Wednesday, April 23, 2014

रात्र वैऱ्याची , मतदारांना पैसे देवून भूलवण्याची



रात्र वैऱ्याची , 
मतदारांना पैसे देवून भूलवण्याची 
लोकशाहीला पायदळी तुडवू पाहणाऱ्यांची . . . 

सभ्य , जाणते , उगवते , आशास्थानी असलेले नेते 
आज उद्या निर्ढावलेले गरीब गुरिबाना विकत घेणार 
त्यांचे बटबटीत चेहरे रात्रीच्या काळोखात मायाळू दिसणार 

सरकारच्या पैशावर यांची बायका मुले सुखासनी 
सरकारच्या भरवश्यावर आपली जनता वाऱ्यावरी 
एक दिवसाचा मतदार राजा अन तो एक दिवसाचा भिकारी 

गुंड , अशिक्षित , मवाली आज आहे शिक्षण महर्षी 
कधी काळी चपला उचलणारा आज आहे सहकार महर्षी 
भूखंड लाटतो , कर्ज बुडवतो , असते याची साखर कारखानदारी 

६५ वर्षे झाली , तू स्वतःला विकतच आलास 
६५ वर्षे झाली , तू हडकुळा अन तो संस्थानिक झाला 
चकणा, दारू,भेळ अन गांधी नोटेसाठी , तू तर आख्खा देश बुडवला 

रात्र वैऱ्याची आहे , आता तरी तू जागा रहा 
मत तुझे तू विकणार नाही , बायका मुलाची शपथ वहा 
तू बदल , देश बदलेल , 
देशाची दशा च नाही तुझी हि व्यथा बदलेल 

११: ५६ - - -- - १५ / ४ २०१४ - - - - - - मंगळवार    कुसाळकर ब्रदर्स 

No comments:

Post a Comment