Friday, February 7, 2014




श्री राकेश विटकर 
मुख्य संघटक 
वडार समाज संघ , महाराष्ट्र राज्य 

मी फेसबुक वर येण्याच्या अगोदर माझा वडार समाजाशी गेल्या ४५ / ४६ वर्षात संबंध फक्त लग्नानंतर सासुरवाडीला गेलो तरच यायचा . अन्यथा माझ्या संपर्कात अथवा मी वडार समाजाच्या संपर्कात अभावानेच आलो असेन . मी फेसबुकवर ठरवून वडार समाजाचे काम करू लागलो . परंतु त्या आधी २००७ / २००८ साली माझ्या ऑफिस मध्ये व नंतर माझ्या घरी आलेले श्री राकेश विटकर हे खर्या अर्थाने तळमळ असलेले एक सच्चे वडार समाज सेवक ( कि संघटक ? ) मला भेटल्याचे जाणवले . आमच्यात त्यावेळी व माझी वडार समाजावर कुणा बरोबर झालेली ती प्रथम चर्चा असावी . 

मला आठवते आहे , मला विटकर साहेबांनी प्रश्न केला होता कि आपल्याला वडार म्हणून वडार समाजच अभिमान पाहिजे म्हणून . मी तेंव्हाही त्यांच्या त्या विधानाशी सहमत नव्हतो , मी कुठल्याच बाजूने वडार समाजाचा नव्हतो परंतु माझी भूमिका सर्व समावेशक होती व मी अध्यात्मिक व पांडुरंगाचा वारकरी / माळकरी असल्यामुळे माझी विचार करण्याची पद्धत वेगळी होती व आज हि आहे . मी विटकर साहेबाना सरळच म्हणालो कि - जातीचा अभिमान असायलाच हवा हे म्हणणे खरे आहे परंतु अभिमान हा त्या गोष्टीबद्दल बाळगला जातो त्यात काही अभिमानस्पद गोष्टी असतील , गौरवपूर्ण घटना व कर्तृत्ववान व्यक्ती समाजात निपजल्या असतील ., मी विटकर साहेबाना सरळच विचारले कि आपण अशा आपल्या वडार समाजातील अभिमानस्पद गोष्टी सांगाव्यात . आपला वस्तीतील वडार माणूस दारू पितो त्याचा आपण अभिमान बाळगायचा का? तो बायकोला मरेपर्यंत मारहाण करतो त्याचा आपण अभिमान बाळगायचा का ? वडार माणसाची भांडणे हे नेहमी उगड्यावर व चावडीत ( पूर्वी ) होतात , त्याचा आपण अभिमान बाळगायचा का ? उघड्यावरचे आयुष्य , उघडी नागडी  मुले , अशिक्षित समाज याचा अभिमान बाळगायचा का ? असे एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार मी त्यांच्यावर केला . परंतु श्री विटकर साहेबांनी अत्यंत संयमाने व संयतपणे माझे समाधान केले होते . 

पुढे मी २०११ पासून फेसबुक माझ्या अध्यात्माच्या आधारावर व फक्त सामाजिक दृष्टीकोन ठेवून वडार समाजात खूपच सक्रीय झालो . इतका कि मला संपूर्ण महाराष्ट्रातील बराचसा वडार समाज ओळखू लागला , वडार समाजातील संघटना व संघटनेचे नेते सुद्धा माझी दखल घेवू लागले . नुकतेच मी " वडार समाज संघ " या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व जन संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे . 

काही लोकांनी ( दोन अथवा तीनच ) मध्ये अशी हूल उठवली कि मी पदासाठी तडफडत आहे व पद मिळावे म्हणून मी काम करत आहे , थोडे विषयांतर होईल परंतु यावर मी थोडा प्रकाश टाकू इच्छित आहे . सर्व प्रथम सगळ्यात जुन्या असलेल्या एका संघटनेने मला त्यांच्या कार्यकारिणीचे सदस्यत्व २०१२ ला देवू केले होते , मी ते नाकारले होते . अजून एक संघटना तिचा आता महाराष्ट्रात खूप बोलबाला आहे व त्या संघटनेसाठी मी निस्वार्थ बुद्धीने खूप काम केले आहे त्यांनी मला महाराष्ट्राच्या कमिटी मध्ये घेतो असा शब्द दिला होता . तो खरा कि खोटा होता मला माहित नाही परंतु मी तशी मागणी केली नव्हती व त्यामुळे त्या पद वाटपाच्या कार्यक्रमालाही मी हजार झालो नव्हतो . राहता राहिली गोष्ट वडार समाज संघाची . या संघाचे प्रदेश अध्यक्ष पद निवडण्याचे अगोदर पासून श्री श्रावण रेपणवाड साहेब व मी  माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होतो व ते माझा खूप आदर करायचे , त्यांना फेसबुक वरील समाज बांधवांची साथ हवी होती व मी त्यातील एक महत्वाचा दुवा होतो हे ते हेरून होते . आज चे पद स्वीकारायचे अगोदर हि गोष्ट ऑगस्ट २०१३ लाच होणार होती परंतु मी काही गोष्टी  श्री श्रावण रेपणवाड साहेबाना स्पष्ट केल्या होत्या कि मी काही राजकीय व्यक्ती नाही व मला माझ्या क्षमता व मर्यादा माहित आहेत आणि मी जबाबदारी घेवून काम करणारा व्यक्ती आहे , एवढेच नाही तर मी त्यांना एक गोष्ट ( वाटेल तर अट म्हणा ) स्पष्टच सांगितली कि या संघटनेतील श्री राकेश विटकर यांचे योगदान मला माहित आहे त्यामुळे मला माझी जबाबदारी देताना तुम्ही प्रथम त्यांच्याशी बोलून घ्या . 

श्री राकेश विटकर यांच्याशी २००७ / २००८ नंतर गाठ भेट झालेली नव्हती व मध्यंतरीच्या काळात त्यांनीही माझ्याबद्दल ऐकले होते , परंतु माझे एकाच म्हणणे होते कि मला संघटनेतील कुणालाही न दुखावता वा कुणाच्याही अधिकाराला धक्का न लागता मला स्वीकारले गेले पाहिजे . परंतु काही कारणामुळे त्या गोष्टी सहा महिन्या पूर्वी जुळून आल्या नव्हत्या . 

तत्पूर्वी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटत आहे कि हि गोष्ट सहजासहजी झालेली नाही . सामाजिक कार्यात कार्यरत असताना व माझ्याकडे एक " वडार समाज चारीटेबल ट्रस्ट "हि सामाजिक संस्था तिच्या पारदर्शक व विश्वासार्थ कार्यामुळे नाव लौकिकाला आलेली असताना मी हे काही प्रमाणात संघटनात्मक राजकीय पावूल टाकणे कितपत योग्य आहे हे ठरवण्यासाठी मी आमचे मोठे भाऊ व समाजाचे जाणकार श्री भरत  विटकर यांच्या बरोबर मी कुठल्याही संघटने बरोबर जावे कि नाही जावे या संदर्भात काही मुद्दे लिहून काढले होते व सर्व जावे तर का जावे ? व का जावू नये ? या मुद्द्यांचा विचार केल्या नंतर आम्ही कुठल्यातरी संघटने बरोबर सलग्न राहायला हवे या निष्कर्षावर आलो होतो . श्री भरत  विटकर साहे यांच्या बरोबर आमचे फोन वरील संभाषण हे रात्री साडे दहा ते साडे बारा वाजे पर्यंत झालेले होते . ( त्याच्या नोट्स माझ्याकडे आहेत . ) . या बाबत श्री भरत  विटकर सरांचे आभार मानाने उचित ठरेल . असो 

जी गोष्ट १५ ऑगस्ट २०१३ च्या आसपास  होणार होती ती गोष्ट २२ जानेवारीला झाली . 

मी श्री राकेश विटकर यांना बर्याच वर्षातून भेटत होतो , मध्यंतरी एकदा धावती भेट झाली होती परंतु ना ते मला विसरले होते ना मी त्यांना विसरलो होतो . दोघानाही एकमेकाबद्दल  आदर कायम होता .

सर्वसाधारण एक गोष्ट अशी असते कि कुणाही व्यक्तीला तो राहतो तिथे अथवा त्याच्या आजू बाजूला पाहिजे तेवढा सन्मान भेटत नसतो , अशा व्यक्ती बद्दल ऐकीव गोष्टीच खूप असतात . मी हि अशीच एक ऐकीव गोष्ट श्री विटकर साहेबाना सांगितली . ( कारण मला सांगणारे , मला भरून देणारे मला भरपूर भेटतात , मी त्यांना तेवढे गंभीरतेने घेत नाही . ) 

त्यांनी मला ८ / १० लोका मध्ये सांगितले , " अहो  दादा , मी माझ्या बायकोचे मंगळसूत्र ठेवून काही कार्यक्रम केले आहेत व तुम्हाला ज्यांनी सांगितले आहे कि त्यांनी मला पैसे दिले होते असे म्हणताय  तर ते साफ चुकीचे आहे . ज्यांना फक्त दुसऱ्याची बदनामीच करायची असते त्यांना त्या शिवाय काही सुचत नाही . " 

आज मी जालना मेळाव्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे . जालना मेळाव्याला जवळ जवळ दीड दोन लाख रुपये प्रसिद्धी पत्रके व धरून खर्च आलेला आहे . त्यातील बहुतांश खर्च हा स्वतः श्री राकेश विटकर यांनी स्वताच्या खिशातून केलेला आहे . रात्र रात्र बाहेर काढली आहेत , महाराष्ट्रातील जिल्हा जिल्ह्याचा दौरा केला आहे , कुठे कमी जास्त आहे ते सांभाळलेले आहे , त्यासाठी आलेला खर्च वेगळाच . तो त्यांनीही गृहीत धरलेला नाही व अन्य ज्यांचा दूर दूरचा संबंध येत नाही ते तरी कशाला धरतील ? 

समाज कार्य करणे वाटते तितके सोपे नाही , इथे टीका करणे सर्वात सोपे आहे . श्री राकेश विटकर साहेब हे अगदी तरुण वयापासून १९९४ च्या मेळाव्यापासून वडार समाजाशी संघटनात्मक पातळीवर जोडले गेले आहेत . त्यांच्या सारखा अनुभव पाठीशी असलेले आज शोधून सापडणार नाहीत . अनुभव असलेल्यांनी " हाय " खावून माघार घेतलेली आहे . ते आता फक्त पडद्या अदच्य गप्पा झोडण्या पुरते उरलेले आहेत परंतु समाजासाठी नाउमेद न होता , कुठलाही प्रकाश झोत स्वतावर न घेता समाजाचे कार्य करत राहणारे श्री राकेश विटकर हे दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे . 

श्री राकेश विटकर यांच्या क्षमते विषयी व त्यांच्यात असलेल्या अंगभूत काही गुणामुळे ते कुठल्याही मंत्र्यांना , मोठ्या अधिकार पदावरील व्यक्तीला सहज भेटू शकतात , आपले म्हणणे कुठल्याही विपरीत परिस्थिती मध्ये अत्यंत हिकमतीने मांडण्याची त्यांची कला अजबच आहे . त्यांना प्रशासकीय व सरकारी कागद पत्रांचा खेळ खूप चांगला जमत आहे . अशी कागद पत्रांची मांडणी करणारे आपल्या वडार समाजात खूप कमी व्यक्ती आहेत . सरकार दरबारी वडार समाजाची लढाई यशस्वी पाने लढायची असेल तर खरेच श्री राकेश विटकर यांना पर्याय नाही . 

ज्या काही घडामोडी मी वडार समाज संघ या संघटनेत आल्या नंतर मला दिसत आहेत त्यावरून मला पुढील पाच वर्षात शासकीय पातळीवरून वडार समाजासाठी खूप भरीव कार्य झालेले दिसेल असा मला स्वताला आत्मविश्वास आहे . 

आज च्या दुनियेत कुणाचीही ओळख त्याचे प्रोफाईल पाहून होत असते . श्री राकेश विटकर यांनी १९९४ पासून केलेले कार्य व त्याचे पुरावे म्हणून त्यांच्याकडे असणारे फोटो व कागदपत्रे पहिले कि वाटते असा व्यक्ती सध्या तरी वडार समजत एकमेव असावा . 

मला संघटक या शब्दाचा अर्थ कळतो परंतु वडार समाज संघ या संघटनेतील संघटक म्हटले कि मला त्याचा अर्थच काळात नाही . लोक अध्यक्ष म्हणून मिरवतात ( मी हि त्यातलाच अपघाताने ) , कुणी अन्य नावाने मिरवतात व आपले विटकर साहेब हे संघटक म्हणून मिरवतात . किती लोकांना संघटक म्हणवून घ्यायला आवडत असेल कुणास ठावूक ? सर्व पदाधिकार्यांना सन्मान देवून , सर्वांचा मान  राखून संघटनात्मक कार्य करण्याचे वित्कर साहेबांचे कौशल्य अजबच आहे . 

वडार समाज संघाची स्थापना करण्यात श्री राकेश विटकर साहेबांचा सिंहाचा वाटा आहे व त्याचे मुख्य ऑफिस हि पुण्यातच आहे . 

श्री राकेश विटकर साहेबांच्या अनेक कार्याची मला खास ओळख करून द्यायची आहे . त्यांचे एक कार्य त्यांच्याच बाकी अनेक कार्यावरून ओवाळून टाकाव्यात असे आहे . त्यांचे ते कार्य ऐकून महाराष्ट्रातल्या वडार तरुणांना नक्कीच अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही . 

तूर्त थांबतो . पुढील वेळी प्रत्यक्ष श्री विटकर साहेबांच्या कार्या बद्दलच चर्चा करूयात . 

जय बजरंग जय वडार 

No comments:

Post a Comment