सध्या एकेकाळचे दोन चहा विक्रेते खूपच प्रसिद्धीच्या झोतात आहेत . दोघे हि गुजरातचेच आहेत
. एकाला अगोदरच काहींनी पुरता बदनाम केलेला आहे परंतु ते आता चांगल्या कारणासाठी देशात विदेशात , इन्टरनेट च्या जगात , विरोधकांच्या मुखात , लेखणीत , काहींच्या झोपेत अगदी " छा गये है " . काहींचा दूर दूर चा संबंध नसताना आता आभाळच पडणार आहे अशा आवेशात दुसऱ्यांनी ह्यांचेच ऐकावे , व ह्यांनाच सर्व कळते व तशी दृष्टी आहे अशा अविर्भावात वागत आहेत . त्यांना काय काय उपमा देत आहेत .
त्यांचे गुणगान गाणाऱ्यांना आता आनंदाच्या " उकळ्या " फुटू लागलेल्या आहेत . मारे देशाचे हेच एकमेव तारणहार असणार आहेत व आख्या देशात कुणी लायक नाहीत व हेच देशाला दिशा देवू शकतात अशा अविर्भावात हे वावरू लागले आहेत . ज्याच्या साठी ह्यांचा पक्ष प्रसिद्ध आहे तो धर्माचा " छुपा अजेंडा " हे लोक वापरणार ह्यात तिळमात्र शंका नाही . सुरुवातीला बहकावणार , नंतर बरोबर आपल्या औकाती वर येणार . . . ह्यांच्यात ठराविक लोकच पुढे असतात बाकी खालच्या थरातील लोक हे केवळ राबयालाच असतात .
भडकावणे व सेवा करून घेणे हे ह्यांच्या रक्तात असावे . असो
दुसरे चहा वाले , पूर्वी साक्षात देवाचाच अवतार होते , श्रीकृष्ण रुपी ह्यांच्या लीला चालायच्या . ४५० बळकावलेले मठ . १४ देशात ह्यांच्या भक्तगण व भक्त गणिकांचा पसारा . . . ५ कोटी ह्यांचे भक्त गण आणि गणिका आहेत म्हणे . आम्ही हि त्यात दुरून दुरून आदर करणारे होतोच हो , परंतु एका साधू पुरुषाला साधेपणा शोभतो परंतु ह्यांचे नटणे - सजणे काही मनाला पटत नव्हते . काय क्वालिटी चे ते औषधे , एकदा घेतली होती . . परत काही घेतली नाहीत .
ह्यांचे " गो-मूत्र " लोक खूप आवडीने घ्यायचे , शुद्ध व फिल्टर केलेले व जंतू रहित असते म्हणून. . ह्यांचे काही भक्त येत जाता मोठ्या आवाजात " हरी ओम " करायचे , आता दिसेनासे झाले आहेत . शंकेखोर मन त्यांच्या घराच्या सदस्या पर्यंत फिरून येत आहे आता ह्या चहावाल्याच्या बातम्या येयाला लागल्या पासून .
ह्या चहा वाल्याचा पूर्वी काय रुबाब होता हो , मलमली पांढरे शुभ्र कपडे , ताज्या आकर्षक फुलांचा व भरजरी कपड्यांच्या कलाकुसरीतून बनवलेला भरजरी शिरेटोप , दिमतीला गण ( भक्त ) आणि गणिका . . . . . देवा . . देवा . . . देवा . . देवा . . देवा . . देवा . .( देवा . . देवा .ह्या वाक्प्रचाराचा अर्थ माहित असेलच )
परंतु ह्या चहा वाल्याच्या खऱ्या काळ्या लीला ( कृष्ण - लीला नाही . . . .समजुन घ्या ) समोर आल्या नंतर ह्यांच्या चेहऱ्यावरचे अफाट तेज अचानक काळवंडले न . मी ह्यांव करीन न मी त्यांव करीन न , अशा फुशारक्या हवेत विरून गेल्या कि मग . खूप मानहानी झाली तरीही ह्याची तेढीच ! . मी निर्दोष आहे म्हणे . एकूण १८ बालहत्या आहेत म्हणे . . लापता व गायब झालेल्या व्यक्ती गायबच आहेत . बळकावलेल्या जमिनी व अनधिकृत बांधकामे हे ह्यांचे भुक्ति आणि मुक्तीचे मार्ग आहेत . साधूला संरक्षणाची काय गरज असते हो ? हेच तर आम्हाला पूर्वापार शिकवण भेटलेली आहे . मग कशाला पाहिजेत ह्यांना हत्यारबंद आयुधे ? . कपट कारस्थाने व षडयंत्र ह्यांचाच इथे जास्त बोलबाला होता म्हणायचं . बापच लिंग - पिसाट तर मुलगा खूप सात्विक असेल कशावरून ?
असो . ह्या चहा वाल्याला आता ३० सप्टेंबर पर्यंत कोठडी वाढली आहे . परंतु ह्याचा आता देवावर विश्वास राहिला नाही . देवाचा धावा करायचे ह्याने आता सोडून दिले आहे . आता ह्याचा कोर्टावर विश्वास बसला आहे . भारत देशात पांढऱ्या चे काळे करण्यात पटाईत असलेल्या एका सराईत वकिलाला ह्याने आता हाताला धरले आहे . ह्या वकिलाला आख्खी न्याय देवता सुद्धा घाबरते असा ह्यांचा वकूब आहे . आता जगण्यातच " राम " राहिला नसल्यामुळे , सगळी प्रतिमाच " मलिन " झाली असल्या मुळे आता एक तेरा सहाराच उरला आहे .
अध्यात्मात " रेटून खोटे " बोलणारे मोठ मोठे लोक असतात हे ह्या चहा वाल्यावरून व त्याच्या दलाल मुलावरून दिसून येत आहे .
खरेच हे सर्व जर सत्य असेल तर ह्यांनी धर्माला बाट लावला आहे . ह्यांच्यामुळे बदनाम झाला आहे . ह्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे . जेणे करून धर्माचे प्रदर्शन करणार्यांना चपराक बसावी व आपण कुणीतरी अवतारी पुरुष आहोत असा संभ्रम लोकांचा नाहीसा व्हावा .
शेवटी समारोप करता करता ह्या दोन चहा वाल्या मध्ये एक साम्य आहे व ते म्हणजे एकाच गवळ्याच्या ( धर्माच्या ) नावावर आपला धंदा तेजीत ठेवीत आहेत . दोघे व त्यांचे समर्थक धर्माच्या नावावर देश वासीयांची दिशाभूल करत आहेत .
आशा आहे धर्माच्या नावावर कुणीही राजकारण करू नये , फसवणूक करू नये , अडवणूक करू नये , व्यभिचार करू नये , अत्याचार करू नये . स्वताला एकमेव तारणहार समजू नये .
आपला देश खूप भारी आहे . इथे खोट्यावर हि प्रेम करणारे आहेत , . . . उघड झाल्यावर त्यांना पायाखाली घेणारे हि आहेत .
समजून घेणाऱ्या नि समजून घ्या .
जय हिंद . . . ज़य भारत . . . .वन्दे मातरम

No comments:
Post a Comment