एक जण म्हणाला . . .
आम्ही हिंदू - मुस्लिम आणि दलित यांना एकत्रित करणार आहोत . .
कसे शक्य आहे जातीय राजकारणात हे ?
भगवा , हिरवा व निळा एकत्र कसे नांदू शकतील ?
सगळ्यांच्या विचारधारा भिन्न , कार्यपद्धती भिन्न , आक्रमकता भिन्न
प्रत्येकाला आपल्या रंगाचा देश हवाय . . .
भगवा , भारत " भगवामय " करू पाहतोय ,
हिरव्याला , " हिरवा हिंदुस्थान " हवाय . . .
निळया ला , निळा " बुद्धकालीन भारत " हवाय ,
पांढरा बोलतो कमी पण , त्याला " धर्म-निरपेक्ष इंडिया " हवाय . .
तेवढ्यात त्याचे हि " साधते "
बाकी रंगा ना इथे विचारतो कोण ?
गडद रंगानी त्यांचे अस्तित्व डाग लागलेल्या ठिपक्या सारखे करून टाकलेले आहे . .
आम्हाला " हरा भरा " भारत नको आहे ,
ज्याला त्याला आपलाच झेंडा रोवलेला हवाय . . .
प्रत्येक पक्षाच्या झेंड्यावर जातीय रंग दिसतातच . . .
नवीन पक्षाची तर ती अगतिकता असते ,
स्वताचे अस्तित्व निर्माण करण्याचे ते " साधन " असते . . .
आपला रंग , आपला धर्म आपण पाळावा ,. . .
तो दुसऱ्यावर का म्हणून थोपवावा ?
आपल्या रंगाचे , आपल्या धर्माचे महत्व आपण वाढवावे . . .
दुसऱ्याचा जीव का घ्यावा ?
आपला रंग , आपला धर्म , आपला महात्मा आपला म्हणावा व जपावा . . .
त्याला दुसऱ्या धर्मावर का लादावा ?
भारताचा रंग हा तिरंगाच असावा . . . त्यापुढे ना दुसरा धर्म रंग उरावा
धर्मा -आधी हा देश असावा ,
देशासाठी सांडणाऱ्या रक्ताचा रंग " लाल च " असावा . . .
६ : १२ - - - -- - - - - ११ / ६ / २०१४ - - - -- - - बुधवार
No comments:
Post a Comment