सावित्री नटली , फेऱ्या माराया निघाली . .
हौसाबाई सजली , . . नवी साडी तिने घातली
सत्यवान राहिला घरात , तो आज आहे जोरात
पांढरा दोरा अन हळदी कुंकू ,
सडका आंबा अन नागिणीची पाने
सुपारीचा गणपती अन सुकलेली खारीक
छोटासा बदाम अन हळकुंड बारीक
खोबऱ्याचा टुकडा अन टपोरा झेंडू . . .
सावित्री नटली , फेऱ्या माराया निघाली . .
प्लास्टिक ची पुडी , त्यात इवले इवले काळे मनी
दोनच हिरव्या बांगड्या , त्यात प्लास्टिकची आहेवाची लाल टिकली
हिरवा कापडाचा तुकडा , त्याला म्हणूया खण चोळीचा
पिवळा दोरा , काड्याची पेटी , सोबतीला आहे अगरबत्ती
ताट सजले सर्व वस्तूंनी , शोभा आणली त्याला विणलेल्या नक्षीदार कापडाने
वाहण्या वट - वृक्षाला नारी निघाली . . .
सावित्री नटली , फेऱ्या माराया निघाली . .
नव धान्याचे वाण वाहते , पाच फळाचे दान हे देते
साता जन्माचे फेरे घालते , शेंडी वाल्याला दक्षिणा देते
पोरां - सोराना आशीर्वाद मागते , भरलेले घर सदा असू दे
आया - बायांची सोबत घेते , साज - शृंगार करुनी आनंदी राहते
पडली वहिवाट पुढे चालवते , समाज - संस्कृती पुढे ती नेते
सावित्री नटली , फेऱ्या माराया निघाली . .
१ : २७ - - - - - - १२ / ०६ / २०१४ - - - - - गुरुवार
No comments:
Post a Comment