ती माती खुणावते आहे , . .
काळ निर्णय घेण्यास मजबूर करत आहे ….
उलट्या पावलाने चालणे आता भाग आहे
तो डोंगर अन ती वळणाची वाट . . . .
अन अवचित असाच कुणीतरी केलेला घात . . . .
विसरून सारे , उगवत्याला नमस्कार करणे आहे
जरी अंधारून आले , जरी हाडे ठिसूळ झाली
जगण्यासाठीची अगतिकता
……… अजूनही कायम आहे
माणूस जन्मतो कुठे अन मरतो कुठे ?
थेंब पडतो कुठे अन तो विरतो कुठे ?
माणसाचा प्रवास हा " अतर्क्य " आहे . . .
८ ; ५५ am . .------- २१ / ०४ / २०१४ --------------सोमवार
कुसाळकर ब्रदर्स
No comments:
Post a Comment