Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Tuesday, November 4, 2014




वडार समाज दिवाळी अंक २०१४ च्या प्रकाशन सोहळ्यातील माझे प्रास्ताविकाचे भाषण :

महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज , महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे खर्या अर्थाने महात्मा असलेले ज्यांच्या कार्यामुळे , त्यागामुळे आज बहुजन बोलता झाला आहे असे ज्योतिबा फुले , वंचीताना खर्या अर्थाने प्रत्यक्ष आरक्षण देवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा ज्यांनी प्रथम प्रयत्न केले ते रयतेचे राजे श्री शाहू छत्रपती महाराज , तसेच खर्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले व शाहू महाराज यांच्या अत्यंत कडवा संघर्ष करत , दुखी लोकांचा कैवार घेत ज्यांनी २० २० / बावीस बावीस तास ज्ञान साधनेत घालवले व भारताला एक सशक्त अशी राज्य घटना मिळवून दिली , आमच्या सारख्यांचे आयुष्य बदलून टाकले , आमच्या जीवनात अमुलाग्र बदल्ज्यांच्यामुळे घडून आला ते डॉ बाबासाहेब आंबेडकर . . . . या सर्व महान आदरणीय विभूतीना अभिवादन करतो . . .

वडार समाजाचे आद्य दैवत असलेले , श्री बजरंग बळी अर्थात मारुती , हनुमंत , , , ज्यांची भक्ती , शक्ती व युक्ती हे मुख्य गुण आहेत . . . ज्याची लीनता , नम्रता हि एक आदर्श समजली जाते , ज्यांची शक्ती हि पहाडालाही उचलण्याची क्षमता राखते , ज्यांची युक्ती रावणाच्या लंकेलाही बेचिराख करून टाकते . . अशा या अनादी वडार समाजाच्या देवतेला आम्ही नमस्कार करतो . . . बजरंग बळीचा व आमच्या वडार समाजाचा संबंध हा लंकेच्या अंतिम स्वारी साठी तयार करण्यात आलेल्या सेतू निर्मिती च्या अगोदर पासून असावा . . . आमच्या वडार समाजाचा मूळ व्यवसाय बंधारे बांधणे , पूल बंधने , किल्ले , राजवाडे बांधणे हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे , आमच्या वडार समाजाची श्री बजरंग बळी बरोबर असलेली नैसर्गिक attachment व सेतू निर्मिती याचा वडार समाजाशी नक्कीच निकटचा संबंध असावा . . असो . .

संत साहित्याचे गाढे अभ्यासक , श्री सदानंद मोरे सर , जे कि या वर्षीच्या साहित्य संमेलनाचे मुख्य व प्रबळ दावेदार आहेत , ते संमेलनाचे अध्यक्ष होणार हि फक्त औपचारिकता बाकी आहे . . त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा व आगाऊ अभिनंदन ! ! ! . .

ज्यांच्या पहिलेच भाषण ऐकून आम्ही दिवानेच झालो , लाह्या जशा तडातडा उडतात , तसे हे बोलायला लागले कि शब्द तडातडा उडतात व शब्दांच्या चौकार / षटकारांची निव्वळ आषातबाजी असे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्य समीक्षक , चिकित्सक डॉ श्रीपाल सबनीस सर . . . .

दैनिक सकाळचे माजी संपादक असलेले , एक व्यासंगी श्री अरुण खोले सर , दैनिक सकाळ मध्ये रविवार सप्तरंग पुरवणीचे साहित्य पुरवणी प्रमुख श्री विनायक लिमये . .

वडार समाजाचे एक यशस्वी उद्योजक असलेले श्री राजु अण्णा जाधव साहेब  जे आमच्या बरोबर वडार समाज चारीटेबल या संस्थेच्या स्थापणे पासून आहेत . .

कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी विशेष योगदान असलेले श्री संजय सोनवणी सर , चपराक मासिक / साप्ताहिकाचे श्री घनशाम पाटील व अन्य उपस्थित मान्यवर . . . पत्रकार , साहित्य क्षेत्रातील जेष्ठ व अधिकारी व्यक्ती असलेल्या सर्वांचे. .

तसेच वडार समाज दिवाळी अंक २०१४ या अंकाच्या प्रकाशनासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या वडार समाज बांधवानो मी आपले स्वागत करतो , आपणास मी अभिवादन करतो . . .

खरे तर हा प्रकाशन सोहळा आपण काल १२ तारखेला बालगंधर्व येथे जून महिन्यातच बुकिंग करून ठरवला होता , परंतु निवडणुकीचे वातावरण असल्याकारणाने आपण तो रहित केला होता . . .
प्रकाशन सोहळाच रद्द केला होता , फक्त आमचे वैचारिक दैवत असलेले श्री सोनवणी सर , नरके सर यांना दिवाळी अंक देवून व त्याचे फेसबुक वर फोटो टाकून आम्ही अत्यंत साध्या पद्धतीने करणार होतो . .. परंतु . . .

परंतु . . हा अतिशय छान मुखपृष्ठ लाभलेला आपल्या पहिलाच अंक बनवण्यात ज्यांचे मोलाचे योगदान आहे ते श्री घनशाम पाटील यांनी अक्षरशः आम्हाला सांगितले कि तुमचा हा प्रथम अंक झाला आहे व तो खूप चांगला झाला आहे त्यामुळे तुम्ही छोटासा का होईना परंतु कार्यक्रम घ्या . . ते गरजेचे आहे . . .

मी त्यांना सांगितले कि मी सोनवणी सर यांच्याबरोबर बोलून सर्व ठरवतो . . .

सोनवणी सरांनी त्यावर कडीच केली . . .त्यांनी लगेच इथे पत्रकार भवन ला फोन करून उपलब्ध दिवस पाहून आज चे बिकिंग तत्काळ करून टाकले . . पुढे फोनाफोनी सुरु झाली . . डॉ श्रीपाल सबनीस सर हे आमचे हक्काचे होते , त्यांना आम्ही गृहीत धरूनच चाललो होतो , श्री हरी नरके सर पुण्यात असले तर . . .त्यानाही गृहीत धरूनच चाललो होतो . . .पुढे श्री मोरे सरांना फोन लावण्यात आला , त्यांचा होकार घेतला , श्री अरुण खोरे सर हे सोनवणी सरांच्या नित्य संपर्कातील आहेत त्यामुळे त्यांचाही होकार लगेच मिळाला ,

मला सोनवणी सरांनी विचारले विनायक लिमये यांना ओळखता का ? . मी म्हणालो . . त्यांचे लेखन मी खूप पूर्वी पासून वाचत आलेलो आहे . . . सोनवणी सरांनी त्यांना हि फोन करून त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले . .

त्यामुळे , हा कार्यक्रम होण्यात श्री संजय सोनवणी सर व श्री घनशाम पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे त्यामुळे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो व त्यांचे मनपूर्वक आभार मानतो . . .

. . . . आमच्या वडार समाजात या अगोदर असा दिवाळी अंक कधीच निघाला नव्हता , निघाला नसावा . . आम्हाला असे वाटले कि . . . आमच्या वडार समाजात खूप प्रतिभावान व्यक्ती आहेत , परंतु स्वताचे व्यासपीठ / विचारपीठ नसल्या कारणाने आम्हाला अभिव्यक्त होण्यासाठी कुठलाही मार्ग दूर दूर पर्यंत दिसत नव्हता . . .वैचारिक , सम - विचारी लोक एकत्र आले पाहिजे असे राहून राहून वाटत होते . . वडार समाजाची , वडार समाजात सुधारणा घडवायचे असेल तर शिक्षणासोबत वैचारिक बैठक खूप महत्वाची असते हे मनाला माहित होते परंतु समोर कुठलाही मार्ग दिसत नव्हता . ..

दिवाळी अंक हे outdated माध्यम आहे असे माझे हि मत होते कारण ८० / ९० च्या दशकात दिवाळी अंकाची ज्या आतुरतेने वाट पाहत होतो ते गेल्या १० / २० वर्षात माझ्या बाबत झाले नव्हते . . .

परंतु गरज हि शोधाची जननी आहे असे काहीतरी म्हटले जाते , त्यामुळे दिवाळी अंक काढायचे ठरले व या वडार समाज दिवाळी अंकात आपण प्रतिभावान अशा जवळ जवळ २० लेखकांचे लेख समाविष्ठ केले आहेत . . . ( सोनवणी सर व नरके सर वगळता . . .ते आमचे वडार समाजाचे हितचिंतक आहेत . . )

आज या दिवाळी अंकासाठी वडार समाजाच्या महिलांनी लेखन केलेले आहे , ज्यात यशस्वी उद्योजिका / व्यावसायिक आहेत , एक शिक्षिका आहेत तर एक उत्तम गृहिणी असलेली महिलाही लिहिती झालेली आहे . . . हि या दिवाळी अंकाची एक उपलब्धी आहे कि या माध्यमातून महिलाही लिहित्या झालेल्या आहेत , स्वतःला अभिव्यक्त करू लागल्या आहेत . .

आमचा एक विध्यार्थी आहे हणमंत कुऱ्हाडे , २० / २२ वर्षाचा हा तरणाबांड मुलाच्या दोन कथा आपण यात टाकलेल्या आहेत . . त्या विनोदी कथा आहेत . . ज्या कुठल्याही दिवाळी अंकातील कथेच्या तोडीस तोड आहेत याची मला पूर्ण खात्री आहे . . कारण ज्यांनी ती वाचली आहे , त्यातील प्रसंग आठवून ते आतल्या आत खुदुखुदू हसत असतील . . . अशी भन्नाट जमून आलेली ती कथा केवळ वडार समाजात असलेल्या प्रतिभे मुलेच झाले आहे . . .

आमचे एक जेष्ठ समाज बांधव आहेत , जे एक जेष्ठ लेखक आहेत , ७७ वर्षाचे त्यांचे आयुर्मान आहे . . त्यांचे २/३ पुस्तके प्रकाशित झालेले आहेत . . त्यातील एकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कर हि प्राप्त झालेला आहे . . . त्यांची पाटी - पेन्सिल हि कथा खूप प्रबोधनात्मक असून ती प्रत्येक वडार कुटुंबात वाचली जावी एवढे त्या कथेत दम आहे . .

मराठी साहित्य निर्मितीत अथवा साहित्यिक योगदानात वडार समाज प्रतिभेत कमी नाही याची प्रचीती वरील लघु कथा वाचल्यानंतर लेच लक्षात येईल . .

अजून हि बऱ्याच वडार समाज बांधवांचे लेख यात आहेत . . .ते विद्वान आहेत , अभ्यासू आहेत , संशोधक वृत्तीचे आहेत . .

वडार समाजाला . . . अन्य समाजाने भूतकाळात गावाच्या बाहेर ठेवून खरे तर खूप अन्याय केला होता , शेतीचा कुठलाही आधार नसलेला हा समाज खाण्यासाठी हि हवालदिल असायचा , त्याच्या अंगावर नीट कपडे हि नसायचे , . . भर उन्हात त्वचा करपून जाई पर्यंत कष्ट . . .अशा अवस्थेत या समाजाला अन्य समाजाने कुचेष्टेचा विषय भूतकाळात बनवला होता , . . व्यसनाला लावून या वडार समाजाला मानसिक दृष्ट्या अक्षरशः खच्ची करण्यात आलेले होते . . . परंतु चांगले जीवन जगण्याची संधी कधी मिळाली नव्हती . . अर्थात ती संधी मिळाली फुले शाहू आंबेडकर यांच्या त्याग पूर्ण संघर्षातून . . .

आज हि काही ठिकाणी , गाव खेड्या मध्ये वडार समाजातील कुटुंबाना कुचेष्टेने पहिले जाते , संबोधले जाते , . . काळ्या वड्या , . . वडाऱ्या चा पोरगा अशा अपरोधिक / उपरोधिक शब्दात हेटाळणी केली जाते . . जी कि मनाला दुखावून जाते , ,

परंतु काहींच्या पूर्व ग्रह व दुषित विचारांना फाटा देतील असे आमच्या वडार समाजात हि चांगल्या व्यक्ती झालेल्या आहेत . संत परंपरा आमच्या वडार समाजाला सुद्धा आहे . . मी सुद्धा माळकरी आहे . . .. श्री मोरे सर लगेच समजून घेतील . . .सर मी आनंद संप्रदायाचा अनुग्रह प्राप्त झालेला सच्चा वारकरी आहे . . मी अध्यात्मिक वृत्ती असलेला एक वडार सामाजाचा व्यक्ती आहे . . .

जिथे वडार समजा हा फक्त व्यसनी , अंधश्रधाळू अशी वडार समाजाची प्रतिमा निर्माण करण्यात आलेली आहे त्याच वडार समाजात सोलापूर येथे एक संतत्व लाभलेली व्यक्ती होवून गेलेली आहे . . ते संतत्व लाभलेली व्यक्ती म्हणजे वैकुंठवासी हरी भक्त पारायण श्री लक्षण महाराज होत . . . त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षण संस्था स्थापन केल्या , मंदिरे बांधली , अंधश्रद्धा निर्मुलनासाठी मोठे काम केले . . . .त्यांचे हे कार्य सर्व वडार समाज बांधावा पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेले नाही . . .ते पोहोचणे खूप गरजेचे आहे . . .म्हणून आमचा हा दिवाळी अंकाचा प्रयत्न आहे . . .

उपलब्ध माध्यमातून आम्ही वडार समाजाची माहिती सर्व समाज बांधावा पर्यंत आम्ही पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहोत . .

वडार समाजावर गुन्हेगार हा शिक्का होता . . आज हि काही ठिकाणी तो आहे . . . काही प्रमाणात तो खरा हि आहे . . .कबुल . . . कबूल आहे मला तरी . . .

परंतु मला असा एक समाज सांगा . . ज्यात गुन्हेगार झालेले नाहीत ?. . . ज्यात बलत्कारी झालेले नाहीत ?, . . ज्यात अत्याचारी झालेले नाहीत ?. . शोषण करणारे झालेले नाहीत . ?. . पिळवणूक करणारे झालेले नाहीत . . ?

मराठा समाजात असे अत्याचारी , बलात्कारी माणसे झाली नाहीत , ब्राह्मण समाजात असे अत्याचारी लोक झाले नाहीत ? अन्य समाजात असे गुन्हेगार प्रवृतीचे लोक नाहीत ?

मी नावा सहित दाखवून देवू शकतो . . .. परंतु इथे बदनाम एकालाच व्हायचे असते . . . ते अगोदरच ठरलेले असते . . तो शिक्का अगोदरच कुणाच्या तरी मात्थ्यावर लावलेला आसतो . . .

गरज आहे आप आपले माथे जागेवर ठेवायची . . . कलुषित विचार डोक्यातून घालवायची . . .गुन्हेगार म्हणून कुणी जन्माला येत असतो का ? . . .येत असतो कुणी गुन्हेगार म्हणून जन्माला ? . . .नसेल तर जातीला कशाला बदनाम करता ?

जे गुन्हेगार असतील , . . त्यांना फासावर लटकवा . अथवा त्यांची खांडोळी खांडोळी करून टाका . . .परंतु देवा हो त्याचा जातीशी संबंध लावू नका . . .

मला माफ करा . . .मी जातीचे जरी बोलत असलो तरी मी जातीयवादी बिलकुल नाही . . . कट्टर तर अजिबातच नाही . . . मी एक संवेदनशील व्यक्ती आहे . . . मला माणसा - माणसातिलच नाही तर पशु - पक्षी , वृक्ष , पाने - फुले यांच्याशीही एक वैश्विक दृष्टीकोनातून पाहण्याची शिकवण भेटलेली आहे . . . .हे विश्वची माझे घर या संतांच्या शिकवणुकीवर माझा विश्वास आहे . . .तोच विचार मी हळूहळू समाजात सोडू पाहत आहे . .

आम्ही काही निवडक फेसबुक वरील समविचारी समाज बांधवानी मिळून एक संस्था स्थापन केलेली आहे . . .वडार समाज चारीटेबल ट्रस्ट या नावाने . . .त्या माध्यमातून आम्ही आमचे उद्योगधंदे सांबाळून सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत . . .

संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षी प्रथम एक १२ पानी कॅलेंडर प्रकाशित केले होते व त्यात समाजाविषयीची अत्यंत महत्वपूर्ण माहिती प्रथमच प्रकाशित केली होती ,

८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही वडार समाजात प्रथमच एक महिला मेळावा मुंबई येथे घेतला होता व तो यशस्वी करून दाखवला होता कारण वडार समाजात केवळ महिलांना एकत्र आणणे हे वडार समाजाच्या इतिहासात कुणालाच जमले नव्हते . . .

२० मे २०१४ रोजी आपल्या संस्थेच्या प्रथम वर्धापन दिना निमित्त आपण बालगंधर्व रंगमंदिर येथे खूप चांगला कार्यक्रम घेऊन . .महाराष्ट्रातील वडार समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान घडवून आणला होता . . .वडार समाज भूषण पुरस्कार देवून महाराष्ट्रातील वडार समाज बांधवाचा गौरव करणारे सुद्धा आपली संस्थाच प्रथम आहे . . .

२० मे च्या कार्यक्रमात आम्ही दिवाळी अंक काढणार असे घोषित केले होते . . त्यासाठी उचललेले पावूल आम्ही दमदार पणे ठेवलेले आहे ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून येत असेल . . . दिवाळी अंक कसा झालाय त्यावरून कळून येत असेल . .

वडार समाज चारीटेबल ट्रस्ट या आपल्या संस्थेला भविष्यात वडार समाजातील गोर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी काम करायचे आहे , . . पालकांचा आधार नसलेल्या विध्यार्थ्यांना मदतीचा हात द्यायचा आहे . . तरुण मुलांना उच्च शिक्षणासाठी , स्पर्धा परीक्षा साठी मदत करायची आहे , जमल्यास एखादी शिक्षण संस्थेची उभारणी करायची आहे ,. . .. वैचारिक मंथनातून वडार समाजातील अंधाश्रधा व व्यसनाधीनता कमी करायची आहे . . .

सोनवणी सर , मी तुम्हाला माझी खंत बोलून दाखवत होतो . . .खरंच मला खंत आहे सर , . . मी माझ्या २० मे च्या प्रास्ताविक भाषणात बोललो होतो कि . . .माझा संदर्भ लक्षात येतो का पहा सर . . . मध्यमवर्गीय समाज , ज्यांना आपण एकत्रित केले होते . . त्यांचा मला समाजासाठी उपयोग करून घ्यायचा आहे . .. परंतु मला खेदाने संगुशी वाटतंय सर . . त्या कार्यक्रमातील फक्त एक जन श्री सचिन पवार हेच केवळ संस्थेशी जुडले गेलेले आहेत . . . त्यानंतर कुणीही संस्थेच्या कुठल्या व्यक्तीशी अथवा अन्य कुणाशी कसलाही संपर्क ठेवलेला नाही . . .

मी हि माझी खंत व्यक्त केलेली आहे , हो . . मी थोडा निराश झालेलो आहे , , त्या निराशेमुळे हतबल हि झालेलो आहे . . .तुम्ही माझी धावपळ , पळापळ पाहत आहात . . .. दिवसरात्र या दिवाळी अंकाच्या निर्मिती मागे गेलेला आहे , तहान हि विसरलो होतो व वेळेत जेवत हि नव्हतो . . परंतु जेंव्हा कुणी आपल्या निष्टेवर प्रश्न चिन्ह निर्माण करतो तेंव्हा खूप त्रास होतो . . .जेंव्हा एखादा म्हणतो मी समाजाच्या नावावर धंदा करतोय , पैसे उकळतोय. . तेंव्हा खूप नैराश्य येते . .

असो . . असे असले तरी मी खूप नशीबवान आहे , मला खूप लोकांचे प्रेम मिळालेले आहे , त्यामुळे त्या प्रेमाच्या जोरावर माझे या पुढील पावूल हि जोमदार व जोरदारच असेल . .

दिवाळी अंकाच्या निमित्ताने आपण सर्व आलात , मोठ्या विचारवंताचे विचार ऐकण्याचे भाग्य आपणास मिळणार आहे , . . ते आपण शांत चिताने ऐकावेत अशी मी आपणास विनंती करतो व माझे प्रास्ताविक संपवतो . . .

जय बजरंग . . . . जय वडार . . .

जय हिंद . . .जय महाराष्ट्र

Sunday, June 22, 2014

बडा हुवा तो क्या हुवा , जैसा पेड खजूर ? . . . .. . पंथी को छाव नही , फल लागे अति दूर ।




बडा हुवा तो क्या हुवा , जैसा पेड खजूर ?

पंथी को छाव नही , फल लागे अति दूर । 

नारळ , खजूर , या सारखे काही झाडे असतात ती खूप उंच वाढतात , त्यांची फळे खूप चांगली असतात , मधुर असतात , त्यांची स्वताची अशी खास गोडी असते परंतु दुर्दैव असे असते कि ते हाताला लागतील अशा अंतरावर नसतात . 
…. अशा झाडा जवळ गेल्यानंतर व्यक्ती कितीही भुकेला , थकलेला , तहानलेला असेल तरी त्याला त्याचा थोडा थकवटा घालवण्यासाठी , त्याला ह्या झाडाखाली उन्हापासून सरंक्षण होईल अशी सावली सुद्धा मिळत नाही . उंचावर पाहिले तर गोड अशी फळे दिसत असतात परंतु अनेक प्रयत्ना नंतर ते हाताला लागत नाहीत व शेवटी अशा झाडाजवळ गेल्या नंतर पदरी निराशाच पडते . 

वरील उपमा हि अशाच वृत्तीच्या लोकासाठी वापरली गेलेली आहे , काही व्यक्तींचे खूप नाव झालेले असते , त्यांच्या भोवती प्रसिद्धीचे वलय असते परंतु अशा व्यक्तींच्या जवळ गेल्यानंतर खूप भ्रम निराशा होते , एवढी कि असल्या व्यक्ती बद्दल पुढे पुढे अन्तर च ठेवूशी वाटते …

…. कारण ती व्यक्ती आपल्यासाठी व समाजासाठी हि काहीही कामाची , उपयोगाची नसते . समाजापासून अथवा जमिनीपासून आपली नाळ तुटलेली असते व त्यांच्या वाढलेल्या अपेक्षांना समाज पुरे पडत नसतो . असो . 

या बाबतीत मला काही बालपणाच्या गोष्टी आठवतात , ज्या निसर्गाच्या सानिध्यात मी वाढलो , रानावनात , जंगलात हिंडलो , बागडलो त्यातील काही अनुभव मला ह्या बाबत आपणाशी शेयर करुशी वाटत आहेत . 

मी लहानपणी जेंव्हा डोंगरात , जंगलात , शेतात , रानावनात फिरायचो तेंव्हा अनेक गावरान मेवा व फळांचा आस्वाद घ्यायचो . रान फळामध्ये मला खूप आवडणारे फळ म्हणजे निवडुंगाचे बोडं , बोरे , चिंच आंबे इत्यादी . 

निवडुंगाच्या बोंडाची गंमत अशी होती कि ते मिळवण्यासाठी शोधण्यासाठी जंगलात खूप आत पर्यंत जावे लागत असे , निवडुंगाचे झाड जरी सापडले तरी त्यावर आलेले पिकलेले बोडं शोधणे हे अनुभवाचे काम असते . निवडुंगाच्या झाड हे खूप अडचणी मध्ये असते , त्याच्या आजू बाजूला काही सरपटणारे प्राणी असण्याची खूप शक्यता असते . त्यातून हि मार्ग काढून मधुर अशा बोंडा पर्यंत पोहोचायचे म्हणजे निवडुंगाच्या काट्यांचे ओरखडे हे ठरलेलेच . बर्याच प्रयत्नांनी असे एखादे बोंड मिळवले व ते खाण्याला सुरुवात करायची म्हटले तर ते आहे तसेच खाता येत नाही कारण त्यावर खूप काटे असतात व ते बाजूला करून आतील लाल लाल मधुर फळ चाखायची मजा काही औरच असते . हि गोष्ट इथेच संपत नाही आतल्या लाल गरामध्ये सुद्धा अति सूक्ष्म काटेरी जिभेला भयंकर टोचणारी असे काटे असतात . इथे हि अनुभव च कामी येतो . जो अनुभवी व्यक्ती , माहितगार असतो केवळ तोच ह्या निवडुंगाची फळे चाखण्यात यशस्वी होतो व मधुर फळाचा आस्वाद घेवू शकतो . 

आम्ही रानात फिरताना आम्हाला बोराची कुठली झाडे आंबट , कुठली तुरट , कुठली किड्यांनी भरलेले व कुठले मधुर , गोड , व चव टिकून राहणारी होती , हे आम्हाला खूप चांगले माहित असायचे . आम्ही एका चांगल्या पिकलेल्या बोरासाठी अनेक प्रयत्न करून ते मिळवायचोच . आणि त्याच वेळी जी आंबट , कडू व किडकी फळे असलेल्या झाडांकडे आम्ही चुकून सुद्धा पाहत नव्हतो . 

हीच गोष्ट चिंचेच्या झाडाची . ज्या चिंचेच्या झाडाला चवदार व आंबट गोड चव असेल त्याच झाडाकडे आमचे लक्ष असायचे परंतु अत्यंत आंबट , कडवट असणाऱ्या झाडावर चिंचा लगडलेल्या तर दिसत असायच्या परंतु त्या चिंचेच्या झाडाचे अंगभूत गुण सगळ्यांना माहित असल्यामुळे कुणी तिकडे फिरकत हि नसायचे . 

अगदी तशीच गोष्ट आंब्याच्या झाडांची , काही झाडांना येणारे आंबे हे बारीक असायचे परंतु त्याची चव अशी काही असायची कि कितीही उंचावर पाडाचा आंबा दिसला कि तो आमच्या हातून सुटत नव्हता . परंतु काही आंब्याची झाडे नुसतेच मोठाले परंतु चवीला आंबट तर काहींच्या नुसत्याच कोया मोठ्या , आकाराला आंबा मोठा परंतु रसाला काहीच नसायचा , काही आंब्यांच्या झाडाला येणारे आंबे हे खूप केसाळ तंतुमय त्यामुळे आम्ही त्या झाडाकडे लक्षच देत नसायचो . 

. . . . . . मला आज असाच एक समाजाचा मोठे नाव असलेला माणूस भेटला परंतु त्यांचे समाजा बद्दलचे विचार ऐकून मी खूप विचारात पडलो .एवढे नाव कमावलेला माणूस आहे , ज्याचे नाव समाज खूप आदराने घेत आहे परंतु त्याचे समाजा बद्दलचे विचार ऐकून आमचे मन कडवट झाले . 

नारळ व खजूर हि फळे तशी आरोग्य व शरीराच्या पोषकतेच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहेत , त्याची फळे हि तंत्राने मिळवता येतात , असली झाडे हे अहंकाराने ताडा-माडा सारखी उंचच उंच वाढलेली असली तरी ती फळे त्यांच्या उपयोगतेते मुळे आपण अनेक प्रयत्न करून मिळवू शकतो …परन्तु ?? ? ? 

……. परंतु तुरट , कडवट ,आंबट , किडक्या फळाप्रमाणे समाजातील काही व्यक्तींचे आपण आपला म्हणून खूप गुणगान गातो परंतु त्यांचा समाजाला कितीसा लाभ भेटतो हे पाहिले कि प्रश्न चिन्हच उभे राहते . 

एक मराठी म्हण आहे व एका जुन्या मराठी चित्रपटामध्ये एक डायलॉग होता . . 

" सर्जा , तुझा काहीहि उपयोग नाही , तू खायला काळ आणि भुईला भार आहेस " 

समाजासाठी हि अशा काही भार असलेल्यांचा समाजाने जास्त विचार करू नये व काही कडू / आंबट झाडांकडे जसे आपण दुर्लक्ष करतो तसे यांना जास्त किमत न देता चांगल्या लोकांच्या शोधात रहावे . 

आपल्या विचाराने , वागण्याने गोडवा निर्माण करणाऱ्या दुर्मिळ व्यक्तींना समाजाने डोक्यावर घ्यावे . 

Friday, June 20, 2014

क्षण क्षणा हा ची करावा विचार | तरावया पार भव सिंधु । |



क्षण क्षणा हा ची करावा विचार | तरावया पार भव सिंधु । |

नाशिवंत देह जाणार सकळ | आयुष्य खातो काळ सावधान । |

संत समागमी धरावी आवडी । करावी तातडी परमार्थाची । ।

तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे । नका डोळे धुरे भरुनी राहो । ।

---------------- संत तुकाराम महाराज

आपले हिंदू धर्म शास्त्र हे प्रामुख्याने कर्म सिद्धांतावर आधारलेले आहे , त्यातील मुख्य धर्म ग्रंथ म्हणून आपण " श्रीमद भागवतगीता " ग्रंथाला विशेष महत्व देतो व त्यातील युध्द भूमीवरील श्रीकृष्ण - अर्जुन संवाद म्हणजे अध्यात्मातील अतिउच्च अनुभव आहे . व त्यात अर्जुन आपल्या भावंडाना / नातलग / जेष्ठ व वंदनीय गुरु समान व्यक्तींना युद्धासाठी आपल्या समोर पाहून भांबाहून जातो . अशा पार्श्वभूमीवर अर्जुनाला केलेला श्रीकृष्णाने उपदेश म्हणजेच गीता होय , ह्या गीतेला आधुनिक संत विनोबा भावे " गीताई " असे म्हणत , महात्मा गांधीनी सुद्धा शेवटपर्यंत आपल्या आयुष्याचा आदर्श म्हणून गीतेलाच सर्वोच्च स्थान दिले होते व ते त्याचे रोज नित्य नियमाने पठाण करत असत . लोकमान्य टिळकांची विद्वत्ता व त्यांचा व्यासंग व त्यांचे अध्यात्मातील श्रेष्ट्त्व अनुभवायचे असेल तर त्यांनी लिहिलेल्या " श्रीमदगीतारहस्य " अर्थात कर्मयोग शास्त्र हा गीतेवरील भाष्य करणारा ग्रंथ अवश्य पहावा . लोकमान्य टिळक तर ठासून सांगतात कि सर्वात श्रेष्ठ हे कर्मच आहे व गीतेमध्ये सुद्धा तोच विषय प्रतिपादित केलेला आहे .

आपल्या महाराष्ट्रातील संत कुळातील संत महात्म्यांनी सुद्धा कर्माला अधिकाधिक महत्व देवून ते सामान्य जणावर बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे , संत तुकाराम महाराज ह्या अभंगात आपल्याला कर्मच कसे श्रेष्ठ आहे व आपण क्षणा - क्षणाला त्याचा कसा विचार केला पाहिजे व का विसर पडू दिला नाही पाहिजे हे हे सांगत आहेत . संतानी आपल्या अभंगात अनेक ठिकाणी असे लिहून ठेवलेले आहे कि कर्म हे तीन प्रकारचे असतात. ( १ ) प्रारब्ध ( २ ) संचित ( ३ ) क्रियमाण असे तीन प्रकार होत . प्रारब्ध व संचित हे पूर्व कर्मानुसार प्राप्त होणारे फलित असतात परंतु क्रियमाण म्हणजेच वर्तमानात अर्थात सद्यस्थितीला जे आपण कर्म करत असतो ते होय . एखादी व्यक्ती हि दैवहीन , धनहीन , व गरीब असू शकते त्याला आपले पुढील आयुष्य शेवट पर्यंत चांगल्या पद्धतीने जगायचे असल्यास , त्याचे व्यावाहारार्थाने म्हातारपण चांगले जावे असे वाटत असल्यास व त्यानंतर हि आपल्या जीवनाची व शरीराची आबाळ होऊ नये असे वाटत असल्यास त्याने आपले वर्तमानातले क्रियमाण हे सतत चांगले ठेवले पाहिजे व सतत कार्यरत राहिले पाहिजे . अध्यात्माच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास आपल्या आत्म्याला ईश्वराचे अनुभूती मिळून आपल्या आत्म्याला पुढील जन्मी चांगली जन्मयोनी प्राप्त होवून आपल्या आत्म्याला मोक्ष - प्राप्ती मिळावी असा आहे . मोक्ष - प्राप्ती जरी खूप लांबची गोष्ट असली तri , आहे हे आयुष्य सुसह्य होवून आपल्याला शेवट पर्यंत आयुष्य सुख - समाधानात , आनंदात घालवता आले तरी खूप आहे .

म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कि आपण आपला क्षणा क्षणाला विचार करावयाला हवा जेणे करून आपले हे अनंत अडचणीचे , मायावी , सदा दुख : भरलेले आयुष्य व्यवस्थित पार करता येईल . खरे पाहता आपले शरीर हे पूर्णत: नाशिवंत आहे , हा देह पाच पंचमहाभूताने बनलेला आहे , आकाश , वायू , अग्नी , जल व पृथ्वी हे जसे आपल्याला दृष्टी गोचर आहेत तसेच ते आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म व स्थूल रुपात आहेत , सात्विक , राजस ,व तामस ह्या मायिक त्रिगुणांनी व पंच महाभूतानि युक्त हा देह क्षणा - क्षणाला आपले रंग-रूप पालटत असतो . क्षणा -क्षणाला काही पेशी तयार होवून क्षणा - क्षणाला काही पेशी मृत होत असतात . वात , कफ , पित्त ह्या दोषांनी कधीही आक्रमण केले तर ह्या शरीराचे पूर्ण संतुलन बिघडून जाते व बऱ्याचदा अवकाळी मृत्यूलाही सामोरे जावे लागते . आयुष्याच्या शेवटी हि हे शरीर ज्या ३६ तत्वांनी बनलेले असते ती तत्वे त्याच्या त्याच्या संबंदित मूळ तत्वाला मिळून जातात . आकाश तत्व आकाश रुपी होवून जाते , वायू तत्व वायूला जावून मिळते , अग्नी तत्व सूर्य रूप होते , जल तत्व जलतत्वात समाविष्ट होते बाकी जे हाड - काडे वाचतात ते भूमीशी एकरूप होवून जातात व अशा प्रकारे आपले म्हणून जे काय आपण सांभाळलेले असते ते शेवटी काहीच राहत नाही .

आपल्या मानवाचे व एकूणच प्रत्येक जीवाचे असे एक आयुष्यमान ठरलेले असते . तेवढे आयुष्य झाले कि त्याला ह्या जगाचा निरोप घ्यावाच लागतो . परंतु त्यातील बरचसे दिवस हे असेच वाया जात असतात . १ ५ / २ ० वर्षे हे बालपणातच जातात , पुढील १ ५ / २ ० वर्षे हे जवानी अर्थात तरुणपणात म्हणजेच " मी पणा " करण्यात जातात . शेवटचे १ ५ / २ ० वर्षे हे अंथरूण धरून म्हातारपणात जातात व ह्या काळात आपलीच मुले आपली लायकी काढत असतात , हिडीस - फिडीस करत राहतात , डोळ्यातून पाणी काढण्याशिवाय पर्याय नसतो व त्या म्हातारपणात काय करावे तर कुठलेही इंद्रिये निट काम करत नसतात . ह्या म्हातार्या माणसाची लोक " जायचीच " वाट पाहत असतात . अशातच ४ ० / ४ ५ च्या काळात लोकांना थोडेफार शहाणपण आलेले असते परंतु त्यांना संसार व " वारस " ह्यांची जास्त फिकीर असते व माणूस स्वताकडे पूर्ण दुर्लक्ष्य करतो व शेवटी त्याच्या आयुष्याची परवडच होते , शोकांतिका होते म्हणून संत तुकाराम महाराज आपल्या सर्वाना " सावधान " करत आहेत …क़ि बाबानो तुमचे आयुष्य संपत चाललेले आहे आता तरी तुम्ही सावध व्हा , आता तरी तुम्ही संतांची संगती धरा , आता तरी तुम्ही विचार करा कि ह्या आयुष्यात नुसतेच भवरा होएउन फिरायचे कि आपल्या स्व - स्वरुपाची ओळख करून घ्यायची ? ( माणसाने / व्यक्तीने असा विचार हा तरुण असल्या पासूनच करायला पाहिजे , तरुण पणात त्याच्या अंगी ताकद असते , शरीर पाहिजे त्या गोष्टीला साथ देत असते , काळ हि अनुकूल असतो , फक्त संगती हि संत - सज्जनाची असावी )

संत हे ढोबळ अर्थाने व्यक्तीला संबोधित असले तरी संत हि उपमा जे अध्यात्म जाणतात त्यांना माहित आहे कि ती संज्ञा हि व्यक्तीला नसून " ज्ञानाला " आहे . व्यक्ती हि प्रकृती स्वरूप असल्याकारणाने त्या मध्ये अनेक विकृती असण्याचा संभव असतो . परंतु हे ज्ञान हे हि काही असामान्य अशा संत महात्म्याकडेच असते , म्हणून त्यांच्या कृपा , दया , करुणारुपी सहवासात ह्या ज्ञानाची आवड मनात धरावी .

परमार्थ ह्या शब्दाची फोड परम + अर्थ = परम अर्थ अशी आहे , परम म्हणजे अति उच्च , अगदी शेवटचे , सर्वात शेवटचे ,सर्वोच्च , उत्तम ( ह्या नावाचे काही शब्द पहा ,… परमेश्वर , परमवीर ( चक्र ) , परमात्मा , परम कॉम्पुटर ( भारतातील सर्वात शक्तिशाली कॉम्पुटर ) परमधाम इ . इ . ) . तर परमार्थ ह्या शब्दाचा अर्थ ह्या विश्वाचे जे गुह्य आहे , ह्या विश्वाच्या ईश्वराला जाणून घेण्याचे जे साधन आहे ते म्हणजे ज्ञान होय व त्या ज्ञानाच्या आधारानेच संत संगत धरून आपण ते ज्ञान प्राप्त करून घेवू शकतो व ते ज्ञान प्राप्त झाल्यामुळे सर्व सामान्य साधक विपरीत / प्रतिकूल परिस्थितीत हि सर्वांशी प्रेमाने , सौदार्हाने वागून आपले जीवन समाधानाने व्यतीत करू शकतो .

परंतु शेवटी संत तुकाराम महाराज आपल्याला सावध करत आहेत कि ,… ह्या इहलोकीच्या व्यवहारात म्हणजे , आपल्या जगात / समाजात विभिन्न प्रकारचे लोक असतात , अनेक वृत्तीचे / प्रकृतीच्या व्यक्ती असतात , मोहवणारे अनेक क्षण येतात , लालसा निर्माण करून गोत्यात आणणारे अनेक प्रसंग उद्भवत असतात , प्रलोभने , विषय - वासना ह्या मुद्दाम हून सज्जनाच्या अवती भोवती येत असतात अशा वेळी भक्ताने / सज्जनाने सदा सजग व सावध राहायला हवे , कामांध व्यक्तीला जसे काम तृप्ती शिवाय काहीच दिसत नाही , पुत्र - प्रेमापुढे जसे पित्याला धृतराष्ट्रा सारखे फक्त आपल्याच पुत्रांचे हित दिसते व तो आपल्या कर्तव्याकडे डोळेझाक करतो व आपले स्वताचे हनन करून घेतो तसे ह्या मायिक दुनियेत अशी वेळ येते कि काही क्षण आपल्याला काय करावे ते काहीच कळत नाही , जसे आपल्या डोळ्यात धूर गेल्यानंतर काही क्षण आपल्याला काहीच कळत नाही व तेवढ्या वेळात आपल्या कडून डोळे चोळत चोळत पुढील काहीच दिसेनासे झाल्यामुळे काहीतरी अघटीत होवून जाते व नंतर पश्चाताप करण्याची पाळी येते . म्हणून तुकाराम महाराज इथे आपल्याला रोकडा परमार्थ व व्यवहार शिकवतात कि आपण आपल्या डोळ्यात अज्ञानाचा धूर / अज्ञानाची पडळ / अज्ञानाची काजळी येवू न देता सदा सावध राहून क्षणा-क्षणाला आपले आयुष्य अधिक सुंदर बनवता येईल .

Saturday, June 14, 2014

आज फादर डे , इंग्राजळेल्या संस्कृतीतील वडिलांबद्दल दिखावा प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस


happy father day to all ! ! !

आज फादर डे , इंग्राजळेल्या संस्कृतीतील वडिलांबद्दल दिखावा प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस , मराठीत याचे भाषांतर " पितृदिन " असे होत नसावे कारण पितृदिन म्हटले कि त्याचा वेगळा अर्थ निघतो , असो 

तर माझे वडील बाळासाहेब नाथू कुसाळकर , देवी निमगाव , कडा ( आष्टी ) बीड , या गावचे मूळ रह्वाशी , १९७२ च्या दुष्काळात आम्ही बीड जिल्यातून पुणे जिल्यातील जुन्नर तालुक्यात कामानिमित्ताने स्थलांतरित झालो , स्थायिक झालो , त्या गावाशी समरूप झालो , वडिलांनी आपल्या पापभिरू स्वभावाने खूप लोक जोडले , माळ घातली , भजनात सहभाग घेतला , कीर्तन - प्रवचनात पडेल ती कामाची सेवा केली , पंढरपूरची वारी केली ,

आयुष्यात कधीही खास आजारी असे पडले नाहीत , किरकोळ थंडी तापाचा आजार हाच त्यांचा आजार , ते हि अंगावर काढायचे नाहीतर , प्राथमिक सरकारी दवाखान्यात जावून ५ पैशाचे एक स्लीप काढून एक इंजेक्शन मारून आले कि ठीक होणार , सरकारी दवाखान्यातील गोळ्या व इंजेक्शन यावर त्यांचा खूप विश्वास .

परंतु आयुष्याच्या शेवटी त्यांना आजाराने घेरले , कधी मुंबई तर बर्याचदा पुणे असे दवाखाने करत करत ते अचानक आम्हाला सोडून गेले .

आमच्या वडिलांना दोन व्यसने होती , एक संभाजी अर्थात कोंबडा छाप बिडी ओढण्याचे व दुसरे कामाचे , दारू तेच काय त्यांचे इतर भाऊ सुद्धा कधी पीत नव्हते , त्यांचा वैयक्तिक खर्च काहीच नव्हता , ते एक उत्कृष्ट गवंडी होते , विहिरी व घरांचे काम खूप छान करायचे , ते दगड घडण्याचे काम हि खूप छान करायचे , परंतु पुणे जिल्यात आल्यापासून दगड - खाणीत कामाला जायला लागायचे ,

त्या काळी हाताने सुरुंग घ्यावा लागत असे , भल्या पाहटे उठून , उजडण्याचा आत ते खाणीवर जात व १० / ११ वाजे पर्यंत त्यांचा एक ४ /५ फुट सुरुंग मारून होई , त्यानंतर तो उडवायची लगीन - घाई त्यांची चालायची , विरया ( कि युरया ) , सुरुंगाची दारू , सुरुंगाची काळी सुतळी , सुरुंगासाठी लागणारे मीठ , हे सारे ते घरात एका कोपऱ्यात खूप जपून ठेवायचे , ते सुरुंग चेळताना , खूप काळजी घ्यायचे ,

सुरुंग भरताना बारीक दगडाचे तुकडे , कच ,युरया , दारू , मीठ , हे ठासून न चाळता काळजीपूर्वक भरायचे , त्यांनी या कामात निष्काळजीपणा कधी केलेला आठवत नाही , कधी धडीला सुरुंग घेतलेला असेल तर सुरुंग पेटवल्या नंतर त्यांची खूप त्रेधा उडायची , कधी कधी सुरुंग फुसका जायचा , अशावेळी वडील खूप निराश व्हायचे कारण हाताने सुरुंग घेणे एवढे सोपे नसायचे व हाताला फोड येण्याचा प्रश्नच नव्हता कारण तो हात मुलायम राहिलेलाच नसायचा , फोड येवून ते जागीच दाबून ते हात पुरते दगडासारखे निबर झालेले होते .

सुरुंग उडवायचे ठरले कि आजूबाजूला सगळ्यांना आरोळी ठोकून सावध करायचे , बायकांना व लहान मुलांना दूर जावून उभे राहायला सांगायचे कारण कधी कधी दगड खूप उंच उडत व ते दगड लागण्याची खूप शक्यता असायची , सुरुंग उडाल्यानंतर , किती दगड माल खाली पडला आहे हे पाहण्याची घाई असायची , चांगला माल पडलेला असेल तर सुतकी घेण्यासाठी त्यांचे हात आसुसलेले असायचे परंतु आईच सांगायची कि जेवून घेवून नंतर फोडायला सुरुवात करा . . .

नंतर एकदा सुरुवात केली कि त्यांच्यासाठी , सुतकी , दगड आणि पहार हेच विश्व असायचे , कधी आधी मधी दगड लागून जखमा व्हायच्या परंतु संभाजी बिडीचा लाल कागद त्याला थुका ( थुंकी ) लावून लावला कि ती बरी होणार हाच त्यांचा विश्वास असायचा व तोच लाल कागद त्यांचा दवाखाना असायचा .

एवढे सारे मरमर काम केल्यानंतर , आठवड्याच्या दिवशी वडील खाण - मालकाकडे सकाळीच पैशाला जायचे , खूप उशीर त्यांचेच थेर ऐकून घ्यायचे परंतु तो काही पैसे लवकर देत नसायचा , आई घरी पैशासाठी वाट पाहून हैराण व्हायची कारण आठवड्याचा बाजार असायचा व लवकर गेले तर काही मिळण्याची शक्यता असायची . . हे खाण - मालक खूप अंत पाहायचे , , , परंतु नाविलाज असायचा . काही जणांना तर ३ /४ वाजेपर्यंत थांबून हि पैसे मिळत नसत तर काहीजण अगतिक होवून आर्जवे करायची पण त्या खाण - मालकाला कधी दया यायची नाही . असो

आमच्या चार भावांचे शिक्षण , घर , हे वडिलांनी कसे केले असेल काही सांगता येत नाही , आज वडिलांच्या भूमिकेत मी हि आहे , किती जड जात आहे याचा मला पूर्ण अंदाज आहे परंतु त्यांनी पूर्ण भोळे राहून , कधी हि कुणाला न दुखावता , गावातील लोकांशी एकरूप होवून खूप चांगले दिवस काढले , म्हणून आज हि गावातले लोक त्यांचे नाव काढतात , परंतु म्हातारपण हे वाईटच असते .

वडिलांनी फक्त एकदाच मला एक वीज चमकवनारी चापट हाणली होती , त्याशिवाय त्यांनी मलाच काय कुणालाही मारलेले आठवत नाही , मी लहान होतो व आई ला फिरून काहीतरी बोललो होतो व निघून जाण्याची काहीतरी गोष्ट केली होती , वडिलांनी एक सणसणीत ठेवून दिली होती , ती अद्याप लक्षात आहे . त्यांचे सगळे प्रेम पाठीमागून असायचे , समोर काहीच दाखवत नसत .

आम्ही सर्व आमच्या वडिलांना " अण्णा " म्हणायचो , काहींचे ते बाळभाऊ होते तर काहींचे बाळ दादा . वडिलांना कुणीही काम सांगावे वडील ते लगेच करायचे , कुणी हलके काम सांगितले व वडील ते करायला लागले तर आम्हाला कमीपणा वाटायचा , आम्ही वडिलांना बोलायचो , परंतु ते वडील कधी मनावर घेत नसत व म्हणूनच गावात जेंव्हा हरीनाम कीर्तन सप्ताह भरायचा तेंव्हा वडील खूप मिरवायचे , टाळ घेवून उभे राहायचे , त्यांनी गावातील काकडा ( पहाटेचे बोलायचे अभंग ) जसे ते जायला लागले तसा कधी सोडला नव्हता .

असे आमचे अत्यंत साधे , सरळ , ,सज्जन , भोले , पापभिरू वडील , कधी कुणाच्या अध्यात मध्यात नसायचे , सामंजस्य हीच त्यांची सदैव भूमिका असायची .

वडील गेले तो क्षण खूप हृदयदावक होता ,वडील जात आहेत हे समोर दिसत होते परंतु हतबलता होती. . . असो त्यावर परत कधीतरी . . .

आज फादर डे निमित्ताने माझ्या वडिलांना माझ्या या स्मुर्ती पुष्पांजली ! ! !

Wednesday, June 11, 2014

आज वट-पौर्णिमा ...प्रचलित प्रथे प्रमाणे तमाम पुरुष वर्गासाठी , महिला वर्गाकडून केले जाणारे व्रत .



आज वट-पौर्णिमा ...प्रचलित प्रथे प्रमाणे तमाम पुरुष वर्गासाठी , महिला वर्गाकडून केले जाणारे व्रत ...सावित्री ने तिच्या सत्यावानासाठी केलेले व्रत ...सर्वच लोकांना ह्या पुराणातल्या कथे विषयी कल्पना आहे ,असावी ...

आपल्याकडे जे सण साजरे केले जातात त्या पाठीमागे आपल्या पूर्वजांचा ठोस असा गहिरा अर्थ दडलेला असायचा ..सण हे प्रतीकात्मक रूप म्हणून साजरे करायला सुरुवात केली असावी , नव्हे नव्हे ते प्रतीकात्मकच होत ...आपल्याकडच्या भट्ट - ब्राह्मणांनी त्याचे दैवतीकरण करून अनेक रूढी आणि परंपरा निर्माण करून ठेवल्या आहेत ...आणि नटायला थाटायला मिळत म्हणून आपणही असल्या प्रथेला घट्ट चिटकून बसलो आहोत .आज पुरुषाच्या पुढेही व त्याच्या मागेही त्यांच्या सत्यवानाचा काय काय उद्धार करतात हे सांगायला नको ...आणि सत्यवान हि आता सत्यवादी राहिले नाहीत .असो त्या खोलात आपल्याला जायचे नाहीं ..आपण वट - सावित्री व्रत काय आहे हे समजून घेऊयात ....

हा जो वट म्हणजेच वड जो आहे त्याचे बीज मोहरी सारखे बारीक असते ..परंतु ते बीज वाढीला लागले कि त्याचा विशाल काय अशा मोठा वृक्ष होतो ..आता पर्यावरण च्या दृष्टीने व नैसर्गिक समतोल राखण्याच्या दृष्टीने हा वटवृक्ष कसा आपली भूमिका वाटावतो ते पहा ....हा वृक्ष सतत हिरवागार असतो ..तसेच ह्याची थंडगार सावली अनेक पांथिकाना क्षणभरासाठी आपला सर्व क्षीण व परिश्रम घालवण्यास मदत करतो. ह्या वडाच्या मुळांच्या खोपटात लांडगे , कोल्हे , खोकडे ह्या प्राण्यांची वस्ती असते ..खोलवर बिले पडलेली असतात ..शेजारीच लाल मुंग्या , काळे देण्गल्या मोठाल्या तोंडचे मुंगळे हे सतत वर खाली करत असतात ..खारुताई ची लगबग सतत खोडावरून फान्ध्यावर चाललेली असते..वडाच्या फांद्यावर माकडे मुक्तपणे उच्छांद मांडत असतात ..ह्या झाडावर बहुतेक पक्षांची घरटी पाहायला मिळतील . चिमण्या , कावळे , घुबड इत्यादी हर तर्हेचे पक्षी व त्यांचा तो मंजुळ स्वर कधी कधी साळून्क्यांची एकचं घाई ....झाडाच्या शेंड्यावर गरुड , गिधाडे ह्यांचे डेरे....अशातच कधी झाडावर एखादा सर्पराज दिसला कि पक्षांची होणारी धांदल व साळून्क्याचा होणारा कलkalat ...सुतार पक्षाचे फांदीच्या खोपीतून अलगद बाहेत येणे ...मधीच सळसळनारी पाने...मध्येच होणारा कोलाहल ..मध्येच दाटणारी निरव शांतता ...मध्येच वरून एखादे टपकन खाली पडलेले पक्षाचे पिल्लू ..व त्याची अस्तित्व साठी चाललेली धडपड ...अशातच कुणीतरी बेसावध पने त्यावर घातलेली झडप ......

......अशा एक ना अनेक घटनांचा , प्रसंगाचा हा एकमेव साक्षीदार म्हणजेच वटवृक्ष ..ज्या वृक्षावर कित्येक किड्यांचे ,कित्येक प्राण्यांचे , कित्येक पक्ष्यांचे ,कित्येक भ्रमरांचे , कित्येक आलेल्या - गेलेल्यांचे आयुष्य आवलंबून असते ...ह्या झाडावर पूर्ण चैतन्यच अवतरलेले दिसते ..संपूर्ण प्राणी मात्रांची वस्तीच तिथे नांदत असते ....बरे ह्या वड वृक्षाचे आयुष्यही शेकडो वर्षांचे असते ...म्हणजेच त्या वट वृक्षाने तेथील प्राणी - पक्षांच्या कित्येक पिढ्या पाहिल्या असतील ..कमीत कमी सात पिढ्या तरी नक्कीच ...हो ना ?

अशा ह्या वड वृक्षाच माणसालाही खूप उपयोग आहे ..ह्या वृक्षाच्या छायेत जी झोप लागते ती नक्कीच फोम च्या गादीत येणार नाहीं ...ह्यांच्या पारंब्या ना लटकून मस्त उंच च्या उंच झोके घेत| येतात ..ह्याच्या लाकडाचा जळणासाठी , घरगुती वापरासाठी उपयोग होतो ...अशा प्रकारे हा वृक्ष सर्वच जीव मात्रासाठी जगण्याचे वस्ती स्थान आहे ...खास करून जंगलातील ह्याचे अस्तित्व हेच अधिरेखीत करते ...

...एवढे असूनही हा वृक्ष स्थितप्रज्ञ सारखा असतो ...सर्व साक्षी असतो ...तरीही खंबीर पने उभा ....सर्वाना उपयोगी पाडण्यासाठी सदैव तत्पर .

....चला आता आपल्या सत्यवान - सावित्री कडे येउयात ...आजच्या काळी स्त्री व पुरुष दोघेही कमावतात व स्वताचा संसार चालवतात ...पूर्वीच्या काळी असे नव्हते ..तेंव्हा ती जबाबदारी पूर्ण पुरुषाचीच असायची ....त्या मूळे पुरुषाचे असणे ( जिवंत ) हे खूप महत्वाचे असायचे .व त्या काळी गाई व बाई हि नेहमी संरक्षणात असायची ...मोकळी गाय व मोकळी बाई दिसली कि कुणीही तिला आपली म्हणून घेऊन जायचे ...अशा अवस्थेत घरात अवलंबून असणार्यांची पूर्ण जबाबदारी हि कुटुंब प्रमुखावर असायची ..घरातील वयस्कर व्यक्ती , लहान मूले , तरुण स्त्रिया ..ह्यांचे कर्ता पुरुष गेल्यावर काय हाल होतील ...ह्या साठी ....त्या कर्त्या पुरुषाला खूप आयुष्य मिळावे व आपले संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहावे हा मूळ स्वार्थ असायचा ( कुणी ह्याला त्याग हि म्हणा हवे तर )...व असे केल्या मूळे आपली मुले, नातवंडे पर्यायाने संपूर्ण वंशच सुरक्षित राहील ...हा विचार त्या मागे असावा ...

....आता बंधुनो असा विचार करा कि ....तो वट वृक्ष कोसळला आहे , उन्मळून पडला आहे ....व इकडे आपला घरातील प्रमुख हि अकालीच आपल्यातून निघून गेला आहे ....तर त्या वट वृक्ष्यावर अवलंबून असणाऱ्या जीव सृष्टीचे काय हाल होतील व इकडे आपला मुख्य करता पुरूषाच आपल्यातून निघून गेला तर घरातील सर्वांची कशी वाताहत लागेल ...?

बंधुनो , हा विचारच नको ...घरातील कर्त्या पुरुषाला उदंड आयुष्य लाभावे ...व नैसर्गिक जीव चक्र ज्या झाडावर अवलंबून आहे त्या वट वृक्षाचे हि संवर्धन होवो ....

...पूर्वी गावाची नवे कशी होती ...आंबेगाव , पिंपळगाव , वडगाव , चिंचवड , पिंपरी . तेम्बुर्णी, जाम्बळगाव , ..आता आहेत ...इंदिरा नगर , नेहरूनगर , राजीवनगर , गांधी नगर , ...काय हि नावे ?..

मित्र हो , बंधुनो ...जागे व्हा ....नैसर्गिक समतोल ढळू देऊ नका ...

झाडे लावा ...झाडे जगवा ...आपले व आपल्या येणाऱ्या पिढीचे आयुष्य सुसह्य करा......
 

Friday, February 14, 2014

वडार समाजाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा नेता . . . रयतेचा राजा




१९ फेब्रुवारी तारखेनुसार छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती 

वडार समाजाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा नेता . . .

रयतेचा राजा 

बा आदब , बा मुलाहिजा , होशियार . . . 

महाराष्ट्र देशाचे वैभव , महाराष्टाची ओळख , महाराष्ट्राची अस्मिता , महाराष्ट्रात ज्यांचे नाव घेतले कि अजून हि रक्त गरम होवून सळसळते , महाराष्ट्रातील दगड - धोंडे , दऱ्या - खोऱ्या ज्यांच्या पद स्पर्शाने पावन होवून स्फूर्तीचे गीत गात असतात . . . अशा आपल्या शिवबांचे , आपल्या शिवरायांचे , जगभरातील शिवप्रेमींचे , छत्रपति श्री शिवाजी महाराज यांची जयंती येत्या १९ फेब्रुवारीला साजरी होत आहे . 

काल velentine डे होता , आम्ही तो " छत्रपति शिवाजी महाराज व त्यांचे राजकारण " या प्रतित्यश लेखक श्री संजय सोनवणी यांचे व्याख्यान ऐकून साजरा केला व आमचे नैसर्गिक शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम जागृत झाले . 

महाराष्ट्रात जे जे इतिहासकार झाले त्यांनी वडार समाजाचे महाराष्ट्रातील किल्ले , महाल वाडे , तलाव , पाण्याचे जिवंत विहिरी या बांधण्यात ज्यांचे योगदान आहे त्यांचा इतिहासाच्या पानावर उल्लेख्ख करायचा टाळून वडार समाजाला व वडार समाजाच्या योगदानाला दुर्लक्षिलेले आहे . 

आज जो वडार समाजात जन्माला येतो , त्याला शिवाजी महाराजांचा आदर करायला व त्यांच्या साठी जीव ओवाळायला शिकवायला लागत नाही कारण हि जन्मताच वडार समाजाला मिळालेले रक्तातले शिवप्रेम आहे . 

आज रोजी वडार समाजाची ओळख इतिहासात शोधावी म्हटले तर आमच्या हाती काहीच लागत नाही . लागणार सुद्धा नाही , कारण आमच्या पूर्वजांच्या हाती कपट - कारस्थानी लेखणी नव्हती तर छनि आणि हातोडी होती . छनि आणि हातोडी थोडाच इतिहास लिहू शकणार होती ? परंतु त्याच छनी आणि हातोडीने , सुतकी आणि पहारीने इतिहास निर्माण केला . महाराष्ट्र देशात जो दगड धोंड्यांचा देश म्हणून ओळखला जातो , जो अति घनदाट जंगलाचा प्रदेश म्हणून परिचित होता , असल्या दुर्गम , अति दुर्गम भागात त्यांनी आपल्या छत्रपति शिवाजी महाराज यांच्यासाठी अवघडातील अवघड अशी किल्ले बांधणी केलेली आहे , समुद्रातील दुर्ग बांधले आहेत , इतिहास साक्षीला आहे , अशी नोंदी सापडतात कि कित्येक शेकडो वडार पाथरवट हे किल्ले बांधणीसाठी कित्येक महिने कित्येक वर्षे सतत झटत होते . 

आज महाराष्ट्रातील वडार समाजाची खरी ओळख जर कुणा मुळे टिकून राहिले असेल तर शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या या भव्य दिव्य किल्ले , दुर्ग व वास्तू मुळे . व त्यामुळेच प्रत्येक वडार समाज बांधवाला श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्यावर निस्सीम प्रेम आहे . 

वडार समाजाला आज पर्यंत इतिहासात किंव्हा वर्तमानात खरा मान कुणी दिला असेल तर तो फक्त शिवाजी महाराज यांनीच . बाकीच्या सर्व लबाड लोकांनी वडार समाजाचा आता पर्यंत फक्त वापर करून घेतला व त्याला देशोधडीला लावून टाकले . 

वडार समाज बंधुनो , वडार समाज बांधवाना छत्रपति शिवाजी महाराज यांच्या काळात जो शिल्पकार म्हणून , कलावंत , कलाकार , कसबी तंत्रज्ञ म्हणून जो सन्मान होता तो त्यांच्या नंतर समाप्त झाला . धाकले महाराज अर्थात संभाजी महाराजा नंतर वडार समाजाला तर कुणीच वाली राहिला नाही . पेशव्यांचे व ब्राह्मणाचे कपट कारस्थाना मुळे खुद्द शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना सुद्धा अनेक कौटुंबिक तसेच राजकीय , सामाजिक प्रश्नांना तोंड द्यावे लागले होते तसेच हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला फितुरीची जी कीड लागली होती ती ब्राह्मण व त्यांच्या सडलेल्या डोक्यातून निघत असलेल्या सडक्या विचारामुळे .

या ब्राह्मण लोकांनी बुद्धी भेद करण्याच्या त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्ती मुळे पुढे राज्य कारभार हि स्वताकडे नियंत्रित केला . त्यांचे पाप एवढ्यावरच संपले नाही तर वडार समाज व अशाच काही नैसर्गिक पोटा पाण्यासाठी गावोगावी गुजराण करण्यासाठी फिरणाऱ्या जमातीवर ते " गुन्हेगार " असल्याचा ठपका ठेवला . 

पुढे इंग्रज भारतात आले , या इंग्रजांना भारतात स्थिरावू देण्यात व त्यांच्याशी मसलत करण्यात अन्य दुसरा कुठलाही समाज जबाबदार नव्हता तर तो फक्त कर्मदरिद्री ब्राह्मण समाज होता . या ब्राह्मण समाजाने स्वताच्या स्वार्थी विचारापोटी हा समाज अक्षरश इंग्रजांच्या हवाली केला व महाराष्ट्रातील गाव - खेड्यातील जी चालत आलेली अर्थकारण होते ते पार बिघडवून टाकले , आलुतेदार - बलुतेदार उघड्यावर पडले , त्यांच्या पोटा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला . पेशव्यांच्या व इंग्रजांच्या काळात स्थायी व नवनिर्मिती अशी महाराष्ट्रात झालीच नाही , 

आणि हाताला काम नसल्यामुळे मूळ कलाकार असलेले वडार समाजा सारखे अन्य समाज हि आपली गुजराण करण्यासाठी अत्यंत हातघाई वर आले . त्यातच ब्राह्मण समाज हा चातुर्वर्ण पाळणारा , शुद्र दि भेद मानणारा होता व वडार समाजा सारख्या काही जातींना त्यांनी गाव - खेड्यातील मुख्य वस्तीत वास्तव्यास मज्जाव केलेला होता त्यामुळे जे आज SC / ST म्हणू प्रचलित आहेत व ज्या काही भटक्या विमुक्त जाती म्हणून प्रचलित आहेत त्यांचे जगणे या ब्राह्मण संचालित व्यवस्थेमुळे पार मोडकळीस आले . त्यांना कुणीही वाली राहिला नाही . 

भटका समाज हा खर्या अर्थी पेशवे व इंग्रजांच्या कार्यकाळात शिवाजी महाराजा विना पोरका झाला होता . बायका मुलांची भयंकर आबाळ व स्वताला काहीही काम नसलेला परंतु मुलाचा कलाकार असलेला हा समाज त्यामुळे पुरता खचून गेला . पोटासाठी हा काहीतरी करू पाहत होता , आपल्या बायका मुलांना जागवू पाहत होता तर ह्या कारस्थानी ब्राह्मणांनी व ब्राह्मणाची बटिक झालेल्या काही औलादी यांनी इंग्रज लोकांशी संधान साधून या भटक्या लोकांना इंग्रजां करावी गुन्हेगार जमात म्हणून घोषित करवून घेतले . 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जो समाज सन्मानाने , आब्रुने महाराष्ट्रात नव निर्मितीच्या कार्यात योगदान देवून गेला होता व ज्याच्या बद्दल खुद शिवाजी महाराजांना हि आदर होता तो वडार समाज व अन्य ज्यांना भटके सन्बोदले गेले हा क्षणात ब्राह्मण समाजाच्या कट कारस्थानामुळे " गुन्हेगार " समाजाला गेला . 

आज वडार समाज हा जवळ जवळ दोनशे वर्षे हा " गुन्हेगार जमात " म्हणून ठपका मिरवत आहे . ब्राह्मण संस्कृतीने वडार समाजाला अगोदर शुद्र तर समजले होतेच व त्याला सामाजिक अधिकारापासून वंचित ठेवलेले होतेच , वडार समाज बंधुनो , लक्षात ठेवा - - आपल्याला पिण्याच्या पाण्यावर सुद्धा बंधने होती इतकी भयंकर व्यवस्था त्याकाळी ब्राह्मणांनी संपूर्ण समाजावर लादलेली होती . हे मार्तंड त्यांना वाटेल तो नियम शोधायचे व अन्य समाजावर लादायचे . इतके हे हलकट व विलक्षण कपटी , स्वार्थी , बुद्धी भेद करणारी जात आहे . या ब्राह्मणांना बळी पडले ते देशमुख , पाटील व त्यांनी ज्यांना क्षत्रिय म्हणून गौरव केला अशा काही जाती . 

सन १८७१ ला ब्राह्मण वर्गाने रीतसर इंग्रजांना भडकावून वडार समाज व भटक्या विमुक्त जातीना " गुन्ह्गार " असा अधिकृत ठपका ठेवून त्याला कायद्यात बसवले .

रानावनात राहणारा , आपली पारंपारिक कारागिरी जपणारा , छत्रपति सारख्या राजाच्या आदेशावर शत्रूवर तुटून पडणारा , नैसर्गिक शूर वीर असलेला हा वडार समाज हा अचानक कायमचाच " गुन्हेगार " झाला . 

छत्रपति शिवाजी महाराज जर असते तर त्यांनी वडार समाजाला " गुन्हेगार समाज " असे संबोधले असते का हो ?

आज २०१४ मध्ये हि वडार समाजाला महाराष्ट्रातील आपले अस्तित्व सिद्ध करा असे महाराष्ट्र सरकार सांगत आहे . १९६१ च्या रहिवाशी असल्याची अट घालत आहे . हे रयतेचे राज्य आहे का हो ? 

इथे जनतेला मोफत व सक्तीचे आणि समान शिक्षण अत्यंत गरजेचे असताना हे कागोद्पत्री घोडे कोण नाचवत आहेत हो ?

इथे मराठा असून कुणबी बनून लोक निवडणुका जिंकत आहेत , आपली जात , आपले आई बाप बदली करत आहेत , शिवाजी महाराजांच्या काळात हे चालले असते का हो ?

इथले सरकार व इथली प्रस्थपित झालेली मंडळी हि त्रिवार धिक्कार करण्यासारखी आहेत . शिवाजी महाराजांना सुद्धा अखेच्या काळात या राजकारणी लोकांनी अक्षरश त्रस्त केले होते अशी हि निगरगट लोक आहेत . सत्तेची सर्व सूत्रे यांना स्वताकडे हवी असतात . कागद पत्रांचा खेळ करून कायदे करून कायद्याच्या कचाट्यात पकडून हे लोक जनतेला , प्रजेला वेठीस धरत असतात . 

आज आपल्या देशात फक्त नावालाच लोकशाही आहे . चाललेली आहे ती हुकुमशाही पण नाही परंतु गुंड शाही नक्की आहे . तोच इथे चांगले आयुष्य जगतो आहे . सफेद कपड्यातील गुंड जागोजागी झालेले आहेत . ते डल्ले मारत आहेत , कुणाची कुणाला आजीबात फिकीर नाही , हा देश लुटमारीचा देश आहे का नाही . 

ज्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतात तो फक्त नावातच पुरोगामित्व जपून आहे परंतु या महाराष्ट्राचे कपाळ कलंकित झालेले आहे . या महाराष्ट्राला डाग लागलेले आहेत , हा महाराष्ट्र नको त्या गोष्टीनी डागाळलेला आहे . इथे सर्व जाती धर्मांना आपल्यात सामावून घेतले जात नाही , इथे नरेंद्र दाभोलकर यांच्या सारख्यांची हत्त्या दिवसा ढवळ्या होत आहे . सामाजिक समतोल इथे नाही . गरीब व श्रीमंत या मध्ये भयंकर दरी निर्माण झालेली आहे . सर्व मंडळी कातडी बचाव हे धोरण अवलंबत आहेत . 

- - - - आणि म्हणूनच श्री छत्रपति शिवाजी महाराजांची आज प्रकर्षाने आठवण होत आहे . आज असा रयतेचा राजा होणे नाही . सर्व सामान्य जातींना व व्यक्तींना प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा हा महान धैर्यवान नेता होणे नाही . 

वडार समाजाला खर्या अर्थाने ऐतेहासिक खुणा निर्माण करून ओळख प्राप्त करून दिली त्या छत्रपति शिवाजी महाराज यांचे वडार समाजावर खूप उपकार आहेत आणि म्हणूनच प्रत्येक वडार समाज बांधवाला शिवाजी महाराजा बद्दल नितांत आदर तर आहेच परंतु आम्ही तेवढा आभिमान देखील बाळगत असतो . 

छत्रपति शिवाजी महाराज यांचा गौरवपूर्ण इतिहास व त्यांनी निर्माण केलेल्या वास्तुमुळे जो पर्यंत शिवाजी महाराजांचे नाव या पृथ्वी तलावर राहणार आहे , जो पर्यंत महाराष्ट्रातील किल्ले, दुर्ग , राजवाडे , महाल अस्तित्वात राहणार आहेत तो पर्यंत त्यांना जोडून हे सर्व बांधणीत वडार समाजाचे नाव त्याला लागून येणार आहे . शिवाजी महाराजामुळे वडारसमाज हि प्रतिष्ठा जपून राहणार आहे . 

त्यामुळेच आम्हाला छत्रपति शिवाजी महाराज यांचे ज्या ज्या वेळी नाव निघेल त्या त्या वेळी आमची छाती अभिमानाने फुगेल आम्ही छत्रपतींचा जयजयकार केल्याशिवाय राहणार नाही . 

जय शिवराय ! ! !

जय बजरंग . . . जय वडार .

Tuesday, February 11, 2014

वडार समाजातील स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! ! !



वडार समाजातील स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी  सुवर्णसंधी ! ! !

महाराष्ट्रातील वडार समाजातील उच्च शिक्षित व UPSC व MPSC या स्पर्धा परीक्षा देवू इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यासाठी " वडार समाज संघ , महाराष्ट्र राज्य " या संघटने कडून जाहीर आवाहन ! ! !

वडार समाजातील महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील तरुण जर आपल्या हुशारी व मेहनतीवर राज्य व केंद्र शासनाच्या स्पर्धा परीक्षा देवू इच्छित असेल तर …. व त्याबाबत काही पूर्व तयारी म्हणून पुण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी व सर्व शैक्षणिक साधने व वातावरण असलेल्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छित असेल तर " वडार समाज संघ , महाराष्ट्र राज्य " या आपल्या संघटनेला व " वडार समाज चारीटेबल ट्रस्ट " सामाजिक संस्थेला याबाबत आपले दायित्व व सहकार्य देण्यास खूप आनंद होईल .

उच्चतम कौशल्य प्राप्त करण्यासाठी आज आपल्या वडार समाजातील तरुणांना स्पर्धा परीक्षे शिवाय पर्याय नाही . राज्य सरकार व केंद्र सरकार मध्ये महत्वाच्या पदावर आपल्या समाजाच्या व्यक्ती असायला हव्यात व त्या माध्यमातून देशाची सेवा करता येईलच परंतु आपल्या काही वडार समाज बांधवांचे जीवनमान सुधारण्यास नक्कीच आपण हातभार लावू शकतो .

भविष्यकालीन दूरदृष्टी चा भाग म्हणून वडार समाज संघ आपल्या तरुण सुशिक्षित विध्यार्थ्याकडून खूपच अपेक्षा बाळगून आहे . आज अशा प्रयत्नात वडार समाजात कुठलीही संघटना अथवा संस्था कार्यरत नाही व त्यामुळेच वडार समाज संघाचे हे एक क्रांतिकारी पाऊल  समाजाला एक नवीन दिशा दिल्या शिवाय राहणार नाही . वडार समाजाचे बांधव हे कुठल्याही आस्थापनात उच्च पदावर असले पाहिजेत हे आपल्या संघटनेचे अधिकृत धोरण आहे . व संघटनेचे त्या दृष्टीने भविष्यात अजून हि चांगले प्रयत्न होतील .

तूर्त , वडार समाज संघ , अशा स्पर्धात्मक परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी कुणी इच्छुक तरुण असतील तर त्यांना पुण्यामध्ये अगदी माफक दरात  राहण्याची व जेवणाची सोय करू शकते . त्यात हि काही अडचण वाटली तर संघटनेतील जबाबदार कार्यकर्ते व हितचिंतक आपल्याला योग्य ती मदत करतील . पुस्तके अथवा लायब्ररी संदर्भात काही अडचणी येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल .

मोठ्या खेदाने इथे असे नमूद करावे लागत आहे कि हे सर्व आपण तूर्त तरी फक्त विध्यार्थ्यांसाठी  करू शकतो व मुलीसाठी त्यांच्या राहण्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही त्यात काही करू शकत नाहीत परंतु या विषयावर संघटना भविष्यात नक्कीच ठोस पाऊले टाकील व कुठलाही भेद संघटनेकडून होणार नाही यची काळजी घेतली जाईल . आपल्या संघटनेकडून पुण्यात मुलींचे वसतिग्रह असावे म्हणून प्रयत्न चाललेले आहेत . गोष्टी प्राथमिक अवस्थेत आहेत त्यामुळे त्या विषयी न बोललेलेच बरे परंतु आम्ही महिला व मुलींच्या विषयात गंभीर आहोत .

आपल्या वडार समाजात आदर्श व्यक्ती निर्माण व्हाव्यात व त्यांच्याकडून समाजाला प्रेरणा मिळावी व जो आपला समाज व्यसनासाठी व अंधश्रद्धा या साठी प्रसिद्ध होता ती आपली ओळख मिटावी या साठी वडार समाजातील तरुणांनी मोठ मोठी स्वप्ने उराशी बाळगून , सरकार दरबारी जी कि राजकारणाची सर्व सूत्रे तेथून चालत असतात अशा महत्वाच्या जागावर कार्यरत राहून वडार समाजाची व देशाची सेवा करावी .

वडार समाज संघ , महाराष्ट्र राज्य व वडार समाज चारीटेबल ट्रस्ट  आपल्या क्षमतेत व मर्यादेत शक्य ती मदत विध्यार्थ्यांना करण्याचा प्रयत्न करेल .

विध्यार्थी बांधव याचे कसे स्वागत करतील , कसा प्रतिसाद देतील त्यावर भविष्यकालीन दिशा हि ठरली जाईल .

याबाबत अधिक माहितीसाठी , वडार समाज संघाचे मुख्य संघटक श्री राकेश विटकर साहेब व माननीय अध्यक्ष श्री श्रावण रेपणवाड  यांच्याशी सरळ संपर्क साधला तरी हरकत नाही परंतु वडार समाज संघाच्या तालुका पातळीवरिल पदाधिकारी व जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्फत जर आपण आलात तर खूप उत्तम राहील व संघटनेला त्या विध्यार्थ्या  बद्दल पूर्ण खात्री होईल . पूर्णपणे गंभीर व जबाबदार व्यक्तीनेच याबाबत संपर्क करावा . केवळ माहिती काढण्याच्या उद्देशाने विचारपूस झाली तर आमच्या प्रयतानानाच हरताळ फासल्यासारखे होईल . वडार समाज चारीटेबल ट्रस्ट  चे पदाधिकारी अथवा सभासद आपल्या परिचयाचे असतील तर ते हि आपणास याबाबत सहकार्य करतील .

आम्ही वडार समाज संघ , महाराष्ट्र राज्य हे कार्य कुणाबद्दल कुठलाही पूर्वग्रह , कुठलाही आकस न ठेवता करत आहोत . हे म्हणण्याचा हाच उद्देश आहे कि अन्य कुठल्याही संघटने मार्फत वा संस्था मार्फत विध्यार्थी आले तरी ते वडार समाजाचे आहेत म्हणून त्यांचे स्वागतच असेल .

सकारात्मक प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आहोत . काही सूचना सुचवू इच्छित असाल तर त्यांचे हि स्वागत आहे . या विषयातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आवश्यक आहे .

चला एक नवीन वडार समाजाची निर्मिती करूयात , वडार समाजाला प्रतिष्ठा प्राप्त करून देवुयात .

जय बजरंग ! ! !……. जय वडार ! ! !















" वडार समाज " व " भटके - विमुक्त समाज " ह्यांच्या बद्दल त्यांचे स्पष्ट व निर्धारित धोरण




September 17, 2013 


काल नरेंद्र मोदींच्या पोस्टवरून आपल्या समाजातील बऱ्याच वडार समाज बांधवांच्या चांगल्या / वाईट प्रतिक्रिया आल्या . काहींनी माझ्या हेतू बद्दल शंका घेतली परंतु माझ्या दृष्टीने मी वडार समाजात अशा पद्धतीने चर्चा घडवून आणण्यात यशस्वी झालो ह्यात समाधानी आहे . असे वडार समाजात ह्या पूर्वी कधी झाले असेल असे मला वाटत नाही कारण तशी मानसिकता व व्यासपीठ उपलब्धच नव्हते . असो

मी विश्व हिंदू परिषद ला १९८० च्या काळापासून पाहतोय . " अखंड हिंदुस्थान " हि त्यांची कल्पना तेंव्हा बालमनाला खूप सुखावणारी होती . त्यांचे पत्रक , बुक लेट्स , , अखंड भारताचा नकाशावर " भारतमातेचा " फोटो हि आम्ही त्याकाळी प्रथम पहिला होता . पुढे " राम मंदिराचा " विषय आला . RSS चे प्रचारक अक्षरश गावोगावी प्रचार करत फिरायचे . श्रे अशोक सिंघल हे नाव खूप भारी वाटायचे . त्याकाळी अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी हे दोघेच फर्डे वक्ते म्हणून नावाजलेले होते . बाकी बाळासाहेब देवरस व अन्य RSS चे अन्य अध्यक्ष हि खूप विद्वान होते . अशातच श्री राम मंदिराचा मुद्दा खूप संवेदनशील होऊ लागला व अडवाणी ह्यांची ९० च्या आस पास रथ - यात्रा निघाली ह्या दरम्यानच श्री प्रमोद महाजन , नरेंद्र मोदि हे राष्ट्रीय पातळीवर नावे चमकू लागली .

संसदेतील रटाळ कामकाज खर्या अर्थाने मंत्रमुग्ध होवून पाहायला व ऐकायला ह्या देशाला कुणी शिकवले असेल तर ते श्री अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी . त्यांना जोड होती हजरजबाबी व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या प्रमोद महाजन ह्यांची . ( बाकीचे हि होते . . परंतु ध्यान आकर्षित करून घेणारे हे खरे दोघेच ) . अशातच श्री नरेंद्र मोदींचे नाव अधून मधून ऐकायला मिळायचे . ते तेंव्हा संघटनात्मक कार्यात व्यस्त असायचे व कुठलाही फोकस आपल्यावर असावा असा त्यांचा स्वभावात : पिंड नसावा . दिलेले काम व्यवस्थित तडीस न्यावे हेच त्यांचे काम असायचे .

गुजरात ची शासन राजवट "तिथल्या पटेल " ह्यांच्याकडेच असायची ९० च्या अगोदर कॉंग्रेस प्रणीत सरकारच बहुमताने तिथे असायची . ९० नंतर एक पंच वार्षिक कॉंग्रेस व दुसरी पंच वार्षिक भाजपा असा सिलसिला चालू असायचा . केशुभाई पटेल , शंकर सिंग वाघेला ( हे आता कॉंग्रेस वासी आहेत ) ह्यांचा भाजपा चा सत्ता संघर्ष टिपेला गेल्यामुळे दिल्लीच्या राजकारणात महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असलेले संघटनात्मक कार्यात मश्गुल असलेले परंतु निवडणुक न लढलेले नरेंद्र मोदि हे दिल्लीवरून गुजरात वर लादले गेलेले मुख्यमंत्री होते .

नरेंद्र मोडी हे त्यांना दिलेली वा सोपवलेली जबाबदारी किती निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पडतात ह्याचे सरळ साधे उदाहरण म्हणजे त्यांनी फक्त गुजरात वरच नंतर लक्ष केंद्रित केले व कधीही पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात लुडबुड केली नाही . देशातील त्यांचे विरोधक , काही तथाकथित विचारवंत " गोध्रा - कांड " सोयीस्कर रित्या विसरतात व " गुजरात दंगली " चा इश्यू करतात . परंतु नरेंद्र मोदि हे एवढे " खमके " आहेत कि ते आपल्या परंपरागत विरोधकांना तर नेस्तनाबूत करतातच परंतु पक्षांतर्गत विरोधकानाही पुरून उरतात . ह्याचेच ढलधळीत उदाहरण म्हणजे त्यांनी तीन पंचा वार्षिक निवडणुका पक्षाच्या हिमतीवर नाही तर स्वताच्या कार्य करिष्म्यावर निवडून दाखवल्या आहेत . तरीही ते टीकेचे लक्ष्य होत आहेत .

आज श्री नरेंद्र मोदि ह्यांचे सादरीकरण ( presentation ) , त्यांची दूरदृष्टी ( vision ) , त्यांच्याकडे असलेले आकडेवारी ( statistics ) व त्यांचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यांची प्रशासनावर असलेली पकड हे खरोखरीच पुढे जावून अभ्यासाचे विषय ठरतील . प्रशासनावर पकड ह्याचा अर्थ " हम बोले सो कायदा " असा विचित्र अर्थ विरोधक काढतील परंतु त्याचा खरा अर्थ त्यांनी प्रशासना मध्ये जागवलेला विश्वास हा आहे व त्यामुळे त्यांनी सर्वांचीच कार्यक्षमता वाढण्यास मदत झालेली आहे .

आज गुजरातच्या प्रगतीचे ढोल वाजत आहेत , त्यात गैर काय आहे ? मुबलक वीज आहे , प्रशस्त व त्यांचे समर्थक म्हणतात तसे चकाचक रस्ते आहेत , मुबलक पाणी आहे , जगातील सर्व भागातून गुंतवणुकीचा गुजरातकडे ओघ सुरु आहे , मोठ मोठे उद्योग तिथे येत आहेत , तसा विश्वास निर्माण करण्यात मोदि यशस्वी झालेले आहेत . शिक्षणावर व शिक्षकावर विशेष लक्ष देवून तिथे प्रगती साधली आहे , मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष्य दिले जात आहे , पर्यटनावर विशेष लक्ष देवून गुजरातचा स्वाभिमान व नाव जगभर पोहचेल ह्याची काळजी घेतली जात आहे . तंत्रज्ञानावर विशेष भर देवून विकास साधला जात आहे . जागतिक दर्जाचे औद्योगिक व कृषी विषयक प्रदर्शने भरवली जात आहेत , अशा कामाला मोदी सहकार्य व प्रोत्साहन देत आहेत , एक माहितीवर आधारित असे त्यांनी विद्यापीठ च स्थापन केले आहे ( नाव आता आठवत नाही ) . .

असे एक न अनेक कार्ये गुजरात मध्ये चालू आहेत . ह्याच त्यंच्या कार्यामुळे आज देशभर श्री नरेंद्र मोदी हे नाव भारताचे भविष्य म्हणून गाजत आहे . त्यांच्या नावामुळे भाजपा ला एक नवा चेहरा मिळालेला आहे . आज अटल बिहारी बाजपेयींच्या वृधत्वामुळे , प्रमोद mahajan hyanchya अकाली जाण्यामुळे व अडवाणींच्या " जिना - प्रकरणामुळे " भाजपा ची अवस्था कुपोषण ग्रस्त मुलासारखी झालेली होती . श्री मोदींच्या येण्याने समाजातील सर्व थरातून त्यांना पाठिंबा व्यक्त होत आहे .

लोक कॉंग्रेस ला पुरते विटले व वैतागलेले आहेत , लोक भाजप कडे एक पर्याय म्हणून बघत होते परंतु अडवाणींचा म्हतारचळ अजून गेलेला नाही . अटलबिहारी वाजपेयींना सुद्धा ह्यांनी कमी त्रास दिला नव्हता . ह्यांच्या बद्दल खूप आदर होता . त्यांनीच स्वत तो घालवून घेतला आहे . अशा राजकीय धांदलीत कॉंग्रेस स्वैर पणाने वागत आहे / होती . " मी नाही त्यातली " असे म्हणत म्हणत खपाखप भ्रष्टाचाराचे मोठ मोठाले गफले सहजी पचवत होते . वरून " करून सावरून " पतिव्रतेच्या " गोष्टी करत होती . अजून हि कॉंग्रेसला वाटते आहे ती खूप सोज्वळ , नाकासमोर चालणारी व आपले चारित्र्य सांबाळून राहणारी आहे परंतु हि " कैदाशीण " पार स्विस बँकेत आपले तोंड काळ करून आलेली आहे , स्थानिक घोटाळये नि तर हि अगदी बरबटलेली आहे . पण हि कॉंग्रेस व तिचे साथीदार आहेत खूप मस्तवाल , राजकारणात कुठल्या थराला जातील सांगता येत नाही असो .

वडार समाज बंधुनो , मुद्दा इथून पुढे सुरु होत आहे , आपल्याला एक समाज म्हणून कुठल्याही पक्षाचे वावडे नाही व नसावे . व्यक्ती म्हणून कुणाचा द्वेष करण्याचेही कारण नाही . व असा द्वेष कुणीही करू नये . विरोध " विचाराला " असावा परंतु " विचाराच्या आडून " वार करू नये , तसे राजकारण करू नये .

आज ६६ वर्षे झाले आपल्याला स्वतंत्र मिळून . आपल्यातले वडार समाजाचे काही लोक स्वताच्या कष्टाने अनंत हाल अपेष्टा सहन करत शिकले आहेत , सावरले आहेत , अन्य समाजाच्या प्रवाहात सामील होत आहेत तिथे हि आपली ओळख " वडार " अशीच आहे . परंतु मी धाडसाने असे म्हणतो कि हे शिकालेल्यांचे प्रमाण हे २५% च्या वर नसावे . मग आपला ७ ५ % वडार समाज हा अजून हि शहरात झोपडपट्टीत व गावखेड्यात पालात , उघड्यावर राहत आहे . अजून हि आपल्याकडे स्थानिक रहवासी दाखल्यासाठी फिर फिर फिरावे लागत आहे , कितीतरी लोकाकडे अजून रेशन कार्ड नाहीत , मतदान कार्ड नाहीत , आधार कार्ड नाहीत . कितीतरी लोक अजून अंधारात रात्र काढत आहेत , कितीतरी लोक अजून आजार अंगावर काढून अकाली मरत आहेत , कितीतरी जणांना अजूनही जाळण्यासाठी लाकूड फाटाहि उपलब्ब्ध होत नाही , कितीतरी जणांचे लग्न लवकर जमत नाहीत , कितीतरी हाताना अजून काम नाही , हाताला काम नसल्यामुळे कितीतारी लोक गैर - कृत्य करण्यात मश्गुल आहेत . कितीतरी आमच्या बहिणी जवानीतच विधवा झालेल्या आहेत . कितीतरी वृद्ध मरण येत नाही म्हणून कर्माला नावे ठेवून दिवस कंठत आहेत
.आपल्या देशाने एवढी प्रगती केली आहे मग हे आमचे हाल का आहेत ? ? ? . . हि कुठली शासन व्यवस्था आहे ? ? ? ? ? ? ?

हि कुठली शासन व्यवस्था आहे ? ? ? ? ? ? ? . . . चकाचक रोड काय चाटायचे आहेत काय ? विकासाच्या गप्पा मारून , दुरून सुंदर देखावे दाखवून आपले जीवन सुधारणार आहे काय ? ? ? स्वताचे भागले म्हणून जगाचे पोट भरले असे होत काय ? ? ? अरे चकाचक रोड हवा आहे कि आपल्या वडार समाजाचे जीवन मान सुधारायला पाहिजे ते सांगा ? ? ? किती वर्षे , अजून किती वर्षे ह्या हरामखोर राजकारण्यांच्या " गमज्या " वर विश्वास ठेवत बसणार तुम्ही ? ? ? चोराला चोरू द्यायचे व बलात्कार्याला बलत्कार करू द्यायचा , आपण निमुटपणे सहन करत बसायचे , नाही का ? ? ?

ह्या वडार समाजाला स्वताचा असा मान , अभिमान , स्वाभिमान आहे कि नाही ? ? ?

वडार समाज बंधुनो , भाजप हा पक्ष उच्च वर्णीय लोकांचा पक्ष आहे , हे पटत असेल तर मी पुढे चालतो , इथे " नागपूर " चा आदेश चालतो, नव्हे नव्हे तो आदेश बंधनकारकच असतो . तिथे काही अपील नसते . माझ्या माहितीतील २ /३ तालुका अध्यक्ष आपल्या समाजाचे आहेत . परंतु ह्याच्या पुढे ते आपल्याला स्थान देणार आहेत का ? ? ? . . . माझे काही आक्षेप आहेत . ते मी पुढे मांडतो . . .

१ ) भाजपा मध्ये आरक्षणाला विरोध करणारे खूप लोक आहेत . मंडल / कमंडल हा वाद आठवून पहा . . . .OBC ला विरोध कोण करत आहे ? . . . . . तुम्हाला काय वाटते भाजपा सत्तेत आल्यावर हे लोक गप्प बसतील ?

२ ) भाजपा मध्ये विवेकानंद ह्यांना अभिप्रेत हिंदू धर्मा पेक्षा " सनातन " हिंदू धर्माला मानणारे लोक जास्त आहेत , शस्त्रे , हत्यारे , व अतिरेकी विचारसरणी व भडकावू भाषणे करणारे आहेत व ह्यांचे गुप्त इरादे असतात . नरेंद्र दाभोलकरांचे उदाहरण समोर आहे . . . . . तुम्हाला काय वाटते भाजपा सत्तेत आल्यावर हे लोक गप्प बसतील ?

३ ) भाजपा हा पक्ष शहरी विचारसरणी चा पक्ष आहे , त्यांचे " शायनिंग इंडिया " चालते , विविध तन्द्रज्ञान वापरून खरे खोटे आकडे समोर मांडून " आकडेमोडीचा " खेळ करण्यात हे लोक खूप पटाईत आहेत , पटवून देण्यात हे कुणालाच ऐकत नाहीत व आपला हेका सोडत नाहीत . . . . . . . . . बहुजन समाज व मागासलेल्या समाजाचे हे उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करतील असे आपल्याला खरोखरच वाटते ?

४ ) आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो व आपण हि सर्व विविध धर्माचे लोक एकमेकांच्या धर्माचा आदर करून एकत्रितपने राहतो . . . . . परंतु " आसाराम " सारख्या ताज्या प्रकरणामध्ये फक्त हिंदू म्हणून हे लोक अशा लोकांना पाठीशी घालणार नाहीत कशावरून ? ? ? ( ताजा संदर्भ : राम जेठमलानी ह्यांनी ह्यांचे वकील पत्र घेतले आहे )

असो . . . अजून हि काही मुद्दे आहेत परंतु मला समाजाशी संदर्भातच बोलायचे आहे .

बंधुनो , वडार समाजात राजकीय व्यक्ती प्रत्येक पक्षात आहेत , परंतु ते त्यांच्या स्व हिमतीवर आहेत , संपूर्ण महाराष्ट्रातील वडार समाजाचा एका पक्षातील अमुक एक नेता म्हणून असे सांगता येणार नाही . तसे अद्याप झालेले नाही हे आपले दुर्दैव आहे .

आपल्याला वडार समाज ह्या नावाने अद्याप राजकारण करताच आलेले नाही . बंधुनो ते करता आले पाहिजे . संपूर्ण समाजाची एक मागणी हवी .

प्रत्येक पक्षात आपल्या समाजाचे लोक आहेत तसे ते राहतील . प्रत्येकाची एक विचारसरणी असते व प्रत्येकाला आदरणीय असा राजकीय नेता हि असतो . परंतु आपण विभागले गेलो आहोत ह्याचा अर्थ असा नाही कि आपण सर्वांनी एका पक्षाला समर्थन द्यावे असे मी सांगत आहे परंतु . . . .

प्रत्येक पक्षाला आपल्या " वडार समाज " व " भटके - विमुक्त समाज " ह्यांच्या बद्दल त्यांचे स्पष्ट व निर्धारित धोरण त्यांचा कडून वदवून घेतले पाहिजे .

२ ० १ ४ चे पडघम वाजू लागले आहेत . राजकीय वातावरण दिवसे दिवस तापणार आहे , मी हि एका एका पक्षाला व त्यांच्या नेत्याला टार्गेट करणार आहे . आमच्या " वडार समाजाचा " आपण काय विचार केला आहे ? ? ? हा प्रश्न खुले आम विचारणार आहे ? त्यांना ह्याची दखल घ्यावीच लागणार आहे कारण आम्ही हि त्यांच्या पक्षाला मानणारी माणसे आहोत .

जो पक्ष खुले आम समोर येवून समाजाला व समाजाच्या प्रश्नांना सकारात्मक राहील मला आशा आहे समाज हि त्यांना साथ दिल्या शिवाय राहणार नाही . परंतु मला हा आवडतो व मला तो आवडत नाही हि नेभळट भूमिका समाजाच्या हिताची नाही .

हे सर्व सामान्य वडार बांधवासाठी आहे , वेगवेगळ्या पक्षाशी संबंधित आहेत त्यांनी त्यांना योग्य वाटते तसे करावे व समाजहित साधावे .

शेवटी नरेंद्र मोदींना माझा वैयक्तिक विरोध असण्याचे काहीच कारण नाही , त्यांच्या भाषणाचा व विषय मांडण्याच्या त्यांच्या पद्धतीचा मी हि चाहता आहे . खरे तर हा खरेच बब्बर शेर आहे . ह्या माणसाला किती विरोधक आहेत परंतु खरेच ह्यांच्याकडे जिगर आहे .

वरील आमच्या काही शंकांचे त्यांनी अथवा त्यांच्या पक्षाने " खुले - आम " खंडन करावे व वडार समाजाला सहकार्य करू असा आम्हाला जाहीर शब्द द्यावा . आमचे बरेचसे वडार समाज बांधव श्री नरेंद्र मोदि ह्यांना पंतप्रधान पदी असावेत म्हणून आसुसलेले आहेत , आशावादी आहेत , त्यांना ही तुम्ही भ्रमनिराश करणार नाहीत अशी भाजपा कडून अपेक्षा .

ताजा कलम : सर्व पक्षीय लोकासाठी , महाराष्ट्रामध्ये वडार समाज हा प्रत्येक जिल्ह्यात असून समाजाची लोक संख्या हि अंदाजे सुमारे ४५ लाख ते ५० लाखाच्या आसपास असावी . काही लोक ७० / ७५ लाख म्हणतात .

वडार समाज व सर्व भटके - विमुक्त समाज हे मिळून महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बिघडवू शकतात त्यामुळे ह्या पुढे जास्तीत जास्त समाजाच्या मागण्या व आमचा जीवनस्तर सुधारण्यासाठी राजकीय पक्षाकडून प्रयत्न व्हावेत .

सुज्ञास व मुत्सद्धी लोकांना जास्त सांगावयाची गरज नाही .

जय बजरंग ! ! ! . . . . . . जय वडार ! ! !