Tuesday, February 11, 2014

" वडार समाज " व " भटके - विमुक्त समाज " ह्यांच्या बद्दल त्यांचे स्पष्ट व निर्धारित धोरण




September 17, 2013 


काल नरेंद्र मोदींच्या पोस्टवरून आपल्या समाजातील बऱ्याच वडार समाज बांधवांच्या चांगल्या / वाईट प्रतिक्रिया आल्या . काहींनी माझ्या हेतू बद्दल शंका घेतली परंतु माझ्या दृष्टीने मी वडार समाजात अशा पद्धतीने चर्चा घडवून आणण्यात यशस्वी झालो ह्यात समाधानी आहे . असे वडार समाजात ह्या पूर्वी कधी झाले असेल असे मला वाटत नाही कारण तशी मानसिकता व व्यासपीठ उपलब्धच नव्हते . असो

मी विश्व हिंदू परिषद ला १९८० च्या काळापासून पाहतोय . " अखंड हिंदुस्थान " हि त्यांची कल्पना तेंव्हा बालमनाला खूप सुखावणारी होती . त्यांचे पत्रक , बुक लेट्स , , अखंड भारताचा नकाशावर " भारतमातेचा " फोटो हि आम्ही त्याकाळी प्रथम पहिला होता . पुढे " राम मंदिराचा " विषय आला . RSS चे प्रचारक अक्षरश गावोगावी प्रचार करत फिरायचे . श्रे अशोक सिंघल हे नाव खूप भारी वाटायचे . त्याकाळी अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी हे दोघेच फर्डे वक्ते म्हणून नावाजलेले होते . बाकी बाळासाहेब देवरस व अन्य RSS चे अन्य अध्यक्ष हि खूप विद्वान होते . अशातच श्री राम मंदिराचा मुद्दा खूप संवेदनशील होऊ लागला व अडवाणी ह्यांची ९० च्या आस पास रथ - यात्रा निघाली ह्या दरम्यानच श्री प्रमोद महाजन , नरेंद्र मोदि हे राष्ट्रीय पातळीवर नावे चमकू लागली .

संसदेतील रटाळ कामकाज खर्या अर्थाने मंत्रमुग्ध होवून पाहायला व ऐकायला ह्या देशाला कुणी शिकवले असेल तर ते श्री अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी . त्यांना जोड होती हजरजबाबी व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या प्रमोद महाजन ह्यांची . ( बाकीचे हि होते . . परंतु ध्यान आकर्षित करून घेणारे हे खरे दोघेच ) . अशातच श्री नरेंद्र मोदींचे नाव अधून मधून ऐकायला मिळायचे . ते तेंव्हा संघटनात्मक कार्यात व्यस्त असायचे व कुठलाही फोकस आपल्यावर असावा असा त्यांचा स्वभावात : पिंड नसावा . दिलेले काम व्यवस्थित तडीस न्यावे हेच त्यांचे काम असायचे .

गुजरात ची शासन राजवट "तिथल्या पटेल " ह्यांच्याकडेच असायची ९० च्या अगोदर कॉंग्रेस प्रणीत सरकारच बहुमताने तिथे असायची . ९० नंतर एक पंच वार्षिक कॉंग्रेस व दुसरी पंच वार्षिक भाजपा असा सिलसिला चालू असायचा . केशुभाई पटेल , शंकर सिंग वाघेला ( हे आता कॉंग्रेस वासी आहेत ) ह्यांचा भाजपा चा सत्ता संघर्ष टिपेला गेल्यामुळे दिल्लीच्या राजकारणात महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असलेले संघटनात्मक कार्यात मश्गुल असलेले परंतु निवडणुक न लढलेले नरेंद्र मोदि हे दिल्लीवरून गुजरात वर लादले गेलेले मुख्यमंत्री होते .

नरेंद्र मोडी हे त्यांना दिलेली वा सोपवलेली जबाबदारी किती निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पडतात ह्याचे सरळ साधे उदाहरण म्हणजे त्यांनी फक्त गुजरात वरच नंतर लक्ष केंद्रित केले व कधीही पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात लुडबुड केली नाही . देशातील त्यांचे विरोधक , काही तथाकथित विचारवंत " गोध्रा - कांड " सोयीस्कर रित्या विसरतात व " गुजरात दंगली " चा इश्यू करतात . परंतु नरेंद्र मोदि हे एवढे " खमके " आहेत कि ते आपल्या परंपरागत विरोधकांना तर नेस्तनाबूत करतातच परंतु पक्षांतर्गत विरोधकानाही पुरून उरतात . ह्याचेच ढलधळीत उदाहरण म्हणजे त्यांनी तीन पंचा वार्षिक निवडणुका पक्षाच्या हिमतीवर नाही तर स्वताच्या कार्य करिष्म्यावर निवडून दाखवल्या आहेत . तरीही ते टीकेचे लक्ष्य होत आहेत .

आज श्री नरेंद्र मोदि ह्यांचे सादरीकरण ( presentation ) , त्यांची दूरदृष्टी ( vision ) , त्यांच्याकडे असलेले आकडेवारी ( statistics ) व त्यांचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यांची प्रशासनावर असलेली पकड हे खरोखरीच पुढे जावून अभ्यासाचे विषय ठरतील . प्रशासनावर पकड ह्याचा अर्थ " हम बोले सो कायदा " असा विचित्र अर्थ विरोधक काढतील परंतु त्याचा खरा अर्थ त्यांनी प्रशासना मध्ये जागवलेला विश्वास हा आहे व त्यामुळे त्यांनी सर्वांचीच कार्यक्षमता वाढण्यास मदत झालेली आहे .

आज गुजरातच्या प्रगतीचे ढोल वाजत आहेत , त्यात गैर काय आहे ? मुबलक वीज आहे , प्रशस्त व त्यांचे समर्थक म्हणतात तसे चकाचक रस्ते आहेत , मुबलक पाणी आहे , जगातील सर्व भागातून गुंतवणुकीचा गुजरातकडे ओघ सुरु आहे , मोठ मोठे उद्योग तिथे येत आहेत , तसा विश्वास निर्माण करण्यात मोदि यशस्वी झालेले आहेत . शिक्षणावर व शिक्षकावर विशेष लक्ष देवून तिथे प्रगती साधली आहे , मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष्य दिले जात आहे , पर्यटनावर विशेष लक्ष देवून गुजरातचा स्वाभिमान व नाव जगभर पोहचेल ह्याची काळजी घेतली जात आहे . तंत्रज्ञानावर विशेष भर देवून विकास साधला जात आहे . जागतिक दर्जाचे औद्योगिक व कृषी विषयक प्रदर्शने भरवली जात आहेत , अशा कामाला मोदी सहकार्य व प्रोत्साहन देत आहेत , एक माहितीवर आधारित असे त्यांनी विद्यापीठ च स्थापन केले आहे ( नाव आता आठवत नाही ) . .

असे एक न अनेक कार्ये गुजरात मध्ये चालू आहेत . ह्याच त्यंच्या कार्यामुळे आज देशभर श्री नरेंद्र मोदी हे नाव भारताचे भविष्य म्हणून गाजत आहे . त्यांच्या नावामुळे भाजपा ला एक नवा चेहरा मिळालेला आहे . आज अटल बिहारी बाजपेयींच्या वृधत्वामुळे , प्रमोद mahajan hyanchya अकाली जाण्यामुळे व अडवाणींच्या " जिना - प्रकरणामुळे " भाजपा ची अवस्था कुपोषण ग्रस्त मुलासारखी झालेली होती . श्री मोदींच्या येण्याने समाजातील सर्व थरातून त्यांना पाठिंबा व्यक्त होत आहे .

लोक कॉंग्रेस ला पुरते विटले व वैतागलेले आहेत , लोक भाजप कडे एक पर्याय म्हणून बघत होते परंतु अडवाणींचा म्हतारचळ अजून गेलेला नाही . अटलबिहारी वाजपेयींना सुद्धा ह्यांनी कमी त्रास दिला नव्हता . ह्यांच्या बद्दल खूप आदर होता . त्यांनीच स्वत तो घालवून घेतला आहे . अशा राजकीय धांदलीत कॉंग्रेस स्वैर पणाने वागत आहे / होती . " मी नाही त्यातली " असे म्हणत म्हणत खपाखप भ्रष्टाचाराचे मोठ मोठाले गफले सहजी पचवत होते . वरून " करून सावरून " पतिव्रतेच्या " गोष्टी करत होती . अजून हि कॉंग्रेसला वाटते आहे ती खूप सोज्वळ , नाकासमोर चालणारी व आपले चारित्र्य सांबाळून राहणारी आहे परंतु हि " कैदाशीण " पार स्विस बँकेत आपले तोंड काळ करून आलेली आहे , स्थानिक घोटाळये नि तर हि अगदी बरबटलेली आहे . पण हि कॉंग्रेस व तिचे साथीदार आहेत खूप मस्तवाल , राजकारणात कुठल्या थराला जातील सांगता येत नाही असो .

वडार समाज बंधुनो , मुद्दा इथून पुढे सुरु होत आहे , आपल्याला एक समाज म्हणून कुठल्याही पक्षाचे वावडे नाही व नसावे . व्यक्ती म्हणून कुणाचा द्वेष करण्याचेही कारण नाही . व असा द्वेष कुणीही करू नये . विरोध " विचाराला " असावा परंतु " विचाराच्या आडून " वार करू नये , तसे राजकारण करू नये .

आज ६६ वर्षे झाले आपल्याला स्वतंत्र मिळून . आपल्यातले वडार समाजाचे काही लोक स्वताच्या कष्टाने अनंत हाल अपेष्टा सहन करत शिकले आहेत , सावरले आहेत , अन्य समाजाच्या प्रवाहात सामील होत आहेत तिथे हि आपली ओळख " वडार " अशीच आहे . परंतु मी धाडसाने असे म्हणतो कि हे शिकालेल्यांचे प्रमाण हे २५% च्या वर नसावे . मग आपला ७ ५ % वडार समाज हा अजून हि शहरात झोपडपट्टीत व गावखेड्यात पालात , उघड्यावर राहत आहे . अजून हि आपल्याकडे स्थानिक रहवासी दाखल्यासाठी फिर फिर फिरावे लागत आहे , कितीतरी लोकाकडे अजून रेशन कार्ड नाहीत , मतदान कार्ड नाहीत , आधार कार्ड नाहीत . कितीतरी लोक अजून अंधारात रात्र काढत आहेत , कितीतरी लोक अजून आजार अंगावर काढून अकाली मरत आहेत , कितीतरी जणांना अजूनही जाळण्यासाठी लाकूड फाटाहि उपलब्ब्ध होत नाही , कितीतरी जणांचे लग्न लवकर जमत नाहीत , कितीतरी हाताना अजून काम नाही , हाताला काम नसल्यामुळे कितीतारी लोक गैर - कृत्य करण्यात मश्गुल आहेत . कितीतरी आमच्या बहिणी जवानीतच विधवा झालेल्या आहेत . कितीतरी वृद्ध मरण येत नाही म्हणून कर्माला नावे ठेवून दिवस कंठत आहेत
.आपल्या देशाने एवढी प्रगती केली आहे मग हे आमचे हाल का आहेत ? ? ? . . हि कुठली शासन व्यवस्था आहे ? ? ? ? ? ? ?

हि कुठली शासन व्यवस्था आहे ? ? ? ? ? ? ? . . . चकाचक रोड काय चाटायचे आहेत काय ? विकासाच्या गप्पा मारून , दुरून सुंदर देखावे दाखवून आपले जीवन सुधारणार आहे काय ? ? ? स्वताचे भागले म्हणून जगाचे पोट भरले असे होत काय ? ? ? अरे चकाचक रोड हवा आहे कि आपल्या वडार समाजाचे जीवन मान सुधारायला पाहिजे ते सांगा ? ? ? किती वर्षे , अजून किती वर्षे ह्या हरामखोर राजकारण्यांच्या " गमज्या " वर विश्वास ठेवत बसणार तुम्ही ? ? ? चोराला चोरू द्यायचे व बलात्कार्याला बलत्कार करू द्यायचा , आपण निमुटपणे सहन करत बसायचे , नाही का ? ? ?

ह्या वडार समाजाला स्वताचा असा मान , अभिमान , स्वाभिमान आहे कि नाही ? ? ?

वडार समाज बंधुनो , भाजप हा पक्ष उच्च वर्णीय लोकांचा पक्ष आहे , हे पटत असेल तर मी पुढे चालतो , इथे " नागपूर " चा आदेश चालतो, नव्हे नव्हे तो आदेश बंधनकारकच असतो . तिथे काही अपील नसते . माझ्या माहितीतील २ /३ तालुका अध्यक्ष आपल्या समाजाचे आहेत . परंतु ह्याच्या पुढे ते आपल्याला स्थान देणार आहेत का ? ? ? . . . माझे काही आक्षेप आहेत . ते मी पुढे मांडतो . . .

१ ) भाजपा मध्ये आरक्षणाला विरोध करणारे खूप लोक आहेत . मंडल / कमंडल हा वाद आठवून पहा . . . .OBC ला विरोध कोण करत आहे ? . . . . . तुम्हाला काय वाटते भाजपा सत्तेत आल्यावर हे लोक गप्प बसतील ?

२ ) भाजपा मध्ये विवेकानंद ह्यांना अभिप्रेत हिंदू धर्मा पेक्षा " सनातन " हिंदू धर्माला मानणारे लोक जास्त आहेत , शस्त्रे , हत्यारे , व अतिरेकी विचारसरणी व भडकावू भाषणे करणारे आहेत व ह्यांचे गुप्त इरादे असतात . नरेंद्र दाभोलकरांचे उदाहरण समोर आहे . . . . . तुम्हाला काय वाटते भाजपा सत्तेत आल्यावर हे लोक गप्प बसतील ?

३ ) भाजपा हा पक्ष शहरी विचारसरणी चा पक्ष आहे , त्यांचे " शायनिंग इंडिया " चालते , विविध तन्द्रज्ञान वापरून खरे खोटे आकडे समोर मांडून " आकडेमोडीचा " खेळ करण्यात हे लोक खूप पटाईत आहेत , पटवून देण्यात हे कुणालाच ऐकत नाहीत व आपला हेका सोडत नाहीत . . . . . . . . . बहुजन समाज व मागासलेल्या समाजाचे हे उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करतील असे आपल्याला खरोखरच वाटते ?

४ ) आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो व आपण हि सर्व विविध धर्माचे लोक एकमेकांच्या धर्माचा आदर करून एकत्रितपने राहतो . . . . . परंतु " आसाराम " सारख्या ताज्या प्रकरणामध्ये फक्त हिंदू म्हणून हे लोक अशा लोकांना पाठीशी घालणार नाहीत कशावरून ? ? ? ( ताजा संदर्भ : राम जेठमलानी ह्यांनी ह्यांचे वकील पत्र घेतले आहे )

असो . . . अजून हि काही मुद्दे आहेत परंतु मला समाजाशी संदर्भातच बोलायचे आहे .

बंधुनो , वडार समाजात राजकीय व्यक्ती प्रत्येक पक्षात आहेत , परंतु ते त्यांच्या स्व हिमतीवर आहेत , संपूर्ण महाराष्ट्रातील वडार समाजाचा एका पक्षातील अमुक एक नेता म्हणून असे सांगता येणार नाही . तसे अद्याप झालेले नाही हे आपले दुर्दैव आहे .

आपल्याला वडार समाज ह्या नावाने अद्याप राजकारण करताच आलेले नाही . बंधुनो ते करता आले पाहिजे . संपूर्ण समाजाची एक मागणी हवी .

प्रत्येक पक्षात आपल्या समाजाचे लोक आहेत तसे ते राहतील . प्रत्येकाची एक विचारसरणी असते व प्रत्येकाला आदरणीय असा राजकीय नेता हि असतो . परंतु आपण विभागले गेलो आहोत ह्याचा अर्थ असा नाही कि आपण सर्वांनी एका पक्षाला समर्थन द्यावे असे मी सांगत आहे परंतु . . . .

प्रत्येक पक्षाला आपल्या " वडार समाज " व " भटके - विमुक्त समाज " ह्यांच्या बद्दल त्यांचे स्पष्ट व निर्धारित धोरण त्यांचा कडून वदवून घेतले पाहिजे .

२ ० १ ४ चे पडघम वाजू लागले आहेत . राजकीय वातावरण दिवसे दिवस तापणार आहे , मी हि एका एका पक्षाला व त्यांच्या नेत्याला टार्गेट करणार आहे . आमच्या " वडार समाजाचा " आपण काय विचार केला आहे ? ? ? हा प्रश्न खुले आम विचारणार आहे ? त्यांना ह्याची दखल घ्यावीच लागणार आहे कारण आम्ही हि त्यांच्या पक्षाला मानणारी माणसे आहोत .

जो पक्ष खुले आम समोर येवून समाजाला व समाजाच्या प्रश्नांना सकारात्मक राहील मला आशा आहे समाज हि त्यांना साथ दिल्या शिवाय राहणार नाही . परंतु मला हा आवडतो व मला तो आवडत नाही हि नेभळट भूमिका समाजाच्या हिताची नाही .

हे सर्व सामान्य वडार बांधवासाठी आहे , वेगवेगळ्या पक्षाशी संबंधित आहेत त्यांनी त्यांना योग्य वाटते तसे करावे व समाजहित साधावे .

शेवटी नरेंद्र मोदींना माझा वैयक्तिक विरोध असण्याचे काहीच कारण नाही , त्यांच्या भाषणाचा व विषय मांडण्याच्या त्यांच्या पद्धतीचा मी हि चाहता आहे . खरे तर हा खरेच बब्बर शेर आहे . ह्या माणसाला किती विरोधक आहेत परंतु खरेच ह्यांच्याकडे जिगर आहे .

वरील आमच्या काही शंकांचे त्यांनी अथवा त्यांच्या पक्षाने " खुले - आम " खंडन करावे व वडार समाजाला सहकार्य करू असा आम्हाला जाहीर शब्द द्यावा . आमचे बरेचसे वडार समाज बांधव श्री नरेंद्र मोदि ह्यांना पंतप्रधान पदी असावेत म्हणून आसुसलेले आहेत , आशावादी आहेत , त्यांना ही तुम्ही भ्रमनिराश करणार नाहीत अशी भाजपा कडून अपेक्षा .

ताजा कलम : सर्व पक्षीय लोकासाठी , महाराष्ट्रामध्ये वडार समाज हा प्रत्येक जिल्ह्यात असून समाजाची लोक संख्या हि अंदाजे सुमारे ४५ लाख ते ५० लाखाच्या आसपास असावी . काही लोक ७० / ७५ लाख म्हणतात .

वडार समाज व सर्व भटके - विमुक्त समाज हे मिळून महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बिघडवू शकतात त्यामुळे ह्या पुढे जास्तीत जास्त समाजाच्या मागण्या व आमचा जीवनस्तर सुधारण्यासाठी राजकीय पक्षाकडून प्रयत्न व्हावेत .

सुज्ञास व मुत्सद्धी लोकांना जास्त सांगावयाची गरज नाही .

जय बजरंग ! ! ! . . . . . . जय वडार ! ! !
 

एकेकाळचे दोन चहा विक्रेते खूपच प्रसिद्धीच्या झोतात आहेत







September 16, 2013 

सध्या एकेकाळचे दोन चहा विक्रेते खूपच प्रसिद्धीच्या झोतात आहेत . दोघे हि गुजरातचेच आहेत

. एकाला अगोदरच काहींनी पुरता बदनाम केलेला आहे परंतु ते आता चांगल्या कारणासाठी देशात विदेशात , इन्टरनेट च्या जगात , विरोधकांच्या मुखात , लेखणीत , काहींच्या झोपेत अगदी " छा गये है " . काहींचा दूर दूर चा संबंध नसताना आता आभाळच पडणार आहे अशा आवेशात दुसऱ्यांनी ह्यांचेच ऐकावे , व ह्यांनाच सर्व कळते व तशी दृष्टी आहे अशा अविर्भावात वागत आहेत . त्यांना काय काय उपमा देत आहेत .

त्यांचे गुणगान गाणाऱ्यांना आता आनंदाच्या " उकळ्या " फुटू लागलेल्या आहेत . मारे देशाचे हेच एकमेव तारणहार असणार आहेत व आख्या देशात कुणी लायक नाहीत व हेच देशाला दिशा देवू शकतात अशा अविर्भावात हे वावरू लागले आहेत . ज्याच्या साठी ह्यांचा पक्ष प्रसिद्ध आहे तो धर्माचा " छुपा अजेंडा " हे लोक वापरणार ह्यात तिळमात्र शंका नाही . सुरुवातीला बहकावणार , नंतर बरोबर आपल्या औकाती वर येणार . . . ह्यांच्यात ठराविक लोकच पुढे असतात बाकी खालच्या थरातील लोक हे केवळ राबयालाच असतात .
भडकावणे व सेवा करून घेणे हे ह्यांच्या रक्तात असावे . असो

दुसरे चहा वाले , पूर्वी साक्षात देवाचाच अवतार होते , श्रीकृष्ण रुपी ह्यांच्या लीला चालायच्या . ४५० बळकावलेले मठ . १४ देशात ह्यांच्या भक्तगण व भक्त गणिकांचा पसारा . . . ५ कोटी ह्यांचे भक्त गण आणि गणिका आहेत म्हणे . आम्ही हि त्यात दुरून दुरून आदर करणारे होतोच हो , परंतु एका साधू पुरुषाला साधेपणा शोभतो परंतु ह्यांचे नटणे - सजणे काही मनाला पटत नव्हते . काय क्वालिटी चे ते औषधे , एकदा घेतली होती . . परत काही घेतली नाहीत .
ह्यांचे " गो-मूत्र " लोक खूप आवडीने घ्यायचे , शुद्ध व फिल्टर केलेले व जंतू रहित असते म्हणून. . ह्यांचे काही भक्त येत जाता मोठ्या आवाजात " हरी ओम " करायचे , आता दिसेनासे झाले आहेत . शंकेखोर मन त्यांच्या घराच्या सदस्या पर्यंत फिरून येत आहे आता ह्या चहावाल्याच्या बातम्या येयाला लागल्या पासून .

ह्या चहा वाल्याचा पूर्वी काय रुबाब होता हो , मलमली पांढरे शुभ्र कपडे , ताज्या आकर्षक फुलांचा व भरजरी कपड्यांच्या कलाकुसरीतून बनवलेला भरजरी शिरेटोप , दिमतीला गण ( भक्त ) आणि गणिका . . . . . देवा . . देवा . . . देवा . . देवा . . देवा . . देवा . .( देवा . . देवा .ह्या वाक्प्रचाराचा अर्थ माहित असेलच )

परंतु ह्या चहा वाल्याच्या खऱ्या काळ्या लीला ( कृष्ण - लीला नाही . . . .समजुन घ्या ) समोर आल्या नंतर ह्यांच्या चेहऱ्यावरचे अफाट तेज अचानक काळवंडले न . मी ह्यांव करीन न मी त्यांव करीन न , अशा फुशारक्या हवेत विरून गेल्या कि मग . खूप मानहानी झाली तरीही ह्याची तेढीच ! . मी निर्दोष आहे म्हणे . एकूण १८ बालहत्या आहेत म्हणे . . लापता व गायब झालेल्या व्यक्ती गायबच आहेत . बळकावलेल्या जमिनी व अनधिकृत बांधकामे हे ह्यांचे भुक्ति आणि मुक्तीचे मार्ग आहेत . साधूला संरक्षणाची काय गरज असते हो ? हेच तर आम्हाला पूर्वापार शिकवण भेटलेली आहे . मग कशाला पाहिजेत ह्यांना हत्यारबंद आयुधे ? . कपट कारस्थाने व षडयंत्र ह्यांचाच इथे जास्त बोलबाला होता म्हणायचं . बापच लिंग - पिसाट तर मुलगा खूप सात्विक असेल कशावरून ?

असो . ह्या चहा वाल्याला आता ३० सप्टेंबर पर्यंत कोठडी वाढली आहे . परंतु ह्याचा आता देवावर विश्वास राहिला नाही . देवाचा धावा करायचे ह्याने आता सोडून दिले आहे . आता ह्याचा कोर्टावर विश्वास बसला आहे . भारत देशात पांढऱ्या चे काळे करण्यात पटाईत असलेल्या एका सराईत वकिलाला ह्याने आता हाताला धरले आहे . ह्या वकिलाला आख्खी न्याय देवता सुद्धा घाबरते असा ह्यांचा वकूब आहे . आता जगण्यातच " राम " राहिला नसल्यामुळे , सगळी प्रतिमाच " मलिन " झाली असल्या मुळे आता एक तेरा सहाराच उरला आहे .

अध्यात्मात " रेटून खोटे " बोलणारे मोठ मोठे लोक असतात हे ह्या चहा वाल्यावरून व त्याच्या दलाल मुलावरून दिसून येत आहे .

खरेच हे सर्व जर सत्य असेल तर ह्यांनी धर्माला बाट लावला आहे . ह्यांच्यामुळे बदनाम झाला आहे . ह्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे . जेणे करून धर्माचे प्रदर्शन करणार्यांना चपराक बसावी व आपण कुणीतरी अवतारी पुरुष आहोत असा संभ्रम लोकांचा नाहीसा व्हावा .


शेवटी समारोप करता करता ह्या दोन चहा वाल्या मध्ये एक साम्य आहे व ते म्हणजे एकाच गवळ्याच्या ( धर्माच्या ) नावावर आपला धंदा तेजीत ठेवीत आहेत . दोघे व त्यांचे समर्थक धर्माच्या नावावर देश वासीयांची दिशाभूल करत आहेत .


आशा आहे धर्माच्या नावावर कुणीही राजकारण करू नये , फसवणूक करू नये , अडवणूक करू नये , व्यभिचार करू नये , अत्याचार करू नये . स्वताला एकमेव तारणहार समजू नये .

आपला देश खूप भारी आहे . इथे खोट्यावर हि प्रेम करणारे आहेत , . . . उघड झाल्यावर त्यांना पायाखाली घेणारे हि आहेत .

समजून घेणाऱ्या नि समजून घ्या .

जय हिंद . . . ज़य भारत . . . .वन्दे मातरम
 

खुदा करे ,... जिन हालत में से मै गया हूँ .... उस हालत में से तू भी जाये



8 : 00 am ........1/7/2011.........friday

तुझे तू , जो कुछ समझाना है वो समझ 
 हे नासमझ 

मेरे दिन अलग है ...मेरी रातें अलग
मेरे ख्वाब अलग है ....मेरे ख़यालात अलग
मेरे वादे अलग है ...मेरे इरादे अलग
मेरी चाहत अलग है .....मेरी हसरत अलग
मेरे शिकवे अलग है ......मेरी शिकायते अलग

तुझे ,मुझे कितना निचे दिखाना है वो दिखा
मेरी राहे अलग है ....मेरी मंझिले अलग
मै अलग हूँ ...मेरी पहचान अलग
मेरा ढंग अलग है ....मेरा जज्बा अलग
मेरी सोच अलग है ....मेरे सितारे अलग
मेरी कश्ती अलग है ....मेरे किनारे अलग

तुम मुझे जितना जलील कर सकती हो उतना कर
तुम मुझे कितना नजर-अंदाज कर सकती हो उतना कर
तुम मुझे जितना मामूली समझ सकती हो ,उतना समज
तुम मुझे झुट्ठी बातें कहकर बहलाना चाहती ही ,तो बहलाओ

तुम पर अब यकीं नही रहा
अब ज़माने पे भरोसा नही रहा
खुदा करे ,...

जिन हालत में से मै गया हूँ
उस हालत में से तू भी जाये
                                                         
3 : 44..................01/07/2011......friday

जिकडे पाहे तिकडे , तू ही दिसशी ........ चित्ताच्या देव्हार्यात तूच असशी




५  ; ५८ ...........१७ /५ /२०११ .......मंगलवार

जिकडे पाहे तिकडे , तू ही दिसशी
चित्ताच्या देव्हार्यात तूच असशी
बुध्दिच्या दात्या,......ध्यानाच्या ध्यात्या
सत् चित्त स्वरूपा , चिद घन आनंदा
उत्पत्तीच्या कारणा ,   जगत प्रति पालका , अंति तूची विनाशका
आदि ॐ बिज तूची असशी  

                                                         ...जिकडे पाहे तिकडे तूची दिसशी

संचित , प्रारब्ध , आणि क्रियामानाचे  " कर्म " तूची
भुत , भविष्य , आणि वर्तमाना चा  " काळ " तूची
सत्वगुण , रजोगुण आणि तमोगुनांचा "गुण " तूची
जाग्रति , स्वप्न आणि सुषुम्ना ह्या " अवस्था " ही तूची
परा , पश्यन्ति , मध्यमा आणि वैखरी ह्या " वाणी " ही तूची होशी
( सर्वत्र  असुनही त्याहूनही परता तूची असशी  )

                                                                     .....जिकडे पाहे तिकडे तू ची दिसशी 

आकाश , वायु , अग्नि , जल आणि पृथ्वी हे " तत्व " ही तूची 
तिन गुणांचा स्वामी अणि दहा इद्रियांचा " ज्ञानी " तूची 
सत्य ही तूच , तूची असे आनंद .....चैतन्य ही तूच ...तूची असे ब्रह्मानंद 
मूलाधार स्थित तुझी समाधी ,....जानू ना शकले पंडित , मौलवी  अणि   पाखंडी 
                                       
                                                                     ...जिकडे पाहे तिकडे तूची दिशसी 

" अमर " गळा  घालुनी तुलसीची माला 
करी नाम-चिंतन श्री-हरिचे ,      रात्र -दिनी   निजध्यानी जपुनी 
दगड मूर्त्या पुजिल्या ,
ज्ञानी माणसे पुजिले , 
डोंगर चढलो ,
 गंगेत न्हालो ,
 फुले वाहिली ,
 पारायणे   केली
 तरीही तुझा शोध संपलाच  नाही

श्री गुरु-चरणाला शरण आलो
 बध्द होतो ,...
स्वस्वरूपी विसावलो 

( बध्द आत्म्याला स्व-स्वरुपचे ज्ञान झाले ..सत्य उमगले ...)

5 : 58 ............17/5/2011

देखूं जंहा ,...पाऊ वंहा , मन - मंदिर में छिपे हो कंहा ?



3 : 16.........17 /5 /2011 ....thuesday
देखूं जंहा ,...पाऊ  वंहा
मन - मंदिर में छिपे हो कंहा ?
बुध्दी के दाता,....ध्यान के ध्याता
सत्   चित्त  स्वरुप ,..चिद  घन आनंद
उत्पति के कारन ,....जगत प्रति पालक ,...अंत में तू ही संहारक
आदि  बीज ॐ तू ही ....
                                                      .........देखू जंहा ....पाऊ वंहा

संचित , प्रारब्ध , और क्रियामन का " करता "  तू ही
भुत , भविष्य और वर्तमान का " समय "  तू ही
सत्वगुण , रजोगुण , और तमोगुणों का " गुण "  तू ही
स्थूलदेह , सूक्ष्मदेह और कारन देहों का  " देह " तू ही
जागृती , सपना और सुषुम्ना की " अवस्था " में भी तू ही
परा , पश्यन्ति , मध्यमा और वैखरी " वाणी " में भी तू ही
( इन सब में रहकर भी ...इन में भी तू कही  नही )
              .                                               ......देखू जंहा ...पाऊ वंहा

आकाश , वायु , अग्नी , जल और पृथ्वी के "तत्व " तू ही
तिन गुणों के स्वामी और दस इन्द्रियों के " ज्ञानी " तू ही
सत्य तू ही , तू ही आनंद .....चैतन्य तू ही , तू ही ब्रह्मानंद
मूलाधार स्थित तेरी समाधी
....जान ना पाये पंडित , मौला और पाखंडी
                                                             ....देखू जंहा ......पाऊ वंहा

दास " अमर " निश दिन तुझे जपे ......लिए तुलसी की माला
पत्थर पूजे , आदमी पूजे , गिरी चढ़ा , गंगा ( में खुद को ) धोया
फिर भी तू रहा हमेशा खोया खोया ...
गुरुचरण जब लीन हुआ

 आत्मा को आत्मा का ग्यान हुआ 
                                                                      
३ : ५६ .......१७ /५/ २०११......मंगलवार

Monday, February 10, 2014




तुमचा तो " धर्म " अन आमचा तो " पंथ " काय ? 

तुम्ही तेवढे " सनातन " आणि मग आम्ही " उपरे " काय ? 

तुम्ही तेवढे " सात्विक " अन बाकी सारे " अभद्र " काय ? 

तुम्ही तेवढे " आईचे " अन बाकीचे " शिंदळीचे " (शिंचीचे ) काय ?


अरे टकल्यानो  अन भामट्यानो , 


माणूस म्हणून जगायची सुद्धा तुमची लायकी नाय 

स्त्रीला अग्निकुंडात लोटणारी जात तुमची , 

स्त्रियांचे मुंडण करणारी नीच वृत्ती तुमची , 

गायीला माता  म्हणून सुरी फिरवणारी रीत तुमची , 

प्रसंगी अर्धांगिनीला सेवेला देणारी औलाद तुमची , 

( आई,बहिणी,पत्नी ) स्त्री लाही शुद्र समजणारी नीती तुमची 

स्त्रीयांच्या मासिक धर्माचा विटाळ मानणारी पिल्लावळ सगळी  


श्रेष्टत्वाच्या कसल्या  गप्पा मारताय भोन्दुनो , 


माणसातला , निसर्गातला देव तुम्हाला दिसत नाही 

शेकडो वर्षे पुरेल अशी  भेद-भावाची सोय मात्र करून ठेवलेली आहे 

१० ; २५ . . . . . . सोमवार . . . . . १० / ०२ / २ ० १ ४ 

माझ्या " कवितेची " आज परीक्षा आहे.... प्रतिभेला फुलोरे नाहि आले तर ? ? ? ?



माझ्या " कवितेची " आज परीक्षा आहे....
 
प्रतिभेला फुलोरे नाहि आले तर ..........
 
तिला देहांताची अथवा काळ्या पाण्याची सजा आहे ...
 
मी फक्त तिच्या साठीच लिहितोय .......कि ....
 
का....माझ्याकडे हि काहीतरी आहे ...?
 
आज ह्यांचीच गाठ - भेठ  आहे.
 
आज  तुझे सौंदर्य  मी वर्णू कशाला..?
 
आज मीच माझी थोरवी गात आहे ..
 
माझ्या मुळेच तुझे महत्व वाढले  आहे
 
मीच फुलवलेली तू बगीचा आणि बाग आहे
 
नको वल्गना करूस तू आपल्या पुष्टतेच्या ...
 
तुझ्यावर मी हा घेतलेला प्रती - शोध आहे ..
 
ते बघ ...तुझ्या बिंबात......
 
मीच वर्णिलेली स्थळे तू शोधीत आहेस
 
कुठून आणशील जवाब मजला......?
 
आज मीच लाजवाब आहे ,
 
मी आहे म्हणुनी तू हि आहेस ....
 
माझ्या कवितेची तू प्रेरणा झालीस ...
 
..हे हि तुझे सौभाग्य आहे ...
 
माझ्या बरोबर केला ,असा उच्छांद तू पुन्हा मांडू नकोस
 
(  किती हि चांगले असले तरीही )
 
खरकट्या अन्नाची काय गत होते ...हे तू विसरू नकोस
 
तू तर जाशीलच ......तरी माझी  " कविता " राहणार आहे
 
तुझ्या मागे  मी हि गेलो तरी ........

मीच " अमर " राहणार आहे ..
 
मीच " अमर " राहणार आहे
 
                             
 
2;27.......monday........21/2/2011