अर्जुनाला " अवदसा " सुचली
म्हणाला कृष्णाला , रथ घे दोन्ही सैन्याच्या मध्यभागी
खांदे गाळले , गांडीव गळाले , घुडगे टेकले
पाहता आप्तेष्ट , भाऊबंद , पाहुणे पाठी - पुढे
लागला विचार करू , युध्द मी कशासाठी करू ?
कृष्ण मुसद्धी भारी ,केली त्याने गीता तिथे सुरु
दाविले विश्वरूप , कोण तू अन कोण मी अन कोण तुझे भाऊबंद
मन हा अर्जुन , कृष्ण तो अंतरंग , करी विषयांचे परिमार्जन
जीवन म्हणजे नव्हे योगायोग , चाले ते " कर्म - सिद्धांतावर "
साद घालूनी मनाला , आवर घालावा विषय वासनेला
अनुहात ध्वनी , अंतर्मनाचा नाद , एकाग्र ते चित्त
मुख्य ती मनशांती , दुय्यम ते सुख , सुखात असे दुखं
नर जन्माचे सार , घ्यावा हाच " अंतर्वेध "
८ : ३ ३ - - - - - - - १३ / ०६ / २०१४ - - - - - - शुक्रवार
No comments:
Post a Comment