मुळात सारेच भटके . . . आम्ही " राह " भटकल्यामुळे भटके
मूळत: सारेच गुन्हेगार . . . आम्ही " पिंजऱ्यातून मुक्त " म्हणून विमुक्त
मुळात सारेच रानटी . . . आम्ही जास्तच " ढोसली " म्हणून वनवासी
मुळात सारेच अत्याचारी . . . आम्ही " झाकून ठेवले " म्हणून ते भारी
मुळात सारेच गोजिरे . . . आम्ही उन्हातले काळे अन ते सावलीतले गोरे
मुळात सारेच भिकारी . . . आम्ही कामासाठी अन ते रक्ताचे भुकेले
मुळात आम्हीही चतुर . . . आम्ही सुस्त होतो ते दाखवत सुटले
मुळात आमचाही हक्क . . . आम्ही सहन केले , त्याने केला बलत्कार
मुळात आम्हीच केले रक्षण . . . आम्ही झालो परागंदा , त्याने केले शोषण ( भक्षण )
त्याच्यात अन आपल्यात फरक काय ? . . .
आपल्या महिलाकडे वाकडी नजर टाकताना त्याला त्याचे काहीच वाटत नाय
उठ , आता तू बंड कर . . . .
जमलच तर त्याच्याशीच " सोयरिक " कर . . . .
८ : ०७ pm - - - - - - - २ / ६ / २०१४ - - - - - - - सोमवार
No comments:
Post a Comment