Tuesday, August 19, 2014

ती येते आणि बरसून जाते . . . . . .. आठवणी मागे ठेवून जाते




ती येते आणि बरसून जाते 

आठवणी मागे ठेवून जाते 


चिंब तिच्यात भिजण्यात , सरी तिच्या झेलण्यात 

मन मोहरून जाते , तन हि शहारून जाते 


ओघळ आठवणीचे , खपल्या तिच्या स्मुर्तीच्या 

रिमझिम पावसाची , भावना ना कुणा कळाव्या 


जेंव्हा नभ दाटते , थोडे अंधारून येते 

सखी माझी मला , ओल्या सरीतून भेटते 


आज हि कोंदाटले , आज हि अंधारले 

मी स्तिथप्रज्ञ होवुनी , सरी उरी खेळवल्या 


~~~~~~~~~~~~~~~~~ कुसाळकर ब्रदर्स 


१० : ३९ ~~~~~~~~ मंगळवार ~~~~~~~~ १९ / ०८ / २०१४

Thursday, July 24, 2014

वादळात हि मी स्तब्ध असा . . जसा अविचल मेरुमंदार उभा



वादळात हि मी स्तब्ध असा  

जसा अविचल मेरुमंदार उभा 


कित्येक वादळे आले , गेले 

मी तटस्थ लोहस्तंभ जसा 


आघाताने मी वज्र झालो 

प्रतिकाराने मन हे खंबीर 


भेटला त्याने दिला धडा 

जीव लावला तो घेई  वळसा 


मी मुळचा मृदू , संवेदनशीलच 

काळाने मला बनवला हिरा 


मी हि उन्मळून पडणारच 

पण 

वादळालाही पुरून उरणारा मी 

कोण जाने ती झुळूक येईल केंव्हा ? 


११ : २२ ~~~~~~~~ २४/ ०७ / २०१४ ~~~~~~ गुरुवार 

Thursday, June 26, 2014

नुसतंच वार सुटतंया . . . आभाळ आलेलं , . . . दूर वाहून नेतंया


नुसतंच वार सुटतंया  . . . 

आभाळ आलेलं , . . . 

दूर वाहून नेतंया  


नुसतीच मान वर जातीया . . . 

आभाळाकड बघून , . . 

पेरणीची तगमग वाढतिया  


देवा , कसं  रे व्हायचं  ? 

आभाळ येतया . . . 

अन तसंच  निघून जातया . . .  

२७ / ६ / २०१४ - - - - - - - -  ७ : ५१ - - - - - - शुक्रवार 

Sunday, June 22, 2014

बडा हुवा तो क्या हुवा , जैसा पेड खजूर ? . . . .. . पंथी को छाव नही , फल लागे अति दूर ।




बडा हुवा तो क्या हुवा , जैसा पेड खजूर ?

पंथी को छाव नही , फल लागे अति दूर । 

नारळ , खजूर , या सारखे काही झाडे असतात ती खूप उंच वाढतात , त्यांची फळे खूप चांगली असतात , मधुर असतात , त्यांची स्वताची अशी खास गोडी असते परंतु दुर्दैव असे असते कि ते हाताला लागतील अशा अंतरावर नसतात . 
…. अशा झाडा जवळ गेल्यानंतर व्यक्ती कितीही भुकेला , थकलेला , तहानलेला असेल तरी त्याला त्याचा थोडा थकवटा घालवण्यासाठी , त्याला ह्या झाडाखाली उन्हापासून सरंक्षण होईल अशी सावली सुद्धा मिळत नाही . उंचावर पाहिले तर गोड अशी फळे दिसत असतात परंतु अनेक प्रयत्ना नंतर ते हाताला लागत नाहीत व शेवटी अशा झाडाजवळ गेल्या नंतर पदरी निराशाच पडते . 

वरील उपमा हि अशाच वृत्तीच्या लोकासाठी वापरली गेलेली आहे , काही व्यक्तींचे खूप नाव झालेले असते , त्यांच्या भोवती प्रसिद्धीचे वलय असते परंतु अशा व्यक्तींच्या जवळ गेल्यानंतर खूप भ्रम निराशा होते , एवढी कि असल्या व्यक्ती बद्दल पुढे पुढे अन्तर च ठेवूशी वाटते …

…. कारण ती व्यक्ती आपल्यासाठी व समाजासाठी हि काहीही कामाची , उपयोगाची नसते . समाजापासून अथवा जमिनीपासून आपली नाळ तुटलेली असते व त्यांच्या वाढलेल्या अपेक्षांना समाज पुरे पडत नसतो . असो . 

या बाबतीत मला काही बालपणाच्या गोष्टी आठवतात , ज्या निसर्गाच्या सानिध्यात मी वाढलो , रानावनात , जंगलात हिंडलो , बागडलो त्यातील काही अनुभव मला ह्या बाबत आपणाशी शेयर करुशी वाटत आहेत . 

मी लहानपणी जेंव्हा डोंगरात , जंगलात , शेतात , रानावनात फिरायचो तेंव्हा अनेक गावरान मेवा व फळांचा आस्वाद घ्यायचो . रान फळामध्ये मला खूप आवडणारे फळ म्हणजे निवडुंगाचे बोडं , बोरे , चिंच आंबे इत्यादी . 

निवडुंगाच्या बोंडाची गंमत अशी होती कि ते मिळवण्यासाठी शोधण्यासाठी जंगलात खूप आत पर्यंत जावे लागत असे , निवडुंगाचे झाड जरी सापडले तरी त्यावर आलेले पिकलेले बोडं शोधणे हे अनुभवाचे काम असते . निवडुंगाच्या झाड हे खूप अडचणी मध्ये असते , त्याच्या आजू बाजूला काही सरपटणारे प्राणी असण्याची खूप शक्यता असते . त्यातून हि मार्ग काढून मधुर अशा बोंडा पर्यंत पोहोचायचे म्हणजे निवडुंगाच्या काट्यांचे ओरखडे हे ठरलेलेच . बर्याच प्रयत्नांनी असे एखादे बोंड मिळवले व ते खाण्याला सुरुवात करायची म्हटले तर ते आहे तसेच खाता येत नाही कारण त्यावर खूप काटे असतात व ते बाजूला करून आतील लाल लाल मधुर फळ चाखायची मजा काही औरच असते . हि गोष्ट इथेच संपत नाही आतल्या लाल गरामध्ये सुद्धा अति सूक्ष्म काटेरी जिभेला भयंकर टोचणारी असे काटे असतात . इथे हि अनुभव च कामी येतो . जो अनुभवी व्यक्ती , माहितगार असतो केवळ तोच ह्या निवडुंगाची फळे चाखण्यात यशस्वी होतो व मधुर फळाचा आस्वाद घेवू शकतो . 

आम्ही रानात फिरताना आम्हाला बोराची कुठली झाडे आंबट , कुठली तुरट , कुठली किड्यांनी भरलेले व कुठले मधुर , गोड , व चव टिकून राहणारी होती , हे आम्हाला खूप चांगले माहित असायचे . आम्ही एका चांगल्या पिकलेल्या बोरासाठी अनेक प्रयत्न करून ते मिळवायचोच . आणि त्याच वेळी जी आंबट , कडू व किडकी फळे असलेल्या झाडांकडे आम्ही चुकून सुद्धा पाहत नव्हतो . 

हीच गोष्ट चिंचेच्या झाडाची . ज्या चिंचेच्या झाडाला चवदार व आंबट गोड चव असेल त्याच झाडाकडे आमचे लक्ष असायचे परंतु अत्यंत आंबट , कडवट असणाऱ्या झाडावर चिंचा लगडलेल्या तर दिसत असायच्या परंतु त्या चिंचेच्या झाडाचे अंगभूत गुण सगळ्यांना माहित असल्यामुळे कुणी तिकडे फिरकत हि नसायचे . 

अगदी तशीच गोष्ट आंब्याच्या झाडांची , काही झाडांना येणारे आंबे हे बारीक असायचे परंतु त्याची चव अशी काही असायची कि कितीही उंचावर पाडाचा आंबा दिसला कि तो आमच्या हातून सुटत नव्हता . परंतु काही आंब्याची झाडे नुसतेच मोठाले परंतु चवीला आंबट तर काहींच्या नुसत्याच कोया मोठ्या , आकाराला आंबा मोठा परंतु रसाला काहीच नसायचा , काही आंब्यांच्या झाडाला येणारे आंबे हे खूप केसाळ तंतुमय त्यामुळे आम्ही त्या झाडाकडे लक्षच देत नसायचो . 

. . . . . . मला आज असाच एक समाजाचा मोठे नाव असलेला माणूस भेटला परंतु त्यांचे समाजा बद्दलचे विचार ऐकून मी खूप विचारात पडलो .एवढे नाव कमावलेला माणूस आहे , ज्याचे नाव समाज खूप आदराने घेत आहे परंतु त्याचे समाजा बद्दलचे विचार ऐकून आमचे मन कडवट झाले . 

नारळ व खजूर हि फळे तशी आरोग्य व शरीराच्या पोषकतेच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहेत , त्याची फळे हि तंत्राने मिळवता येतात , असली झाडे हे अहंकाराने ताडा-माडा सारखी उंचच उंच वाढलेली असली तरी ती फळे त्यांच्या उपयोगतेते मुळे आपण अनेक प्रयत्न करून मिळवू शकतो …परन्तु ?? ? ? 

……. परंतु तुरट , कडवट ,आंबट , किडक्या फळाप्रमाणे समाजातील काही व्यक्तींचे आपण आपला म्हणून खूप गुणगान गातो परंतु त्यांचा समाजाला कितीसा लाभ भेटतो हे पाहिले कि प्रश्न चिन्हच उभे राहते . 

एक मराठी म्हण आहे व एका जुन्या मराठी चित्रपटामध्ये एक डायलॉग होता . . 

" सर्जा , तुझा काहीहि उपयोग नाही , तू खायला काळ आणि भुईला भार आहेस " 

समाजासाठी हि अशा काही भार असलेल्यांचा समाजाने जास्त विचार करू नये व काही कडू / आंबट झाडांकडे जसे आपण दुर्लक्ष करतो तसे यांना जास्त किमत न देता चांगल्या लोकांच्या शोधात रहावे . 

आपल्या विचाराने , वागण्याने गोडवा निर्माण करणाऱ्या दुर्मिळ व्यक्तींना समाजाने डोक्यावर घ्यावे . 

Saturday, June 21, 2014

कितने सहज नैनों से ओझल हो गया वो चेहरा .. . ..



कितने सहज नैनों से ओझल हो गया वो चेहरा 

कितने सहज उस चेहरेने भुला दिया ये चेहरा 

कितने सहज याद आता है वो चेहरा 

उतनेही सहजतासे रुला देता है वो चेहरा । 

९ : २० - - - - - -  २२ / ०६ / २०१४ - - - -  रविवार 

Friday, June 20, 2014

क्षण क्षणा हा ची करावा विचार | तरावया पार भव सिंधु । |



क्षण क्षणा हा ची करावा विचार | तरावया पार भव सिंधु । |

नाशिवंत देह जाणार सकळ | आयुष्य खातो काळ सावधान । |

संत समागमी धरावी आवडी । करावी तातडी परमार्थाची । ।

तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे । नका डोळे धुरे भरुनी राहो । ।

---------------- संत तुकाराम महाराज

आपले हिंदू धर्म शास्त्र हे प्रामुख्याने कर्म सिद्धांतावर आधारलेले आहे , त्यातील मुख्य धर्म ग्रंथ म्हणून आपण " श्रीमद भागवतगीता " ग्रंथाला विशेष महत्व देतो व त्यातील युध्द भूमीवरील श्रीकृष्ण - अर्जुन संवाद म्हणजे अध्यात्मातील अतिउच्च अनुभव आहे . व त्यात अर्जुन आपल्या भावंडाना / नातलग / जेष्ठ व वंदनीय गुरु समान व्यक्तींना युद्धासाठी आपल्या समोर पाहून भांबाहून जातो . अशा पार्श्वभूमीवर अर्जुनाला केलेला श्रीकृष्णाने उपदेश म्हणजेच गीता होय , ह्या गीतेला आधुनिक संत विनोबा भावे " गीताई " असे म्हणत , महात्मा गांधीनी सुद्धा शेवटपर्यंत आपल्या आयुष्याचा आदर्श म्हणून गीतेलाच सर्वोच्च स्थान दिले होते व ते त्याचे रोज नित्य नियमाने पठाण करत असत . लोकमान्य टिळकांची विद्वत्ता व त्यांचा व्यासंग व त्यांचे अध्यात्मातील श्रेष्ट्त्व अनुभवायचे असेल तर त्यांनी लिहिलेल्या " श्रीमदगीतारहस्य " अर्थात कर्मयोग शास्त्र हा गीतेवरील भाष्य करणारा ग्रंथ अवश्य पहावा . लोकमान्य टिळक तर ठासून सांगतात कि सर्वात श्रेष्ठ हे कर्मच आहे व गीतेमध्ये सुद्धा तोच विषय प्रतिपादित केलेला आहे .

आपल्या महाराष्ट्रातील संत कुळातील संत महात्म्यांनी सुद्धा कर्माला अधिकाधिक महत्व देवून ते सामान्य जणावर बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे , संत तुकाराम महाराज ह्या अभंगात आपल्याला कर्मच कसे श्रेष्ठ आहे व आपण क्षणा - क्षणाला त्याचा कसा विचार केला पाहिजे व का विसर पडू दिला नाही पाहिजे हे हे सांगत आहेत . संतानी आपल्या अभंगात अनेक ठिकाणी असे लिहून ठेवलेले आहे कि कर्म हे तीन प्रकारचे असतात. ( १ ) प्रारब्ध ( २ ) संचित ( ३ ) क्रियमाण असे तीन प्रकार होत . प्रारब्ध व संचित हे पूर्व कर्मानुसार प्राप्त होणारे फलित असतात परंतु क्रियमाण म्हणजेच वर्तमानात अर्थात सद्यस्थितीला जे आपण कर्म करत असतो ते होय . एखादी व्यक्ती हि दैवहीन , धनहीन , व गरीब असू शकते त्याला आपले पुढील आयुष्य शेवट पर्यंत चांगल्या पद्धतीने जगायचे असल्यास , त्याचे व्यावाहारार्थाने म्हातारपण चांगले जावे असे वाटत असल्यास व त्यानंतर हि आपल्या जीवनाची व शरीराची आबाळ होऊ नये असे वाटत असल्यास त्याने आपले वर्तमानातले क्रियमाण हे सतत चांगले ठेवले पाहिजे व सतत कार्यरत राहिले पाहिजे . अध्यात्माच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास आपल्या आत्म्याला ईश्वराचे अनुभूती मिळून आपल्या आत्म्याला पुढील जन्मी चांगली जन्मयोनी प्राप्त होवून आपल्या आत्म्याला मोक्ष - प्राप्ती मिळावी असा आहे . मोक्ष - प्राप्ती जरी खूप लांबची गोष्ट असली तri , आहे हे आयुष्य सुसह्य होवून आपल्याला शेवट पर्यंत आयुष्य सुख - समाधानात , आनंदात घालवता आले तरी खूप आहे .

म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कि आपण आपला क्षणा क्षणाला विचार करावयाला हवा जेणे करून आपले हे अनंत अडचणीचे , मायावी , सदा दुख : भरलेले आयुष्य व्यवस्थित पार करता येईल . खरे पाहता आपले शरीर हे पूर्णत: नाशिवंत आहे , हा देह पाच पंचमहाभूताने बनलेला आहे , आकाश , वायू , अग्नी , जल व पृथ्वी हे जसे आपल्याला दृष्टी गोचर आहेत तसेच ते आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म व स्थूल रुपात आहेत , सात्विक , राजस ,व तामस ह्या मायिक त्रिगुणांनी व पंच महाभूतानि युक्त हा देह क्षणा - क्षणाला आपले रंग-रूप पालटत असतो . क्षणा -क्षणाला काही पेशी तयार होवून क्षणा - क्षणाला काही पेशी मृत होत असतात . वात , कफ , पित्त ह्या दोषांनी कधीही आक्रमण केले तर ह्या शरीराचे पूर्ण संतुलन बिघडून जाते व बऱ्याचदा अवकाळी मृत्यूलाही सामोरे जावे लागते . आयुष्याच्या शेवटी हि हे शरीर ज्या ३६ तत्वांनी बनलेले असते ती तत्वे त्याच्या त्याच्या संबंदित मूळ तत्वाला मिळून जातात . आकाश तत्व आकाश रुपी होवून जाते , वायू तत्व वायूला जावून मिळते , अग्नी तत्व सूर्य रूप होते , जल तत्व जलतत्वात समाविष्ट होते बाकी जे हाड - काडे वाचतात ते भूमीशी एकरूप होवून जातात व अशा प्रकारे आपले म्हणून जे काय आपण सांभाळलेले असते ते शेवटी काहीच राहत नाही .

आपल्या मानवाचे व एकूणच प्रत्येक जीवाचे असे एक आयुष्यमान ठरलेले असते . तेवढे आयुष्य झाले कि त्याला ह्या जगाचा निरोप घ्यावाच लागतो . परंतु त्यातील बरचसे दिवस हे असेच वाया जात असतात . १ ५ / २ ० वर्षे हे बालपणातच जातात , पुढील १ ५ / २ ० वर्षे हे जवानी अर्थात तरुणपणात म्हणजेच " मी पणा " करण्यात जातात . शेवटचे १ ५ / २ ० वर्षे हे अंथरूण धरून म्हातारपणात जातात व ह्या काळात आपलीच मुले आपली लायकी काढत असतात , हिडीस - फिडीस करत राहतात , डोळ्यातून पाणी काढण्याशिवाय पर्याय नसतो व त्या म्हातारपणात काय करावे तर कुठलेही इंद्रिये निट काम करत नसतात . ह्या म्हातार्या माणसाची लोक " जायचीच " वाट पाहत असतात . अशातच ४ ० / ४ ५ च्या काळात लोकांना थोडेफार शहाणपण आलेले असते परंतु त्यांना संसार व " वारस " ह्यांची जास्त फिकीर असते व माणूस स्वताकडे पूर्ण दुर्लक्ष्य करतो व शेवटी त्याच्या आयुष्याची परवडच होते , शोकांतिका होते म्हणून संत तुकाराम महाराज आपल्या सर्वाना " सावधान " करत आहेत …क़ि बाबानो तुमचे आयुष्य संपत चाललेले आहे आता तरी तुम्ही सावध व्हा , आता तरी तुम्ही संतांची संगती धरा , आता तरी तुम्ही विचार करा कि ह्या आयुष्यात नुसतेच भवरा होएउन फिरायचे कि आपल्या स्व - स्वरुपाची ओळख करून घ्यायची ? ( माणसाने / व्यक्तीने असा विचार हा तरुण असल्या पासूनच करायला पाहिजे , तरुण पणात त्याच्या अंगी ताकद असते , शरीर पाहिजे त्या गोष्टीला साथ देत असते , काळ हि अनुकूल असतो , फक्त संगती हि संत - सज्जनाची असावी )

संत हे ढोबळ अर्थाने व्यक्तीला संबोधित असले तरी संत हि उपमा जे अध्यात्म जाणतात त्यांना माहित आहे कि ती संज्ञा हि व्यक्तीला नसून " ज्ञानाला " आहे . व्यक्ती हि प्रकृती स्वरूप असल्याकारणाने त्या मध्ये अनेक विकृती असण्याचा संभव असतो . परंतु हे ज्ञान हे हि काही असामान्य अशा संत महात्म्याकडेच असते , म्हणून त्यांच्या कृपा , दया , करुणारुपी सहवासात ह्या ज्ञानाची आवड मनात धरावी .

परमार्थ ह्या शब्दाची फोड परम + अर्थ = परम अर्थ अशी आहे , परम म्हणजे अति उच्च , अगदी शेवटचे , सर्वात शेवटचे ,सर्वोच्च , उत्तम ( ह्या नावाचे काही शब्द पहा ,… परमेश्वर , परमवीर ( चक्र ) , परमात्मा , परम कॉम्पुटर ( भारतातील सर्वात शक्तिशाली कॉम्पुटर ) परमधाम इ . इ . ) . तर परमार्थ ह्या शब्दाचा अर्थ ह्या विश्वाचे जे गुह्य आहे , ह्या विश्वाच्या ईश्वराला जाणून घेण्याचे जे साधन आहे ते म्हणजे ज्ञान होय व त्या ज्ञानाच्या आधारानेच संत संगत धरून आपण ते ज्ञान प्राप्त करून घेवू शकतो व ते ज्ञान प्राप्त झाल्यामुळे सर्व सामान्य साधक विपरीत / प्रतिकूल परिस्थितीत हि सर्वांशी प्रेमाने , सौदार्हाने वागून आपले जीवन समाधानाने व्यतीत करू शकतो .

परंतु शेवटी संत तुकाराम महाराज आपल्याला सावध करत आहेत कि ,… ह्या इहलोकीच्या व्यवहारात म्हणजे , आपल्या जगात / समाजात विभिन्न प्रकारचे लोक असतात , अनेक वृत्तीचे / प्रकृतीच्या व्यक्ती असतात , मोहवणारे अनेक क्षण येतात , लालसा निर्माण करून गोत्यात आणणारे अनेक प्रसंग उद्भवत असतात , प्रलोभने , विषय - वासना ह्या मुद्दाम हून सज्जनाच्या अवती भोवती येत असतात अशा वेळी भक्ताने / सज्जनाने सदा सजग व सावध राहायला हवे , कामांध व्यक्तीला जसे काम तृप्ती शिवाय काहीच दिसत नाही , पुत्र - प्रेमापुढे जसे पित्याला धृतराष्ट्रा सारखे फक्त आपल्याच पुत्रांचे हित दिसते व तो आपल्या कर्तव्याकडे डोळेझाक करतो व आपले स्वताचे हनन करून घेतो तसे ह्या मायिक दुनियेत अशी वेळ येते कि काही क्षण आपल्याला काय करावे ते काहीच कळत नाही , जसे आपल्या डोळ्यात धूर गेल्यानंतर काही क्षण आपल्याला काहीच कळत नाही व तेवढ्या वेळात आपल्या कडून डोळे चोळत चोळत पुढील काहीच दिसेनासे झाल्यामुळे काहीतरी अघटीत होवून जाते व नंतर पश्चाताप करण्याची पाळी येते . म्हणून तुकाराम महाराज इथे आपल्याला रोकडा परमार्थ व व्यवहार शिकवतात कि आपण आपल्या डोळ्यात अज्ञानाचा धूर / अज्ञानाची पडळ / अज्ञानाची काजळी येवू न देता सदा सावध राहून क्षणा-क्षणाला आपले आयुष्य अधिक सुंदर बनवता येईल .

Thursday, June 19, 2014

आम्ही नाते जपतो . . मैत्री मुळात , करतच नाही . . .



आम्ही नाते जपतो . .  

मैत्री मुळात करतच नाही . . . 

कशाला हव्यात पोकळ भूल थापा त्या ? 


खोटेच ते व्यक्त होणे अन खोटेच जे जीव लावणे 

थोडे मनासारखे न होता . . . 

विशेषणे आणि दुषणे ते देणे . . .  


मैत्री आम्ही सुद्धा केली . . . 

भोगली . . . 

त्याला आलेले कडू फळे चाखली 


आता मैत्रीला आम्ही घाबरतो , 

विरुद्ध लिंगी मैत्री तर करतच नाही . .  

तिथे " खो " ठरलेलाच असतो . . . 


आता आम्ही फक्त . . . 

जीवा - भावाचे संबंध  जपतो . . . 

मैत्रीच्या " मुखवट्या " पासून दूर राहतो 


आता फक्त आम्ही  …. 

माणुसकीचे " नाते " जपतो . 


११ : २१ - - - - - -- -  १९ / ६ २०१४  - - - - - -  गुरुवार