Thursday, June 5, 2014



ती तशी खूप वेगळी होती . . . 

तशी ती खूप बोल्ड वाटायची , चालू हि वाटायची , पण . . . 

पण तो तिचा निरागसपणा होता अन माझा मूर्खपणा 

ती माझ्यावर प्रचंड इम्प्रेस झाली होति म्हणे . . . . 

पण तो तिचा भ्रम होता , हे हि तिने बोलून दाखवले होते . . . 

तिचे बोलणे खूप लाडिक होते , तिची लगट सहज होती . . . 

तशी ती माझी सहकारीच . . . . 

परंतु तिचे बोलणेच वेगळे , 

कधी अरॆ - कारे  नाही कि कधी अहो - काहो  नाही 

आपणाला , स्वतःला  , हे असेच काहीतरी  तिचे शब्द होते 

वेगळे , पण गोड वाटणारे तिचे बोलणे आकर्षित करत होते 

ती जवळ आली . . . 

तिला काय वाटले कुणास ठाऊक , 

ती दूर दूर राहू लागली 

मी नैराशेत असताना  

माझ्या अति आग्रहामुळे परत जवळ आली . . . . 

माझाकडून अगतिक झाली , निष्ठुर शब्द बांध  फुटला 

ती माझापासून कायमची दूर निघून गेली . . . 

गेले कित्येक वर्षे ती सावली शोधतो आहे . . . 

ती पडछाया दृष्टीआड जरूर गेली . . .  

पण अपराधीपणाची छाया अजून हि व्यापून आहे . . . 

तिला एकदाच  सॉरी बोलायचेय 

अपराधातून मुक्त व्हायचंय . . . .   

६ /६ / २०१४ - - - - - -  शुक्रवार - - - - -- -  १० : ०७ . . . .  




No comments:

Post a Comment