Wednesday, January 15, 2014

हे आहेत आपले धोत्रेदादा रामनगर , चिंचवड येथील .



हे आहेत आपले धोत्रेदादा रामनगर , चिंचवड येथील .

ते जेथे काम करत आहेत ते ठिकाण आहे पुणे - आळंदी रोड वरील सुप्रसिद्ध श्री साई मंदिरा समोरील प्राचीन काळापासून सुप्रसिद्द असलेले ठिकाण ( श्री ज्ञानेश्वर महाराज ह्यांच्या थोरल्या पादुका ) येथील . आषाढी वारीला जेंव्हा माउलींची पालखी पुणे शहरात प्रवेश करणार असते , त्या अगोदरचे हे विसाव्याचे ठिकाण . गेल्या कित्येक वर्षापासून ह्या ठिकाणाचा ( थोरल्या पादुका व तेथील मंदिराचा ) विकास झाला नव्हता . आता त्यासाठी निधी उपलब्ध झाला असून त्या ठिकाणी सुशोभीकरण व विकासा चे काम जोरात सुरु आहे .

येथील साई मंदिर trust तर्फे ११०० सामुदायिक सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे नियोजन करण्यात येत आहे व आपल्या समाजातील मुंबई व पुण्यातील काही निस्वार्थ समाज बांधवांच्या मनातही असेच आपल्या समाजातील गोर- गरीब बांधवासाठी सामुदायिक विवाह सोहळा करण्याचे ठरत आहे व त्या संदर्भात नियोजनाचा एक भाग म्हणून आम्ही त्या trust च्या कार्यालयाला भेट दिली . आम्हाला त्यांच्याकडून खूपच चांगले सहकार्य मिळाले ...असो .त्या निमिताने देव- दर्शन हि झाले ....

साईबाबांचे दर्शन घेवून बाहेर आल्यानंतर आमची नजर समोरच रस्त्यापलीकडे चाललेल्या कामाकडे गेले . आपलेच जातभाई काम करत असल्याचे दिसल्याने आम्ही सरळ त्यांच्याकडेच गेलो . संपूर्ण धुळीने ते माखलेले होते . छन्नि , हातोड्या व गुण्या सोबत इलेक्ट्रिक वर चालणारी stone cutter machine हि त्यांच्याकडे होती . पाहिजे त्या आकाराचे माप घेवून ओबड-धोबड दगडाला खूप सुंदर आकार आपले बांधव कौशल्याने , हातोटीने व लीलया देत होते . grinder चा वापर करून नंतर दगडाला गुळगुळीत आकार देण्यात येत होता . काही दगडावर कोरीव काम करण्यात येत होते अर्थात ते काम मशीन द्वारे शक्य नसणार तेथे जातिवंत कलाकारच लागणार ...जे भव्य मंदिर निर्माण कार्य होत आहे त्या तील प्रवेश द्वारावर , मुख्य मुख्य ठिकाणी ह्यातील कोरीव , घोटीव दगड वापरला जाणार आहे . व तद्नंतर ते मंदिर खूप सुंदर , आकर्षक , शांत , प्रसन्न दिसणार आहे ...

....परंतु मला वाईट ह्या गोष्टीचे वाटत आहे नन्तर माझ्या ज्या वडार बांधवाचे हाथ ह्या कार्यासाठी झटले आहेत तो दुसरीकडे कुठेतरी उन्हातान्हात अशाच एखाद्या मंदिराचे नवनिर्माण करत असेल . काय शोकांतिका आहे , एखादे काम घेतले व त्याचा मोबदला घेतला कि त्या कामासाठी असलेले आपले जडलेले नाते , कामाप्रतीचे आत्मसमर्पण , काही काही शिल्लक राहत नाही . आपले उत्तरदायित्व उरते किंव्हा असते ते केवळ कामाच्या मोबदल्या साठीच कि काय ?

परंतु ते काहीही असो मी निराश होत नाही , कारण माझ्या भावना दगडांशी जडलेल्या आहेत असे मी समजतो . भूतकाळाने जरी असा समज पसरवला असला तरीही मी माझी, आपली बांधिलकी दगडाशीच आहे असे समजतो कारण मला असे वाटते आहे कि मला दगडांची भाषा समजते आहे . ते दगड असे म्हणतात कि मुळातच आपण गुप्त व सुप्त अवस्थेत होतो ह्या वडार बांधवानीच आपणास उघड रूप दाखवले , आपण ओबड-धोबड रुपात होतो , ह्या वडार बांधवानीच आपल्याला सुस्वरुपला आणले . आपण मूर्ती रुपात असतो , देवाच्या पाया जवळ आपल्याला जागा मिळालेली आहे , कितीतरी थोर भक्त , भाविक त्यांचे पुण्य स्पर्शाने आपल्याला पावन करत असतात , आपल्याला फुले वाहत असतात , आपल्यावर त्यांचा माथा टेकवतात. तरीही हे थोरपण केवळ वडार बंधावान्मुळेच शक्य झालेले आहे.

असे हे सर्व मोठ मोठाल्या मंदिरात पावन झालेले दगड , महाल , बंगल्यांची शोभा वाढवलेले पायांचे दगड व थेट स्वयंपाक घरा पर्यंत पोहचलेल्या जात्यावरवंटा पर्यंत , बंधारे , विहिरी , छोट्या - मोठ्या हम रस्त्यावरील सर्व प्रकारचे दगड आजहि ओशाळून म्हणत असतील " आपल्याला मोठेपणा बहाल करणाऱ्या सच्च्या वडार बांधवांची काय हि दयनीय अवस्था ?????????....आपल्याला मोठेपण देणारा अजून असा का ??????? "

असल्याच कित्येक पवित्र स्थानाच्या निर्मितीत वडार बांधवाचे स्थान महत्वाचे असले तरी , काही बाबतीत उपेक्षित राहिला असला तरी आपल्या वडार बांधवाने आपला हेका सोडलेला नाही . तोच " मोठेपणा " सोबत घेवून आजही वडार बांधव कार्यरत आहे .

सूर्यही आज तसाच तळपत आहे , ज्ञानरूपी विचारांच्या हातोड्याने , विवेकरुपी छन्निने अज्ञानाच्या , अहंकाराच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवून , ओळंबा - दोरी रुपी सत्य मार्गावरून वडार बांधव आज मार्गक्रमण करत आहे .

दुसऱ्याना मोठे करण्याचे " मोठेपण " वडार बंधावाकडे आजही असेच राहो ! ! ! ! !

जय बजरंग ! ! !...........जय वडार ! ! !

No comments:

Post a Comment