . ( कधी तेथील स्थानिक पदाधिकारी बदलला तर संपूर्ण शाखेवरच त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे . )

( २ ४ ) कुठलेही पद देताना त्याची संपती , त्याचा दिखाऊपणा , त्याचे मौखिक बोलणे ह्यावर न जाता … त्याला समाजाबद्दल असलेली तळमळ , तो समाजासाठी करत असलेले संघटन , त्यासाठी गोळा करत असलेले दस्त-ऐवज , व त्याची प्रामाणिकता , चारित्र्य व समर्पण करण्याची वृत्ती ह्या गोष्टी पाहून दिली जावीत .

( २ ५ ) कार्यकर्त्याची / पदाधिकार्याची मूल्यमापनाची आधारभूत अशी व्यवस्था संघटनेत हवी व त्या आधारे त्यांना जबाबदारी व अधिकार देवून कुणावर हि संघटनेत अन्याय होत नाही हि भावना रुजवावी .

( २ ६ ) खुशामत , चापलुसी , नेत्यांच्या पुढे पुढे करून त्यांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करणारे , बुद्धी - भेद करणाऱ्या व्यक्ती ह्या समाजासाठी तसेच संघटनेच्या वाढी साठी खूप अडचणीच्या असतात त्यामुळे त्यांना संघटनेच्या कार्य कक्षेतून नेहमी बाजूला ठेवावे .

( २ ७ ) संघटने मध्ये महिलांना विशेष व आदराचे , सन्मानाचे व बरोबरीचे स्थान हवे . त्यानाही जबाबदारीची पदे व अधिकार असायला हवेत . व संघटनेतील महिलाकडे विशेष आदराने पहिले जावे ह्याची दक्षता घेतली गेली पाहिजे .

( २ ८ ) आपल्या संघटनेला सहायभूत ठरतील अशा व्यक्ती , संस्था व अनेक राजकीय पक्ष , अशांना आपल्या संघटनेचे पर्यायाने आपल्या समाजाचे हित - चिंतक म्हणून जोडता आले पाहिजे .

( २ ९ ) कुणीही कार्यकर्ता , पदाधिकारी संघटनेच्या महत्वाच्या मिटींगला येताना योग्य ती सर्व कागद पत्रे , टिप्पणे , मुद्दे ह्यांच्या सर्व तयारी निशी आले पाहिजे व आपले म्हणणे मुद्दे सूद व प्रभावीपणे मांडले पाहिजेत .

( ३ ० ) सर्व आदरणीय व्यक्ती ह्या मीटिंग ला वेळात वेळ काढून आलेल्या असतात त्या मुळे आपण कुठल्या कारणासाठी एकत्र आलो आहोत त्याचे भान असणे गरजेचे आहे त्यामुळे निष्कारण विनोद करणे व बाष्कळ बडबड करणे टाळलेच पाहिजे .

( ३ १ ) मत - भेदानंतर हि निष्कर्षावर येता आले पाहिजे व आपल्या विचारात लवचिकता असली पाहिजे व सर्वांच्या समाधानासाठी " आपले तेच खरे " हा टोकाचा विचाराला मुरड घातली पाहिजे . सर्वाना सोबत घेताना ह्या गुणाचा अंगीकार करणे खूप गरजेचे आहे .

( ३ २ ) नव्या पिढीला व नवीन तरुणांना संघटनेत काम करायला संधी मिळावी म्हणून जेष्ठ व्यक्तींनी काळाची पाऊले ओळखून त्यांना संधी दिली पाहिजे .

( ३ ३ ) आपल्याला संघटने मध्ये पदाधिकारी म्हणून काम करायला संधी नाही मिळाली तरी त्यामुळे नेतृत्वावरील आपला विश्वास कायम राहायला हवा . नेतृत्वाने देखील योग्य ते बदल करून सामान्य कार्यकर्त्याच्या नेतृत्व गुणाला संधी दिली पाहिजे .

( ३ ४ ) आर्थिक योगदानाशिवाय कुठलेही संघटन योग्य रित्या कार्य करू शकत नाही म्हणून संघटनेतील प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून नियमित पणेआर्थिक भर हा उचललाच पाहिजे . व ऐनवेळी पैसे गोळाकरायचे टाळले पाहिजे .

( ३ ५ ) एखाद्या गरीब कुटुंबात मयत झाली अथवा एखाद्या गरीब कुटुंबातील लग्न आर्थिक कारणाने अडत असेल तर स्थानिक संघटना अंतर्गत शाखांना आपल्या अधिकारात आपल्या राखीव रक्कमेतून अशी मदत आपल्या गरीब वडार बांधवाना करता आली पाहिजे .

( ३ ६ ) सरकारी कामाचा पाठपुरावा करण्यासाठी सक्षम , जाणकार व त्या कामाला वेळ व न्याय देणाऱ्या कार्यकर्त्याची निवड केली जावी ( मान्य झालेल्या मागण्या , सरकारी अध्यादेश , मंत्र्यांना करावयाचा पाठ - पुरावा इ, )

( ३ ७ ) समाजाच्या हितासाठी काही मुद्द्यावर न्यायालयीन लढाई करावी लागते , मुद्द्यावर आधारित दीर्घकालीन लढाई साठी आपल्याकडे ( संघटनेकडे ) तसे धोरण हवे व आपल्या समाजातील सक्षम अशा वकिलांची मदत आपण ह्या कामी घेतली पाहिजे .

( ३ ८ ) संघटनेच्या नावावर कुणीही आपला वैयक्तिक अजेंडा अथवा स्वताला present करण्याचा प्रयत्न करू नयेत . हि वृत्ती संघटनेसाठी , संघटनेच्या वाढीसाठी हानिकारक / घातक ठरते .

" वडार समाज चारीटेबल ट्रस्ट " ह्या संस्थे विषयी थोडक्यात माहिती . . . .





" वडार समाज चारीटेबल ट्रस्ट  " ह्या संस्थे विषयी थोडक्यात माहिती . . . .


" वडार समाज चारीटेबल ट्रस्ट  " हि संस्था फेसबुक वरील वडार समाजावर प्रेम असणाऱ्या व वडार समाजात विकास व शिक्षणापासून वंचित राहिलेल्या गोर - गरीब वडार समाज बांधवांसाठी कार्य करू इच्छिणाऱ्या वडार समाज बांधवानी स्थापलेली आहे . हि शिक्षण , आरोग्य व सामाजिक जाणीवा निर्माण करण्यासाठी विशेष कार्य करणार आहे .
संस्थेची संस्था स्थापण्याची प्रक्रिया हि नोव्हेंबर २०१२ ला झाली व संस्थेला मूर्त स्वरूप २० मी २०१३ आले . संस्थेत सभासद हे महाराष्ट्रातील दूर दूर चे आहेत व ह्याचे क्षेत्रही ( आपल्या मर्यादेत ) महाराष्ट्रभर कार्य करण्याचे ठरलेले आहे
संस्थेचे सर्व सभासद हे व्यावसायिक , नोकरदार व कुठलाही राजकीय दृष्टीकोन न ठेवता फक्त वडार समाजा अंतर्गत सामाजिक कार्य करण्यासाठी एकत्रित आलेले आहेत व आम्हाला स्वतासाठी कुठलाही नाव - लौकिक अथवा मोठेपणा नको आहे . आम्ही आर्थिक स्वरुपात व शक्य तितक्या तनाने व मनानेही समाज कार्यात सहभागी होण्याचा संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत . आम्ही आम्हाला संस्थेकडून कुठलाही आर्थिक लाभाची अपेक्षा ठेवत नाहीत व भविष्यात हि ठेवण्याचे काही कारण नाही कारण समाजाकडून आम्हाला काही नको आहे परंतु समाजाला आमचे जे " देणे " आहे असे जे आम्ही समजतो , त्यासाठीच आमचे प्रयत्न आहेत .

संस्थेत सर्व सभासद  हे प्रत्येकी रु . ५००/- प्रत्येक महिन्याला काढतात . रु. १००/- व प्रती दिन १/- रुपया हा हि स्वाभिमानी वडार समाज बांधव म्हणून आम्ही पर्याय ठेवला आहे . आर्थिक गोष्टी शिवाय परिवर्तनाच्या गोष्टी करणे म्हणजे स्वप्नातील दुनियेत वावरण्या  सारखे आहे . म्हणून आम्ही " स्व-सहभागातून समाज विकास " हे आपले ब्रीद - वाक्य ठरवले आहे व त्या माध्यमातून सामाजिक कार्य जेवढे शक्य होईल तेवढे करण्याचे ठरवले आहे . वडार समाजाला आपल्या समाजातील गरीब कुटुंबियांना वस्तू रूपाने / वह्या पुस्तकांच्या रूपाने / मदत करणे खूप गरजेचे आहे व त्यासाठी व त्या गरीब लोकासाठी सर्व समाज बांधवांचे  येणे खूप गरजेचे आहे .
१ ) आम्ही गेले तीन वर्षे फेसबुक ह्या सोशल मिडिया च्या माध्यमातून हजारो लोक जोडलेले आहेत . असे कार्य करणारे फेसबुक केवळ आपणच आहोत व ह्याच कार्याला आपल्या वडार समाज बांधवानीही खूप भरभरून प्रतिसाद दिला आहे , त्या प्रतिसादावरून च प्रेरणा घेवून हे संस्थेचे कार्य सुरु झाले आहे . विभिन्न क्षेत्रातील उच्च पदावरील व्यक्ती पासून नव्या दमाच्या तरुणा पर्यंत सर्व लोक ह्यात सामील आहेत . त्यामुळे वडार समाजात सामाजिक अभिसरणाचे एक ऐतेहासिक कार्य हे  आहे . असे कार्य पूर्वी कधी झाले नव्हते व आज हि अन्य कुणीही करत नाही म्हणून ह्याचे हे विशेष वैशिष्टे आहे . हेच कार्य आपले सर्वात मोठे आहे व ते पुढे जवून वडार समाजासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास वाटतो .
२ ) आपल्या समाजातील एक मुष्टी योदद्धा श्री राहुल धोत्रे ह्या अनेक पदके व नाव - लौकिक मिळवलेल्या परंतु आर्थिक बाबत गरीब असलेल्या तरुणासाठी आपण त्याच्या खुरकाचा  खर्च आपल्या संस्थे मार्फत करत आहोत . आम्हाला राहुल चा खास अभिमान आहे व भविष्यात तो वडार समाजाचे नाव मोठे करील हा स्वार्थ हि त्यामागे आहे . राष्ट्रीय पातळीवर व देश पातळीवर नाव लौकिक मिळवण्याची क्षमता असणाऱ्या आपल्या समाजातील तरुणांना प्रोत्साहन देणे हा हि आपल्या संस्थेच्या धोरणाचा एक भाग आहे .
३ ) आपल्या संस्थेकडून इयत्ता दहावीतील महाराष्ट्रातील मुला - मुलीसाठी प्रोत्साहन म्हणून व आपले विध्यार्थी हे मेरीट लिस्ट मध्ये जास्तीत जास्त यावे ह्या एकमेव कारणामुळे संस्थेकडून स्कॉलरशिप योजना सुरु करत आहोत . ह्या योजने अंतर्गत ९५ % च्या पुढे मार्क्स मिळतील त्या विध्यार्थ्याला आपल्या एका देणगीदार बांधवाकडून रोख ( चेक ने ) रु. ५०'०००/- देण्यात येणार आहेत व ९० % च्या पुढे मार्क्स मिळतील त्या विध्यार्थ्याला रु. २५'०००/- देण्यात येतील . काही लोकांचा ( अर्थात संस्थे बाहेरील ) रोख रक्कम देण्याला विरोध आहे परंतु आम्ही म्हटल्या प्रमाणे आपल्या समाजातील बुद्धिवंत हिरे हे समाजासमोर आणण्याचे हे केवळ एक मध्यम आहे . पुढे भविष्यात अजून हि ह्यात काही बदल होतील व त्याची व्याप्ती वाढवण्यात येईल . समाज बांधवांची साथ लाभली तर शिक्षण क्षेत्रात खूप चांगले कार्य होऊ शकते . आपण दूर दृष्टीने विचार करून चालले पाहिजे .
४ ) संस्थे तर्फे समाज प्रबोधन व सामाजिक हितासाठी आम्ही काही ग्रुप चालवतो . त्यातील काहीना चांगला प्रतिसाद आहे व काही ग्रुप प्रतिसादा अभावी थंड पडलेले आहेत परंतु आमचे प्रयत्न चालू असतात .
 फेसबुक वरील समाजोपयोगी ग्रुप्स : 

१) वडार समाज : सरकारी योजना व सवलती
२) वडार समाज :सामाजिक चळवळ व संघटन
३) वडार समाज :आरोग्य विषयक
४) वडार समाज :वधू-वर सूचक
५)वडार समाज : महिला विशेष
६) वडार समाज :रोजगार व रोजगाराच्या संधी
७)  वडार समाज : अध्यात्मिक 

५ ) संस्थेच्या सभासदासाठी ' संदर्भ ग्रंथ " म्हणून सर्व धर्माच्या महा पुरुषांची , पुरोगामी विचारांच्या युग पुरुषांची , आधुनिक विचारांच्या सुधारक लेखकांची तसेच ऐतेहासिक , सामाजिक , कायदे विषयक पुस्तके / ग्रंथ ह्यांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत . तसे काही ग्रंथ आपल्या संग्रहात जमा झालेले आहेत . आपल्या वडार समाजाचे पुस्तकांचा संपूर्ण संग्रह करण्याचा आपला मानस आहे .
भविष्यकालीन योजना :
१ ) " वडार समाज चारीटेबल ट्रस्ट  " तर्फे प्रत्येक वर्षी " वडार समाज भूषण " हा पुरस्कार समाजातील केवळ एका कर्तृत्ववान व्यक्तीला देणे
२ ) जागतिक महिला दिनाचे निम्मित साधून आपल्या वडार समाजातील कर्तृत्ववान  महिलांचा सत्कार व योग्य तो आदर करण्याचा योग जुळवून  आणणे .
३ ) पुढील  शैक्षणिक  वर्षा पासून आपल्या वडार समाजातील विद्यार्थ्यांना वह्या , पुस्तके , पेन , पेन्सिल इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करणे .
४ ) आपले एक जेष्ठ बांधव श्री राजूअण्णा  जाधव साहेब हे प्रत्येक वर्षी मातृदिन साजरा करत असतात व आपण हि त्या पासून प्रेरणा घेवून आपल्या संस्थे मार्फत एक मातृदिनाचा एक कार्यक्रम आयोजित करून किमान पाच मातांना त्यांचा शालू वगैरे देवून सन्मान करण्याचा प्रयत्न करणार आहोत . ह्यात सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे . आपल्या  कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर त्या मातेचा सन्मान समाजाकडून झाला तर त्या मातेला आयुष्याला पूर्णत्व प्राप्त झाल्या सारखे होईल .
५ ) अनाथ मुले व त्यांचा शिक्षणाचा खर्च , बेघर , बेसहारा वृद्ध व विधवा ह्या प्रश्नावर हि संस्थेच्या मर्यादेत कार्य करण्याचा मानस आहे .
टीप : आम्ही कुणाही धनिका कडून मोठी  रक्कम  स्वीकारण्याचे आपल्या संस्थेचे धोरण नाही . आपण चेकनेच व्यवहार करतो व सर्वांनी आपला अल्पसा वाटा समाजासाठी द्यावा हेच आपले मुख्य धोरण आहे . सरकारी मदत स्वीकारणे अथवा NGO अशा माध्यमातून पैसा गोळा करणे हे हि आपले उद्दिष्ट्य नाही आहे . त्यामुळे आपली संस्था हि फक्त सभासदांच्या येणाऱ्या पैशावर चालते व संस्थेकडे निधीच्या मर्यादा आहेत व त्या मर्यादेतच संस्था काम करते . संस्थाकडून भरीव कामाची अपेक्षा असेल तर समाज बांधवांचा त्याला प्रतिसाद हि तसाच  हवा .

a

एका वडारणीचा दुर्दैवी अंत व मृत्यू नंतरही तिची झालेली दुर्दशा......( १८ वर्षा खालील मुलांनी वाचू नये .)