Wednesday, June 11, 2014

आज वट-पौर्णिमा ...प्रचलित प्रथे प्रमाणे तमाम पुरुष वर्गासाठी , महिला वर्गाकडून केले जाणारे व्रत .



आज वट-पौर्णिमा ...प्रचलित प्रथे प्रमाणे तमाम पुरुष वर्गासाठी , महिला वर्गाकडून केले जाणारे व्रत ...सावित्री ने तिच्या सत्यावानासाठी केलेले व्रत ...सर्वच लोकांना ह्या पुराणातल्या कथे विषयी कल्पना आहे ,असावी ...

आपल्याकडे जे सण साजरे केले जातात त्या पाठीमागे आपल्या पूर्वजांचा ठोस असा गहिरा अर्थ दडलेला असायचा ..सण हे प्रतीकात्मक रूप म्हणून साजरे करायला सुरुवात केली असावी , नव्हे नव्हे ते प्रतीकात्मकच होत ...आपल्याकडच्या भट्ट - ब्राह्मणांनी त्याचे दैवतीकरण करून अनेक रूढी आणि परंपरा निर्माण करून ठेवल्या आहेत ...आणि नटायला थाटायला मिळत म्हणून आपणही असल्या प्रथेला घट्ट चिटकून बसलो आहोत .आज पुरुषाच्या पुढेही व त्याच्या मागेही त्यांच्या सत्यवानाचा काय काय उद्धार करतात हे सांगायला नको ...आणि सत्यवान हि आता सत्यवादी राहिले नाहीत .असो त्या खोलात आपल्याला जायचे नाहीं ..आपण वट - सावित्री व्रत काय आहे हे समजून घेऊयात ....

हा जो वट म्हणजेच वड जो आहे त्याचे बीज मोहरी सारखे बारीक असते ..परंतु ते बीज वाढीला लागले कि त्याचा विशाल काय अशा मोठा वृक्ष होतो ..आता पर्यावरण च्या दृष्टीने व नैसर्गिक समतोल राखण्याच्या दृष्टीने हा वटवृक्ष कसा आपली भूमिका वाटावतो ते पहा ....हा वृक्ष सतत हिरवागार असतो ..तसेच ह्याची थंडगार सावली अनेक पांथिकाना क्षणभरासाठी आपला सर्व क्षीण व परिश्रम घालवण्यास मदत करतो. ह्या वडाच्या मुळांच्या खोपटात लांडगे , कोल्हे , खोकडे ह्या प्राण्यांची वस्ती असते ..खोलवर बिले पडलेली असतात ..शेजारीच लाल मुंग्या , काळे देण्गल्या मोठाल्या तोंडचे मुंगळे हे सतत वर खाली करत असतात ..खारुताई ची लगबग सतत खोडावरून फान्ध्यावर चाललेली असते..वडाच्या फांद्यावर माकडे मुक्तपणे उच्छांद मांडत असतात ..ह्या झाडावर बहुतेक पक्षांची घरटी पाहायला मिळतील . चिमण्या , कावळे , घुबड इत्यादी हर तर्हेचे पक्षी व त्यांचा तो मंजुळ स्वर कधी कधी साळून्क्यांची एकचं घाई ....झाडाच्या शेंड्यावर गरुड , गिधाडे ह्यांचे डेरे....अशातच कधी झाडावर एखादा सर्पराज दिसला कि पक्षांची होणारी धांदल व साळून्क्याचा होणारा कलkalat ...सुतार पक्षाचे फांदीच्या खोपीतून अलगद बाहेत येणे ...मधीच सळसळनारी पाने...मध्येच होणारा कोलाहल ..मध्येच दाटणारी निरव शांतता ...मध्येच वरून एखादे टपकन खाली पडलेले पक्षाचे पिल्लू ..व त्याची अस्तित्व साठी चाललेली धडपड ...अशातच कुणीतरी बेसावध पने त्यावर घातलेली झडप ......

......अशा एक ना अनेक घटनांचा , प्रसंगाचा हा एकमेव साक्षीदार म्हणजेच वटवृक्ष ..ज्या वृक्षावर कित्येक किड्यांचे ,कित्येक प्राण्यांचे , कित्येक पक्ष्यांचे ,कित्येक भ्रमरांचे , कित्येक आलेल्या - गेलेल्यांचे आयुष्य आवलंबून असते ...ह्या झाडावर पूर्ण चैतन्यच अवतरलेले दिसते ..संपूर्ण प्राणी मात्रांची वस्तीच तिथे नांदत असते ....बरे ह्या वड वृक्षाचे आयुष्यही शेकडो वर्षांचे असते ...म्हणजेच त्या वट वृक्षाने तेथील प्राणी - पक्षांच्या कित्येक पिढ्या पाहिल्या असतील ..कमीत कमी सात पिढ्या तरी नक्कीच ...हो ना ?

अशा ह्या वड वृक्षाच माणसालाही खूप उपयोग आहे ..ह्या वृक्षाच्या छायेत जी झोप लागते ती नक्कीच फोम च्या गादीत येणार नाहीं ...ह्यांच्या पारंब्या ना लटकून मस्त उंच च्या उंच झोके घेत| येतात ..ह्याच्या लाकडाचा जळणासाठी , घरगुती वापरासाठी उपयोग होतो ...अशा प्रकारे हा वृक्ष सर्वच जीव मात्रासाठी जगण्याचे वस्ती स्थान आहे ...खास करून जंगलातील ह्याचे अस्तित्व हेच अधिरेखीत करते ...

...एवढे असूनही हा वृक्ष स्थितप्रज्ञ सारखा असतो ...सर्व साक्षी असतो ...तरीही खंबीर पने उभा ....सर्वाना उपयोगी पाडण्यासाठी सदैव तत्पर .

....चला आता आपल्या सत्यवान - सावित्री कडे येउयात ...आजच्या काळी स्त्री व पुरुष दोघेही कमावतात व स्वताचा संसार चालवतात ...पूर्वीच्या काळी असे नव्हते ..तेंव्हा ती जबाबदारी पूर्ण पुरुषाचीच असायची ....त्या मूळे पुरुषाचे असणे ( जिवंत ) हे खूप महत्वाचे असायचे .व त्या काळी गाई व बाई हि नेहमी संरक्षणात असायची ...मोकळी गाय व मोकळी बाई दिसली कि कुणीही तिला आपली म्हणून घेऊन जायचे ...अशा अवस्थेत घरात अवलंबून असणार्यांची पूर्ण जबाबदारी हि कुटुंब प्रमुखावर असायची ..घरातील वयस्कर व्यक्ती , लहान मूले , तरुण स्त्रिया ..ह्यांचे कर्ता पुरुष गेल्यावर काय हाल होतील ...ह्या साठी ....त्या कर्त्या पुरुषाला खूप आयुष्य मिळावे व आपले संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहावे हा मूळ स्वार्थ असायचा ( कुणी ह्याला त्याग हि म्हणा हवे तर )...व असे केल्या मूळे आपली मुले, नातवंडे पर्यायाने संपूर्ण वंशच सुरक्षित राहील ...हा विचार त्या मागे असावा ...

....आता बंधुनो असा विचार करा कि ....तो वट वृक्ष कोसळला आहे , उन्मळून पडला आहे ....व इकडे आपला घरातील प्रमुख हि अकालीच आपल्यातून निघून गेला आहे ....तर त्या वट वृक्ष्यावर अवलंबून असणाऱ्या जीव सृष्टीचे काय हाल होतील व इकडे आपला मुख्य करता पुरूषाच आपल्यातून निघून गेला तर घरातील सर्वांची कशी वाताहत लागेल ...?

बंधुनो , हा विचारच नको ...घरातील कर्त्या पुरुषाला उदंड आयुष्य लाभावे ...व नैसर्गिक जीव चक्र ज्या झाडावर अवलंबून आहे त्या वट वृक्षाचे हि संवर्धन होवो ....

...पूर्वी गावाची नवे कशी होती ...आंबेगाव , पिंपळगाव , वडगाव , चिंचवड , पिंपरी . तेम्बुर्णी, जाम्बळगाव , ..आता आहेत ...इंदिरा नगर , नेहरूनगर , राजीवनगर , गांधी नगर , ...काय हि नावे ?..

मित्र हो , बंधुनो ...जागे व्हा ....नैसर्गिक समतोल ढळू देऊ नका ...

झाडे लावा ...झाडे जगवा ...आपले व आपल्या येणाऱ्या पिढीचे आयुष्य सुसह्य करा......
 

जाता जात नाही , तिचे नाव " जात " . . . . .जाती साठी माती खायाला लावते , तिचे नाव " जात "



जाता जात नाही ,  तिचे नाव " जात " 

जाती साठी माती खायाला  लावते , तिचे नाव " जात " 

जाईल तिथे अब्रू घालवते , तिचे नाव " जात " 

अंगी भलता ताठा  भरवते , तिचे नाव " जात " 

जिच्या मुळे  माणसे  विभागली गेली , तिचे नाव " जात " 

राख- रांगोळी होते , तरीही प्यारी असते ती " जात " 

शरीराची माती होते , तरी फोटोलाही  चिकटते हि " जात " 

या " जातीच्या " अंतासाठी लढले , त्यांची झाली " राख  " . . . 

सर्वांनाच पुरून दशांगुळे उरली तिचेच  नाव हे " जात " 

गोचीडावाणी चिकटून बसली , अहंकाराला धरून राहिली 

वृथा अभिमानाला सोकावली , अशी कैदाशीण हि " जात " 


११: ०० - - - - - -  ११ / ०६  / २०१४  - - - - -  बुधवार 

भारताचा रंग हा तिरंगाच असावा . . . त्यापुढे ना दुसरा धर्म रंग उरावा



एक जण  म्हणाला . . .  

आम्ही हिंदू - मुस्लिम आणि दलित यांना एकत्रित करणार आहोत . . 

कसे शक्य आहे जातीय राजकारणात हे ? 


भगवा , हिरवा व निळा  एकत्र कसे नांदू शकतील ?

सगळ्यांच्या विचारधारा भिन्न , कार्यपद्धती भिन्न , आक्रमकता भिन्न 

प्रत्येकाला आपल्या रंगाचा देश  हवाय . . . 


भगवा , भारत " भगवामय " करू पाहतोय , 

हिरव्याला , " हिरवा हिंदुस्थान  " हवाय . . . 

निळया ला , निळा  " बुद्धकालीन भारत " हवाय , 

पांढरा  बोलतो कमी पण , त्याला " धर्म-निरपेक्ष  इंडिया " हवाय . . 

 तेवढ्यात त्याचे हि " साधते " 


बाकी रंगा ना  इथे विचारतो कोण ? 

गडद रंगानी त्यांचे अस्तित्व डाग लागलेल्या ठिपक्या सारखे करून टाकलेले आहे . . 

आम्हाला " हरा भरा " भारत नको आहे , 

ज्याला त्याला आपलाच झेंडा रोवलेला हवाय . . . 


प्रत्येक पक्षाच्या झेंड्यावर जातीय रंग दिसतातच . . . 

नवीन पक्षाची तर ती अगतिकता असते , 

स्वताचे अस्तित्व निर्माण करण्याचे ते " साधन " असते . . . 


आपला रंग , आपला धर्म आपण पाळावा ,. . . 

तो दुसऱ्यावर  का म्हणून थोपवावा ? 

आपल्या रंगाचे , आपल्या धर्माचे महत्व आपण वाढवावे . . . 

दुसऱ्याचा  जीव का घ्यावा ? 

आपला रंग , आपला धर्म , आपला महात्मा आपला म्हणावा व जपावा . . . 

त्याला दुसऱ्या धर्मावर  का लादावा ? 


भारताचा रंग हा तिरंगाच असावा . . .  त्यापुढे ना दुसरा  धर्म रंग उरावा 

धर्मा -आधी हा देश असावा , 

देशासाठी सांडणाऱ्या रक्ताचा रंग " लाल च " असावा . . . 


६ : १२ - - - --  - - - -  ११ / ६ / २०१४  - - - -- - - बुधवार 

Tuesday, June 10, 2014

सरीवर सरी बरसाव्या , . . . . दाट कोंदाटून यावे . . .



सरीवर सरी बरसाव्या 

दाट कोंदाटून यावे . . . 

विजांचा कडकडाट  व्हावा . . . 

ढगांचा गडगडाट व्हावा . . . 

रस्ताही निर्मनुष्य व्हावा . . . 

अंगावर झेलत सरी . . . 

अन मनात तुझ्या आठवणी . . . 

मुक्त वाहू द्यावे वाटे अश्रूंनाहि . . 

एक एक पाऊल . . . 

एक एक आठवण 

विसरून सर्व काही . . . 

विसरून सर्व काही . . . .  

९ : ५३  - - - - - --  १० / ६ / २०१४  - - - - - - मंगळवार 

Monday, June 9, 2014

मी कविता करतो , . . .. पण " कविता " मला आवडत नाहीत



मी कविता करतो , पण " कविता " मला आवडत नाहीत  

आपली कविता स्वच्छंदी आहे , ती छंदातील नाही . . 

ती वळणा वळणाने जाणारी आहे , सरधोपट नाही 

त्यातले मला काही कळत  नाही , कळून सुद्धा घ्यायचे नाही . . . 

छापायच्याच नाहीत , कुणाला ऐकावायाच्याच नाहीत , त्यामुळे काही घोर नाही 

कविवर्यांच्या लोक चार हात दूर असतात याची मला जाण आहे . . 

जिथे ऐकणारा कान दिसतो , तिथे यांचे वाचन सुरु होते . . . . 

मी २५ वर्षापूर्वी अशीच एकाला , कविता शिकवली . . . 

त्याने मला " गुरु " मानलं  , मलाच कविता ऐकवू लागला . . 

मी तिथेच राहिलो , तो कविता संमेलन गाजवू लागला . . . 

आता तो मला हैराण करू लागला , नुसत्या कविता वाचून दाखवू लागला . . . 

माझी मुसिबत वाढली , त्याच्या वह्या वाढू लागल्या . . . 

कुठलीही कविता वाचणे , हि घोर शिक्षा वाटू लागली . . . 

त्यानेही ते ओळखले , त्यानेही त्याचा गुरु बदलला . . . 

आम्हीही " कवितेचा " नाद कायमचा सोडला . . . 

७ : ५९ pm - - - - - -  ६ /९/ २०१४ - - - - --  सोमवार 

ना " जय हिंद " म्हणूशी वाटत . . . ना " जय महाराष्ट्र " म्हनुशी वाटत . . . ..



ना " जय हिंद " म्हणूशी वाटत . . .  ना " जय महाराष्ट्र " म्हनुशी वाटत 

ना " छत्रपतींचा " जयजयकार करुशी  वाटत . . .  ना आंबेडकरांना " जय भीम " बोलुशी  वाटत . . . 

काही मंडळीनीच त्यावर मालकी मिळवल्या सारखे वाटत आहे , . . 

मोठ्या महा-पुरुषांना  खुजेपणा आणला आहे काही लोकांनी 

लुटायला देश सोडला नाही कि जात सोडली नाही 

बलत्कार करायला अबला सोडली नाही कि बाहुलीशी खेळणारी मुलगी सोडली नाही 

प्रत्येक धर्म आता शिव्यांचा कोठार  झाला आहे . . . 

तो ह्याला अन हा त्याला " खिंडीत " पकडू पाहत आहे 

विद्वेष पसरवणारी नवीन तंत्रे अन माध्यमे निर्माण झाली आहेत . . 

राजकारण आता प्राणाशी , जीवाशी खेळले जातंय . . . 

माशाला पकडायला आकडा टाकताना ज्या सहजतेने गांडूळाचा धारदार टोकाला लावले जाते 

त्याच सहजतेने गरिबाला मरण्यासाठी पुढे केले जात आहे 

कधी कधी हा देश फक्त काहींचाच वाटतो . . . 

कारण " काहीच " इथे सत्ता गाजवत आहेत , 

आपल्याच वैभवात , आपल्या मस्तीत , दिखाव्यात , राहत आहेत . . .  

आम्ही केवळ भरडली गेलेली , भरडण्यासाठी असलेली प्रजा . . .  

आमच्या देशाभिमानाला कसली आली आहे किमत , अन कसला आलाय गौरव ? 


९ / ६ / २०१४  - - - - -  १२ : ५३ Pm . . . , , ,   सोमवार 

Sunday, June 8, 2014

तरुणांच्या भविष्याला हे असले " खत - पाणी " कोण घालतय ?



एक धर्म आंधळा " तलवार " उपसतोय . . .

दुसरा धर्म मार्तंड तरुणांचे " माथे " भडकवतोय . . .

तिसरा धर्म- वेडा " बॉम्बस्पोट " करतोय . . .

चौथा धर्म-पिशाच्च " द्वेषभाव " वाढवतोय . . .

पाचवा नपुसंक विकृत होवून " गालबोट " लावतोय . . .

हे अचानक " तन " कसे काय माजले ?

ह्यांचा धर्म " कमी " कुठे पडला ?

जिकडे संधी तिकडे तोंड फिरवणाऱ्या " गांडूळाच्या " औलादी ह्या ?

तरुणांच्या भविष्याला हे असले " खत - पाणी " कोण घालतय ?

९ : ४ ४ - - - - -- ८ / ६ / २०१४ - -- - - - रविवार