Wednesday, June 11, 2014

आज वट-पौर्णिमा ...प्रचलित प्रथे प्रमाणे तमाम पुरुष वर्गासाठी , महिला वर्गाकडून केले जाणारे व्रत .



आज वट-पौर्णिमा ...प्रचलित प्रथे प्रमाणे तमाम पुरुष वर्गासाठी , महिला वर्गाकडून केले जाणारे व्रत ...सावित्री ने तिच्या सत्यावानासाठी केलेले व्रत ...सर्वच लोकांना ह्या पुराणातल्या कथे विषयी कल्पना आहे ,असावी ...

आपल्याकडे जे सण साजरे केले जातात त्या पाठीमागे आपल्या पूर्वजांचा ठोस असा गहिरा अर्थ दडलेला असायचा ..सण हे प्रतीकात्मक रूप म्हणून साजरे करायला सुरुवात केली असावी , नव्हे नव्हे ते प्रतीकात्मकच होत ...आपल्याकडच्या भट्ट - ब्राह्मणांनी त्याचे दैवतीकरण करून अनेक रूढी आणि परंपरा निर्माण करून ठेवल्या आहेत ...आणि नटायला थाटायला मिळत म्हणून आपणही असल्या प्रथेला घट्ट चिटकून बसलो आहोत .आज पुरुषाच्या पुढेही व त्याच्या मागेही त्यांच्या सत्यवानाचा काय काय उद्धार करतात हे सांगायला नको ...आणि सत्यवान हि आता सत्यवादी राहिले नाहीत .असो त्या खोलात आपल्याला जायचे नाहीं ..आपण वट - सावित्री व्रत काय आहे हे समजून घेऊयात ....

हा जो वट म्हणजेच वड जो आहे त्याचे बीज मोहरी सारखे बारीक असते ..परंतु ते बीज वाढीला लागले कि त्याचा विशाल काय अशा मोठा वृक्ष होतो ..आता पर्यावरण च्या दृष्टीने व नैसर्गिक समतोल राखण्याच्या दृष्टीने हा वटवृक्ष कसा आपली भूमिका वाटावतो ते पहा ....हा वृक्ष सतत हिरवागार असतो ..तसेच ह्याची थंडगार सावली अनेक पांथिकाना क्षणभरासाठी आपला सर्व क्षीण व परिश्रम घालवण्यास मदत करतो. ह्या वडाच्या मुळांच्या खोपटात लांडगे , कोल्हे , खोकडे ह्या प्राण्यांची वस्ती असते ..खोलवर बिले पडलेली असतात ..शेजारीच लाल मुंग्या , काळे देण्गल्या मोठाल्या तोंडचे मुंगळे हे सतत वर खाली करत असतात ..खारुताई ची लगबग सतत खोडावरून फान्ध्यावर चाललेली असते..वडाच्या फांद्यावर माकडे मुक्तपणे उच्छांद मांडत असतात ..ह्या झाडावर बहुतेक पक्षांची घरटी पाहायला मिळतील . चिमण्या , कावळे , घुबड इत्यादी हर तर्हेचे पक्षी व त्यांचा तो मंजुळ स्वर कधी कधी साळून्क्यांची एकचं घाई ....झाडाच्या शेंड्यावर गरुड , गिधाडे ह्यांचे डेरे....अशातच कधी झाडावर एखादा सर्पराज दिसला कि पक्षांची होणारी धांदल व साळून्क्याचा होणारा कलkalat ...सुतार पक्षाचे फांदीच्या खोपीतून अलगद बाहेत येणे ...मधीच सळसळनारी पाने...मध्येच होणारा कोलाहल ..मध्येच दाटणारी निरव शांतता ...मध्येच वरून एखादे टपकन खाली पडलेले पक्षाचे पिल्लू ..व त्याची अस्तित्व साठी चाललेली धडपड ...अशातच कुणीतरी बेसावध पने त्यावर घातलेली झडप ......

......अशा एक ना अनेक घटनांचा , प्रसंगाचा हा एकमेव साक्षीदार म्हणजेच वटवृक्ष ..ज्या वृक्षावर कित्येक किड्यांचे ,कित्येक प्राण्यांचे , कित्येक पक्ष्यांचे ,कित्येक भ्रमरांचे , कित्येक आलेल्या - गेलेल्यांचे आयुष्य आवलंबून असते ...ह्या झाडावर पूर्ण चैतन्यच अवतरलेले दिसते ..संपूर्ण प्राणी मात्रांची वस्तीच तिथे नांदत असते ....बरे ह्या वड वृक्षाचे आयुष्यही शेकडो वर्षांचे असते ...म्हणजेच त्या वट वृक्षाने तेथील प्राणी - पक्षांच्या कित्येक पिढ्या पाहिल्या असतील ..कमीत कमी सात पिढ्या तरी नक्कीच ...हो ना ?

अशा ह्या वड वृक्षाच माणसालाही खूप उपयोग आहे ..ह्या वृक्षाच्या छायेत जी झोप लागते ती नक्कीच फोम च्या गादीत येणार नाहीं ...ह्यांच्या पारंब्या ना लटकून मस्त उंच च्या उंच झोके घेत| येतात ..ह्याच्या लाकडाचा जळणासाठी , घरगुती वापरासाठी उपयोग होतो ...अशा प्रकारे हा वृक्ष सर्वच जीव मात्रासाठी जगण्याचे वस्ती स्थान आहे ...खास करून जंगलातील ह्याचे अस्तित्व हेच अधिरेखीत करते ...

...एवढे असूनही हा वृक्ष स्थितप्रज्ञ सारखा असतो ...सर्व साक्षी असतो ...तरीही खंबीर पने उभा ....सर्वाना उपयोगी पाडण्यासाठी सदैव तत्पर .

....चला आता आपल्या सत्यवान - सावित्री कडे येउयात ...आजच्या काळी स्त्री व पुरुष दोघेही कमावतात व स्वताचा संसार चालवतात ...पूर्वीच्या काळी असे नव्हते ..तेंव्हा ती जबाबदारी पूर्ण पुरुषाचीच असायची ....त्या मूळे पुरुषाचे असणे ( जिवंत ) हे खूप महत्वाचे असायचे .व त्या काळी गाई व बाई हि नेहमी संरक्षणात असायची ...मोकळी गाय व मोकळी बाई दिसली कि कुणीही तिला आपली म्हणून घेऊन जायचे ...अशा अवस्थेत घरात अवलंबून असणार्यांची पूर्ण जबाबदारी हि कुटुंब प्रमुखावर असायची ..घरातील वयस्कर व्यक्ती , लहान मूले , तरुण स्त्रिया ..ह्यांचे कर्ता पुरुष गेल्यावर काय हाल होतील ...ह्या साठी ....त्या कर्त्या पुरुषाला खूप आयुष्य मिळावे व आपले संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहावे हा मूळ स्वार्थ असायचा ( कुणी ह्याला त्याग हि म्हणा हवे तर )...व असे केल्या मूळे आपली मुले, नातवंडे पर्यायाने संपूर्ण वंशच सुरक्षित राहील ...हा विचार त्या मागे असावा ...

....आता बंधुनो असा विचार करा कि ....तो वट वृक्ष कोसळला आहे , उन्मळून पडला आहे ....व इकडे आपला घरातील प्रमुख हि अकालीच आपल्यातून निघून गेला आहे ....तर त्या वट वृक्ष्यावर अवलंबून असणाऱ्या जीव सृष्टीचे काय हाल होतील व इकडे आपला मुख्य करता पुरूषाच आपल्यातून निघून गेला तर घरातील सर्वांची कशी वाताहत लागेल ...?

बंधुनो , हा विचारच नको ...घरातील कर्त्या पुरुषाला उदंड आयुष्य लाभावे ...व नैसर्गिक जीव चक्र ज्या झाडावर अवलंबून आहे त्या वट वृक्षाचे हि संवर्धन होवो ....

...पूर्वी गावाची नवे कशी होती ...आंबेगाव , पिंपळगाव , वडगाव , चिंचवड , पिंपरी . तेम्बुर्णी, जाम्बळगाव , ..आता आहेत ...इंदिरा नगर , नेहरूनगर , राजीवनगर , गांधी नगर , ...काय हि नावे ?..

मित्र हो , बंधुनो ...जागे व्हा ....नैसर्गिक समतोल ढळू देऊ नका ...

झाडे लावा ...झाडे जगवा ...आपले व आपल्या येणाऱ्या पिढीचे आयुष्य सुसह्य करा......
 

No comments:

Post a Comment