जाता जात नाही , तिचे नाव " जात "
जाती साठी माती खायाला लावते , तिचे नाव " जात "
जाईल तिथे अब्रू घालवते , तिचे नाव " जात "
अंगी भलता ताठा भरवते , तिचे नाव " जात "
जिच्या मुळे माणसे विभागली गेली , तिचे नाव " जात "
राख- रांगोळी होते , तरीही प्यारी असते ती " जात "
शरीराची माती होते , तरी फोटोलाही चिकटते हि " जात "
या " जातीच्या " अंतासाठी लढले , त्यांची झाली " राख " . . .
सर्वांनाच पुरून दशांगुळे उरली तिचेच नाव हे " जात "
गोचीडावाणी चिकटून बसली , अहंकाराला धरून राहिली
वृथा अभिमानाला सोकावली , अशी कैदाशीण हि " जात "
११: ०० - - - - - - ११ / ०६ / २०१४ - - - - - बुधवार
No comments:
Post a Comment