माझ्या " कवितेची " आज परीक्षा आहे....
प्रतिभेला फुलोरे नाहि आले तर ..........
तिला देहांताची अथवा काळ्या पाण्याची सजा आहे ...
मी फक्त तिच्या साठीच लिहितोय .......कि ....
का....माझ्याकडे हि काहीतरी आहे ...?
आज ह्यांचीच गाठ - भेठ आहे.
आज तुझे सौंदर्य मी वर्णू कशाला..?
आज मीच माझी थोरवी गात आहे ..
माझ्या मुळेच तुझे महत्व वाढले आहे
मीच फुलवलेली तू बगीचा आणि बाग आहे
नको वल्गना करूस तू आपल्या पुष्टतेच्या ...
तुझ्यावर मी हा घेतलेला प्रती - शोध आहे ..
ते बघ ...तुझ्या बिंबात......
मीच वर्णिलेली स्थळे तू शोधीत आहेस
कुठून आणशील जवाब मजला......?
आज मीच लाजवाब आहे ,
मी आहे म्हणुनी तू हि आहेस ....
माझ्या कवितेची तू प्रेरणा झालीस ...
..हे हि तुझे सौभाग्य आहे ...
माझ्या बरोबर केला ,असा उच्छांद तू पुन्हा मांडू नकोस
( किती हि चांगले असले तरीही )
खरकट्या अन्नाची काय गत होते ...हे तू विसरू नकोस
तू तर जाशीलच ......तरी माझी " कविता " राहणार आहे
तुझ्या मागे मी हि गेलो तरी ........
मीच " अमर " राहणार आहे ..
मीच " अमर " राहणार आहे
2;27.......monday........21/2/2011
No comments:
Post a Comment