चणे आहेत तर दात नाहीत . . . दात आहेत तर चणे नाहीत
धन आहे पण आरोग्य नाही . . . आरोग्य आहे पण ( दरिद्री पणामुळे ) धन नाही
धन आहे पण आरोग्य नाही . . . आरोग्य आहे पण ( दरिद्री पणामुळे ) धन नाही
डोकं आहे पण चालत नाही . . . युक्ती आहे पण शक्ती नाही
बोलता येतंय पण करता येत नाही . . . करता येतंय पण बोलताच ( भाषण ) येत नाही
कळतंय पण वळत नाही . . . उशिरा आलेल्या शहाणपणाचा आता काही उपयोग नाही
आपलेच दात अन आपलेच ओठ ,. सांगता कुणाला ? दात टोकरून पोट भरायची हि खोट
अति झाल आणि हसू आलं . . . . जीवावरच बेतलेलं काना मागून गेलं
" राम " आता कशात राहिलाच नाय . . . उरलंय आता फक्त " दे माय , धरणी ठाय "
११ : २० pm . . . . . २६ / ०२ / २०१४ . . . . . . बुधवार
No comments:
Post a Comment