चिघळलेल्या जखमा अन ओघळणारे रक्त
सडलेली त्वचा अन त्यातून वाहणारा पु
असह्य होणाऱ्या वेदना अन त्यात वळवळणारे किडे
विचारहीन मती अन आकसलेली गती
खोलवर धर्म रुतला आहे . . .
खोलवर व्यक्तीचा प्रभाव गुतला आहे . . .
खोलवर जातीद्वेष पसरला आहे . . . .
खोलवर स्वार्थ जपला जात आहे . . . .
मरतोय एक अन उरतोय भलताच
त्याग एकाचा अन भोगतोय भलताच
इथे सिझरिंगचाच सल्ला , नैसर्गिक इथे काहीच नाय
इथे देव हि अनेक धर्मात वाटलेला अन बाटलेला हाय !
१० : ३८ - - - - - ०६ / ०५ / २०१४ - - - - मंगळवार
कुसाळकर ब्रदर्स
No comments:
Post a Comment