वडार समाजातील स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! ! !
महाराष्ट्रातील वडार समाजातील उच्च शिक्षित व UPSC व MPSC या स्पर्धा परीक्षा देवू इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यासाठी " वडार समाज संघ , महाराष्ट्र राज्य " या संघटने कडून जाहीर आवाहन ! ! !
वडार समाजातील महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील तरुण जर आपल्या हुशारी व मेहनतीवर राज्य व केंद्र शासनाच्या स्पर्धा परीक्षा देवू इच्छित असेल तर …. व त्याबाबत काही पूर्व तयारी म्हणून पुण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी व सर्व शैक्षणिक साधने व वातावरण असलेल्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छित असेल तर " वडार समाज संघ , महाराष्ट्र राज्य " या आपल्या संघटनेला व " वडार समाज चारीटेबल ट्रस्ट " सामाजिक संस्थेला याबाबत आपले दायित्व व सहकार्य देण्यास खूप आनंद होईल .
उच्चतम कौशल्य प्राप्त करण्यासाठी आज आपल्या वडार समाजातील तरुणांना स्पर्धा परीक्षे शिवाय पर्याय नाही . राज्य सरकार व केंद्र सरकार मध्ये महत्वाच्या पदावर आपल्या समाजाच्या व्यक्ती असायला हव्यात व त्या माध्यमातून देशाची सेवा करता येईलच परंतु आपल्या काही वडार समाज बांधवांचे जीवनमान सुधारण्यास नक्कीच आपण हातभार लावू शकतो .
भविष्यकालीन दूरदृष्टी चा भाग म्हणून वडार समाज संघ आपल्या तरुण सुशिक्षित विध्यार्थ्याकडून खूपच अपेक्षा बाळगून आहे . आज अशा प्रयत्नात वडार समाजात कुठलीही संघटना अथवा संस्था कार्यरत नाही व त्यामुळेच वडार समाज संघाचे हे एक क्रांतिकारी पाऊल समाजाला एक नवीन दिशा दिल्या शिवाय राहणार नाही . वडार समाजाचे बांधव हे कुठल्याही आस्थापनात उच्च पदावर असले पाहिजेत हे आपल्या संघटनेचे अधिकृत धोरण आहे . व संघटनेचे त्या दृष्टीने भविष्यात अजून हि चांगले प्रयत्न होतील .
तूर्त , वडार समाज संघ , अशा स्पर्धात्मक परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी कुणी इच्छुक तरुण असतील तर त्यांना पुण्यामध्ये अगदी माफक दरात राहण्याची व जेवणाची सोय करू शकते . त्यात हि काही अडचण वाटली तर संघटनेतील जबाबदार कार्यकर्ते व हितचिंतक आपल्याला योग्य ती मदत करतील . पुस्तके अथवा लायब्ररी संदर्भात काही अडचणी येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल .
मोठ्या खेदाने इथे असे नमूद करावे लागत आहे कि हे सर्व आपण तूर्त तरी फक्त विध्यार्थ्यांसाठी करू शकतो व मुलीसाठी त्यांच्या राहण्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही त्यात काही करू शकत नाहीत परंतु या विषयावर संघटना भविष्यात नक्कीच ठोस पाऊले टाकील व कुठलाही भेद संघटनेकडून होणार नाही यची काळजी घेतली जाईल . आपल्या संघटनेकडून पुण्यात मुलींचे वसतिग्रह असावे म्हणून प्रयत्न चाललेले आहेत . गोष्टी प्राथमिक अवस्थेत आहेत त्यामुळे त्या विषयी न बोललेलेच बरे परंतु आम्ही महिला व मुलींच्या विषयात गंभीर आहोत .
आपल्या वडार समाजात आदर्श व्यक्ती निर्माण व्हाव्यात व त्यांच्याकडून समाजाला प्रेरणा मिळावी व जो आपला समाज व्यसनासाठी व अंधश्रद्धा या साठी प्रसिद्ध होता ती आपली ओळख मिटावी या साठी वडार समाजातील तरुणांनी मोठ मोठी स्वप्ने उराशी बाळगून , सरकार दरबारी जी कि राजकारणाची सर्व सूत्रे तेथून चालत असतात अशा महत्वाच्या जागावर कार्यरत राहून वडार समाजाची व देशाची सेवा करावी .
वडार समाज संघ , महाराष्ट्र राज्य व वडार समाज चारीटेबल ट्रस्ट आपल्या क्षमतेत व मर्यादेत शक्य ती मदत विध्यार्थ्यांना करण्याचा प्रयत्न करेल .
विध्यार्थी बांधव याचे कसे स्वागत करतील , कसा प्रतिसाद देतील त्यावर भविष्यकालीन दिशा हि ठरली जाईल .
याबाबत अधिक माहितीसाठी , वडार समाज संघाचे मुख्य संघटक श्री राकेश विटकर साहेब व माननीय अध्यक्ष श्री श्रावण रेपणवाड यांच्याशी सरळ संपर्क साधला तरी हरकत नाही परंतु वडार समाज संघाच्या तालुका पातळीवरिल पदाधिकारी व जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्फत जर आपण आलात तर खूप उत्तम राहील व संघटनेला त्या विध्यार्थ्या बद्दल पूर्ण खात्री होईल . पूर्णपणे गंभीर व जबाबदार व्यक्तीनेच याबाबत संपर्क करावा . केवळ माहिती काढण्याच्या उद्देशाने विचारपूस झाली तर आमच्या प्रयतानानाच हरताळ फासल्यासारखे होईल . वडार समाज चारीटेबल ट्रस्ट चे पदाधिकारी अथवा सभासद आपल्या परिचयाचे असतील तर ते हि आपणास याबाबत सहकार्य करतील .
आम्ही वडार समाज संघ , महाराष्ट्र राज्य हे कार्य कुणाबद्दल कुठलाही पूर्वग्रह , कुठलाही आकस न ठेवता करत आहोत . हे म्हणण्याचा हाच उद्देश आहे कि अन्य कुठल्याही संघटने मार्फत वा संस्था मार्फत विध्यार्थी आले तरी ते वडार समाजाचे आहेत म्हणून त्यांचे स्वागतच असेल .
सकारात्मक प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आहोत . काही सूचना सुचवू इच्छित असाल तर त्यांचे हि स्वागत आहे . या विषयातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आवश्यक आहे .
चला एक नवीन वडार समाजाची निर्मिती करूयात , वडार समाजाला प्रतिष्ठा प्राप्त करून देवुयात .
जय बजरंग ! ! !……. जय वडार ! ! !
No comments:
Post a Comment