Tuesday, February 18, 2014

शिवाजी महाराजांचा पोवाडा



दगड , धोंड्याचा , 
दाट  जंगलाचा , 
मर्द मावळ्यांचा , 
किल्ले - दुर्गांचा , 
सह्याद्रीच्या रांगाचा , 
---  ऐसा हा महाराष्ट्र माझा . . . जी जी जी 

इथली माती लावता  कपाळाला . … 
इथली माती लावता कपाळाला . .  
वीरश्री चढे बुझदिल इसमाला , 
रक्त तापे,  सळसळे  त्याच  समयाला , 
त्याच समयाला  , , , , जी जी जी 

काळी , तांबडी , पांढरी  हि माती , इथली खास ,.
 त्यात मिसळली अनेक योद्ध्यांची राख , 
शिवबा इथे पुजला जातो घराघरात …. जीर हे  जीजी . . 

ऐका माझ्या शिवबाची हि मात , 
बाळ मुखी करी हिंदवी स्वराजाची बात , 
सवंगडी मिळवले हे खास ,
 रक्ताचा अभिषेक करून  शिवलिंगास . . .  
म्हणे मुक्त करीन या मुलुखास , 
अन्यायी  अत्याचारी मुघलास ,
 दावूनी गनिमी कावा समयास ,
 मुक्त करू महाराष्ट्र देशास . . . . जीर हो जीजी 

बाळकडू भेटले राजमातेचे , 
जिजाऊ मातोश्रींचे , 
महाराष्ट्राच्या माउलीचे , 
सावूली  त्यांची खास देत असे साथ ,
 शहाजी राजांचा असे वरद हाथ , 
गरुडापरी असे शिवबाकडे ध्यान ,
 युद्ध - कौशल्यात आणि युद्ध - नीतीत ,
 शिवबा झाला अति तरबेज . . 
दांडपट्टा आणि तलवार  फिरावी चपळाईत . . जीर हो जी जी 

मिशुरडे  फुटले हि नव्हते त्या समयाला , 
किल्ले जिंकले आणि जोडले हिंदवी स्वराजाला , 
चढाया  करी आणि मिळावी किल्ल्यांस , 
जोर चढे मग मावळ्यास ,….
 एक एक करुनी जिंकी प्रदेशास. . .  जीर हो जीजी 

डोंगर दऱ्या  ची हि वाकडी वाट , 
सरसरा चढे मावळा  अति अवघड घाट , 
एक एक भारी पडे  चार चौघास , 
गनिमी काव्याने लोळावती  शंभर पन्नासाच , 
लपती - छपति  , अचानक दिसती ,
 वार  वर्मी करती ,
 पळता  भुई थोडी करती गनिमास , 
. .  शत्रू हा घाबरे " शिवबाच्या " नावास   , 
ऐसा हा दरारा वाढला  खास , जीर र जीजी 

हैराण झाली  कुतुबशाही  , 
घाबरूण गेली  आदिल शाही , . .
 पोहोचली खबर शिवबाची दिल्लीच्या तख्ख्तास . . 
औरंग्या म्हणे हा असे कोण मराठी मुलुखास , 
किसकी मझाल  है  जो हमे ललकारे,
 है  किसमे इतनी औकात ?  ? ,
 हम को न जाने ? 
हम है  यहा के शहजादे  , 
किसीकी हो गयी इतनी बिशाद ? 
 औरंग्याने पाचारिले शाहिस्तेखानाला , 
पाठवले पुण्याला . . 
बंदोबस्त करण्या शिवरायांच्या मनसुब्याना …जी जी जी 

शाहिस्तेखानाने येवूनी पुण्याला ,
 लाल महालात  तळ  ठोकिला , 
बायका आणि  कुटुंब कबिला ,
 खानाच्या  होता संगतीला , 
सैन्य हि तसेच असे बेसुमार , 
बेसावध - पाहुनी रात्र ,
 शिवबा तुटून पडला खानाच्या  तळावर . . . 
खानाला हिसका  कळला शिवबाचा , 
अल्ला - अल्ला म्हणे त्या समयाला ,
 लागला पळायला  , 
वार  वर्मिचा  हुकला , पण बोटे छाटली शाहिस्तेखानाची . . . 
धास्ती घेतली शाहिस्तेखानाने ,
 जीवाच्या आकांताने पळून तो गेला . . 
हाय अल्ला कहर ये कैसा केला. . . .  जी जी जी 

जिंकुनी कित्येक किल्ल्यांना आणि दुर्गाना ,
 वाढविले आपल्या आरमाराला ,
 दक्षिणेला आणि पश्चिमेला  ,
 प्रजेवर ममता असे शिवबाची फार , 
न्याय करी , दंड करी चुकणारास , 
मोठा आदर वाटे स्त्रिया ,लेकी , सुनास , 
सुखी होते शेतकरी , बहुजन कष्टकरी त्या समयास … 
रयतेचा राजा शोभे शिवाजी महाराज , , , , ,  जी जी जी 

औरंग्या आणि दिल्ली खवळली ,
 पाहता पाहता शाहिस्त्याची खबर त्याला समजली . .  
बोलावला त्याने सरदारांचा दरबार , 
म्हणे शिवाजी ला मारायचा विडा कोण उचलणार ? . . . 
शिवरायांचे नाव ऐकताच , सन्नाटा पसरला सभाग्रहात , 
धजेना कुणी विडा उचाण्यास . . . जीर हा जी जी जी 

अगडबंब देह आणि उंच एक सरदार , 
नाव त्याचे असे अफजलखान , 
रुबाब त्याचा खास , 
वकूब हि तसाच , 
पिरगाळी मुंडी बगलेत धरुनी , 
पंजात पकडुनी मारी ,
 होती त्याची ख्याती चहु  मुलखात . . 
म्हणे मी जातो शिवाजीच्या बंदोबस्तास …… जी जी जी 

चाल करुनी अफजल्या आला , 
चतुर शिवबा धूर्त मुत्सदी होता , 
हेर आपला पाठवला बोलणी करायला , 
तह करण्याला . . .  
कावेबाज अफजल म्हणे संपवतो शिवाजीस मी आज , 
शिवबा हि असे युक्तिवान खास , 
घातली चिलखत लपवले वाघ नखे 
 … आणि गेला सामोरा  अफ़जलास  . . . . जिजिजि 

या राजे , मिलो हमसे …
ऐसे बोले अफजल्या हसुनी उन्मादात , 
आलिंगन देता  झाला शिवरायास .
जखडून ठेवले आपल्या शिवबास , 
विसरला तहाच्या बोलण्यास , 
शिवबा हि मग सरसावला , 
कोथळाच बाहेर काढला . .  
ये क्या हो गया  अल्ला ?अफजल्या ओरडला 
 खान धाडदिशी उन्मळून पडला . 
शिवबा त्याला पहाडावाणी दिसला . 
हाहाकार तिथे माजला , 
जीवा हा धावून आला ,
 महाराजांनी उडवले कुळकर्ण्याला ,
 जो मिळाला होता अफजल्याला . . . . .  जी जी जी 

शत्रू मेल्यावर त्याची दफ़नाची  योग्य व्यवस्था जो करतो , 
तोच आपला शिवबा असतो , 
प्रजेला जो छळतो त्याला …… 
त्याला शिवबा कर्दनकाळ असतो , 
पोहोचली शिवाजी राजांची कीर्ती दस  दिशाला , 
त्याच समयाला राज्यभिषेकाचा घातला घाट  ,
 नेमले अष्ट मंडळास , 
प्रजेच्या केवळ हितास ,
 सार्वभौम राज्य करण्यास , 
हिंदवी स्वराज्याची राखण्य लाज . . . जिजिजि 

ब्राह्मण वर्गाने राज्याभिषेकास , 
अडथळा घातला खास , 
म्हणून त्या समयास काशिवरून  बोलावले गागाभट्टास , 
राज्यभिषेक झाला मोठ्या दिमाखात .
 छत्रपति शिवाजी महाराज म्हणू लागले आपल्या शिवबास . . . 
 कीर्ती गेली दस मुलखात  . 
धडकी बसे " शिवाजी " उच्चारताच काळजात ,
 प्रजेची काळजी वाहे दिन रात , 
शत्रू पासून वाचवले महाराष्ट्र देशास . . . जी जी जी  

ऐसा हा महाराष्ट्राचा महावीर , 
अभ्यासिती इंग्रज , अमेरिकी आणि पोर्तुगीज , 
धर्म मंदिरे , स्त्रिया , मुले यांचा राखला आदर , 
दिमतीला होते हिंदू आणि मुसलमान सरदार , 
बहुजन कारागीर आणि कलाकार , 
 सर्वाना मिळे आदर आणि सत्कार , जी जी जी 

शिवबा असे महाराष्ट्रात प्रत्येकाच्या रक्तात 
 थेंबाथेंबात , 
नसानसात , 
रोमारोमात , 
वीर बाहूत  , 
शब्दा शब्दात , 
कित्येक शतके होवुनी गेली ,
 शिवबाची स्मुर्ति  अजुनी राहिली , 
किल्ले , गड जो पर्यंत , 
माझा शिवबा हि असेल अंतापर्यंत . . . . . जी जी जी 

शिवबा , शिवाजी , शिवराय , ,
 हा असे असा एक देव  ( महामानव ) . . . 
जो जगला  प्रत्यक्षात , 
आपल्या महाराष्ट्रात , 
अजून हि ऐकू येतात ते निनाद , 
" शिवाजी महाराज कि जय " शिवाजी महाराज कि जय " 
" अमर " कीर्तीला त्यांच्या पाहुनी , 
आमच्या हि माना  झुकतात . . . . . . जी जी जी 

 शिवाजी महाराज कि जय ! ! !

१ ८ / ० २ / २ ० १ ४ . . . . . ६ : ० ०  . . . . . . मंगळवार 


No comments:

Post a Comment