Sunday, January 19, 2014


आपल्या फेसबुक वरील सर्व वडार बांधवाना सांगण्यात अत्यंत दुख होत आहे कि , आपल्या फ्रेंड लिस्ट मधील सर्वात जेष्ठ , वयोवृद्ध व asistant इंजिनिअर म्हणून सरकारी खात्यातून निवृत्त झालेले श्री नागेश kalkutgi ह्यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने काल निधन झाले आहे ...

सांत्वना करण्या शिवाय पर्याय नाहीं ...त्यांच्या कुटुंबियांना , ह्या अवघड प्रसंगी सावरून घेण्याचे बळ मिळो ...त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळो .....

औपचारिकतेचा भाग नाहीं परंतु..... नागेश साहेब kalkutagi ह्यांचा व आमचा परिचय हा फक्त फेसबुक वरच होता....परंतु बंधुनो ,उतार वयामध्ये त्यांना वडार समाज व वडार समाज बांधवा बद्दल खूपच तळमळ व्यक्त होत होती ....आपल्या वडार समाजाच्या १७ मार्च च्या विजय साहेब चौगुले ह्यंच्या नेतृत्वा खालील मोर्चा साठी ह्यांनी आपल्या ३ बंधुंना व अजून घरातील दोन / तीन व्यक्तींना पाठवले होते . स्वत : प्रकृती अस्वस्थ्य मुळे येवू शकले नव्हते ...परंतु ते सतत मोर्च्याच्या update कde लक्ष्य देवून होते ...त्यावेळी आमचा त्यांच्याशी संवाद झाला होता व त्यानंतर अधून-मधून संवाद सुरूच असे ....आता ५ तारखेला त्यांना आम्ही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या ....त्या अगोदरची साहेबांची एक comment एक आठवण म्हणू सर्वांशी share करत आहे ...कुणीतरी अशीच comment केली होती कि तुम्ही " जय बजरंग ....जय वडार " असे का म्हणता ?...साहेबांचा उलट उत्तर देण्याचा स्वभाव नसावा परंतु त्यांनी बाणेदार उत्तर दिले होते ....ते म्हणाले " एवढे वर्षे आमच्या वडार समाजाचा राजकीय लोकांनी व एकूणच समाजाने फक्त वापर करून घेतला आहे व समाज अजूनही दुर्लक्षित राहिलेला आहे ...नवी तरुण पिढी आपली अस्मिता जागवण्यासाठी जर , " जय बजरंग जय वडार " अशी साद घालत असेल तर बिघडले कुटे ?" .

वरील शब्द आमच्या अजूनही कानात गुंजारव करत आहेत ...व करत राहतील ...त्यांच्या बद्दल व त्यांच्या कार्य बद्दल मी जास्त बोलू शकत नाहीं परंतु ...वैयक्तिक मला त्यांचा नेहमी पाठिंबा असायचा ...ते तरुणानाही प्रोत्साहित करत असत ...

मरणाच्या वाटेवरूनच सर्वाना मार्गक्रमण करायचे असते ..आम्ही हि इच्छित स्थळाचे जवळ जवळ पोहचत चाललो आहोत ....जेन्वा मन सैरभैर होते , सर्व बाजूनी अंधारून येते ,,,अशा वेळी खर्या वाटाड्याची ( मार्गदर्शक ) गरज भासते ...वडार समाज नुकताच कात टाकायला लागला आहे ,श्री नागेश साहेब kalkutgi ह्यांच्या जाण्याने आपण एक वडार समाजाचा सुशिक्षित , सुसंस्कृत " वाटाड्या " गमावला आहे ,

ह्याचे दुख तर आहेच परंतु आपल्या समाजातील इतर जेष्ठ , सुशिक्षित व समंजस वर्गाने ...हि " वाटाड्याची " भूमिका मरणाच्या क्षण पर्यंत निभवावी .....हीच खर्या अर्थाने श्री नागेश साहेब kalkutgi ह्यांना श्रद्धांजली असेल असे मला वाटते .....

मरणाच्या शेवट पर्यंत ज्यांनी " वडार समाजाचा विचार केला " ....मला वाटते ...श्री नागेश साहेब kalkutagi हेच सच्चे वडार बांधव होते......

अशा या वडार समाज नायकाला ......माझे लाख लाख प्रणाम !!! .....व ....त्यांना माझा शेवटचा ..." जय बजरंग .....जय वडार "

जय बजरंग .....जय वडार !!!!

No comments:

Post a Comment