Tuesday, February 11, 2014

" वडार समाज " व " भटके - विमुक्त समाज " ह्यांच्या बद्दल त्यांचे स्पष्ट व निर्धारित धोरण




September 17, 2013 


काल नरेंद्र मोदींच्या पोस्टवरून आपल्या समाजातील बऱ्याच वडार समाज बांधवांच्या चांगल्या / वाईट प्रतिक्रिया आल्या . काहींनी माझ्या हेतू बद्दल शंका घेतली परंतु माझ्या दृष्टीने मी वडार समाजात अशा पद्धतीने चर्चा घडवून आणण्यात यशस्वी झालो ह्यात समाधानी आहे . असे वडार समाजात ह्या पूर्वी कधी झाले असेल असे मला वाटत नाही कारण तशी मानसिकता व व्यासपीठ उपलब्धच नव्हते . असो

मी विश्व हिंदू परिषद ला १९८० च्या काळापासून पाहतोय . " अखंड हिंदुस्थान " हि त्यांची कल्पना तेंव्हा बालमनाला खूप सुखावणारी होती . त्यांचे पत्रक , बुक लेट्स , , अखंड भारताचा नकाशावर " भारतमातेचा " फोटो हि आम्ही त्याकाळी प्रथम पहिला होता . पुढे " राम मंदिराचा " विषय आला . RSS चे प्रचारक अक्षरश गावोगावी प्रचार करत फिरायचे . श्रे अशोक सिंघल हे नाव खूप भारी वाटायचे . त्याकाळी अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी हे दोघेच फर्डे वक्ते म्हणून नावाजलेले होते . बाकी बाळासाहेब देवरस व अन्य RSS चे अन्य अध्यक्ष हि खूप विद्वान होते . अशातच श्री राम मंदिराचा मुद्दा खूप संवेदनशील होऊ लागला व अडवाणी ह्यांची ९० च्या आस पास रथ - यात्रा निघाली ह्या दरम्यानच श्री प्रमोद महाजन , नरेंद्र मोदि हे राष्ट्रीय पातळीवर नावे चमकू लागली .

संसदेतील रटाळ कामकाज खर्या अर्थाने मंत्रमुग्ध होवून पाहायला व ऐकायला ह्या देशाला कुणी शिकवले असेल तर ते श्री अटलबिहारी वाजपेयी ह्यांनी . त्यांना जोड होती हजरजबाबी व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या प्रमोद महाजन ह्यांची . ( बाकीचे हि होते . . परंतु ध्यान आकर्षित करून घेणारे हे खरे दोघेच ) . अशातच श्री नरेंद्र मोदींचे नाव अधून मधून ऐकायला मिळायचे . ते तेंव्हा संघटनात्मक कार्यात व्यस्त असायचे व कुठलाही फोकस आपल्यावर असावा असा त्यांचा स्वभावात : पिंड नसावा . दिलेले काम व्यवस्थित तडीस न्यावे हेच त्यांचे काम असायचे .

गुजरात ची शासन राजवट "तिथल्या पटेल " ह्यांच्याकडेच असायची ९० च्या अगोदर कॉंग्रेस प्रणीत सरकारच बहुमताने तिथे असायची . ९० नंतर एक पंच वार्षिक कॉंग्रेस व दुसरी पंच वार्षिक भाजपा असा सिलसिला चालू असायचा . केशुभाई पटेल , शंकर सिंग वाघेला ( हे आता कॉंग्रेस वासी आहेत ) ह्यांचा भाजपा चा सत्ता संघर्ष टिपेला गेल्यामुळे दिल्लीच्या राजकारणात महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असलेले संघटनात्मक कार्यात मश्गुल असलेले परंतु निवडणुक न लढलेले नरेंद्र मोदि हे दिल्लीवरून गुजरात वर लादले गेलेले मुख्यमंत्री होते .

नरेंद्र मोडी हे त्यांना दिलेली वा सोपवलेली जबाबदारी किती निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पडतात ह्याचे सरळ साधे उदाहरण म्हणजे त्यांनी फक्त गुजरात वरच नंतर लक्ष केंद्रित केले व कधीही पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणात लुडबुड केली नाही . देशातील त्यांचे विरोधक , काही तथाकथित विचारवंत " गोध्रा - कांड " सोयीस्कर रित्या विसरतात व " गुजरात दंगली " चा इश्यू करतात . परंतु नरेंद्र मोदि हे एवढे " खमके " आहेत कि ते आपल्या परंपरागत विरोधकांना तर नेस्तनाबूत करतातच परंतु पक्षांतर्गत विरोधकानाही पुरून उरतात . ह्याचेच ढलधळीत उदाहरण म्हणजे त्यांनी तीन पंचा वार्षिक निवडणुका पक्षाच्या हिमतीवर नाही तर स्वताच्या कार्य करिष्म्यावर निवडून दाखवल्या आहेत . तरीही ते टीकेचे लक्ष्य होत आहेत .

आज श्री नरेंद्र मोदि ह्यांचे सादरीकरण ( presentation ) , त्यांची दूरदृष्टी ( vision ) , त्यांच्याकडे असलेले आकडेवारी ( statistics ) व त्यांचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यांची प्रशासनावर असलेली पकड हे खरोखरीच पुढे जावून अभ्यासाचे विषय ठरतील . प्रशासनावर पकड ह्याचा अर्थ " हम बोले सो कायदा " असा विचित्र अर्थ विरोधक काढतील परंतु त्याचा खरा अर्थ त्यांनी प्रशासना मध्ये जागवलेला विश्वास हा आहे व त्यामुळे त्यांनी सर्वांचीच कार्यक्षमता वाढण्यास मदत झालेली आहे .

आज गुजरातच्या प्रगतीचे ढोल वाजत आहेत , त्यात गैर काय आहे ? मुबलक वीज आहे , प्रशस्त व त्यांचे समर्थक म्हणतात तसे चकाचक रस्ते आहेत , मुबलक पाणी आहे , जगातील सर्व भागातून गुंतवणुकीचा गुजरातकडे ओघ सुरु आहे , मोठ मोठे उद्योग तिथे येत आहेत , तसा विश्वास निर्माण करण्यात मोदि यशस्वी झालेले आहेत . शिक्षणावर व शिक्षकावर विशेष लक्ष देवून तिथे प्रगती साधली आहे , मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष्य दिले जात आहे , पर्यटनावर विशेष लक्ष देवून गुजरातचा स्वाभिमान व नाव जगभर पोहचेल ह्याची काळजी घेतली जात आहे . तंत्रज्ञानावर विशेष भर देवून विकास साधला जात आहे . जागतिक दर्जाचे औद्योगिक व कृषी विषयक प्रदर्शने भरवली जात आहेत , अशा कामाला मोदी सहकार्य व प्रोत्साहन देत आहेत , एक माहितीवर आधारित असे त्यांनी विद्यापीठ च स्थापन केले आहे ( नाव आता आठवत नाही ) . .

असे एक न अनेक कार्ये गुजरात मध्ये चालू आहेत . ह्याच त्यंच्या कार्यामुळे आज देशभर श्री नरेंद्र मोदी हे नाव भारताचे भविष्य म्हणून गाजत आहे . त्यांच्या नावामुळे भाजपा ला एक नवा चेहरा मिळालेला आहे . आज अटल बिहारी बाजपेयींच्या वृधत्वामुळे , प्रमोद mahajan hyanchya अकाली जाण्यामुळे व अडवाणींच्या " जिना - प्रकरणामुळे " भाजपा ची अवस्था कुपोषण ग्रस्त मुलासारखी झालेली होती . श्री मोदींच्या येण्याने समाजातील सर्व थरातून त्यांना पाठिंबा व्यक्त होत आहे .

लोक कॉंग्रेस ला पुरते विटले व वैतागलेले आहेत , लोक भाजप कडे एक पर्याय म्हणून बघत होते परंतु अडवाणींचा म्हतारचळ अजून गेलेला नाही . अटलबिहारी वाजपेयींना सुद्धा ह्यांनी कमी त्रास दिला नव्हता . ह्यांच्या बद्दल खूप आदर होता . त्यांनीच स्वत तो घालवून घेतला आहे . अशा राजकीय धांदलीत कॉंग्रेस स्वैर पणाने वागत आहे / होती . " मी नाही त्यातली " असे म्हणत म्हणत खपाखप भ्रष्टाचाराचे मोठ मोठाले गफले सहजी पचवत होते . वरून " करून सावरून " पतिव्रतेच्या " गोष्टी करत होती . अजून हि कॉंग्रेसला वाटते आहे ती खूप सोज्वळ , नाकासमोर चालणारी व आपले चारित्र्य सांबाळून राहणारी आहे परंतु हि " कैदाशीण " पार स्विस बँकेत आपले तोंड काळ करून आलेली आहे , स्थानिक घोटाळये नि तर हि अगदी बरबटलेली आहे . पण हि कॉंग्रेस व तिचे साथीदार आहेत खूप मस्तवाल , राजकारणात कुठल्या थराला जातील सांगता येत नाही असो .

वडार समाज बंधुनो , मुद्दा इथून पुढे सुरु होत आहे , आपल्याला एक समाज म्हणून कुठल्याही पक्षाचे वावडे नाही व नसावे . व्यक्ती म्हणून कुणाचा द्वेष करण्याचेही कारण नाही . व असा द्वेष कुणीही करू नये . विरोध " विचाराला " असावा परंतु " विचाराच्या आडून " वार करू नये , तसे राजकारण करू नये .

आज ६६ वर्षे झाले आपल्याला स्वतंत्र मिळून . आपल्यातले वडार समाजाचे काही लोक स्वताच्या कष्टाने अनंत हाल अपेष्टा सहन करत शिकले आहेत , सावरले आहेत , अन्य समाजाच्या प्रवाहात सामील होत आहेत तिथे हि आपली ओळख " वडार " अशीच आहे . परंतु मी धाडसाने असे म्हणतो कि हे शिकालेल्यांचे प्रमाण हे २५% च्या वर नसावे . मग आपला ७ ५ % वडार समाज हा अजून हि शहरात झोपडपट्टीत व गावखेड्यात पालात , उघड्यावर राहत आहे . अजून हि आपल्याकडे स्थानिक रहवासी दाखल्यासाठी फिर फिर फिरावे लागत आहे , कितीतरी लोकाकडे अजून रेशन कार्ड नाहीत , मतदान कार्ड नाहीत , आधार कार्ड नाहीत . कितीतरी लोक अजून अंधारात रात्र काढत आहेत , कितीतरी लोक अजून आजार अंगावर काढून अकाली मरत आहेत , कितीतरी जणांना अजूनही जाळण्यासाठी लाकूड फाटाहि उपलब्ब्ध होत नाही , कितीतरी जणांचे लग्न लवकर जमत नाहीत , कितीतरी हाताना अजून काम नाही , हाताला काम नसल्यामुळे कितीतारी लोक गैर - कृत्य करण्यात मश्गुल आहेत . कितीतरी आमच्या बहिणी जवानीतच विधवा झालेल्या आहेत . कितीतरी वृद्ध मरण येत नाही म्हणून कर्माला नावे ठेवून दिवस कंठत आहेत
.आपल्या देशाने एवढी प्रगती केली आहे मग हे आमचे हाल का आहेत ? ? ? . . हि कुठली शासन व्यवस्था आहे ? ? ? ? ? ? ?

हि कुठली शासन व्यवस्था आहे ? ? ? ? ? ? ? . . . चकाचक रोड काय चाटायचे आहेत काय ? विकासाच्या गप्पा मारून , दुरून सुंदर देखावे दाखवून आपले जीवन सुधारणार आहे काय ? ? ? स्वताचे भागले म्हणून जगाचे पोट भरले असे होत काय ? ? ? अरे चकाचक रोड हवा आहे कि आपल्या वडार समाजाचे जीवन मान सुधारायला पाहिजे ते सांगा ? ? ? किती वर्षे , अजून किती वर्षे ह्या हरामखोर राजकारण्यांच्या " गमज्या " वर विश्वास ठेवत बसणार तुम्ही ? ? ? चोराला चोरू द्यायचे व बलात्कार्याला बलत्कार करू द्यायचा , आपण निमुटपणे सहन करत बसायचे , नाही का ? ? ?

ह्या वडार समाजाला स्वताचा असा मान , अभिमान , स्वाभिमान आहे कि नाही ? ? ?

वडार समाज बंधुनो , भाजप हा पक्ष उच्च वर्णीय लोकांचा पक्ष आहे , हे पटत असेल तर मी पुढे चालतो , इथे " नागपूर " चा आदेश चालतो, नव्हे नव्हे तो आदेश बंधनकारकच असतो . तिथे काही अपील नसते . माझ्या माहितीतील २ /३ तालुका अध्यक्ष आपल्या समाजाचे आहेत . परंतु ह्याच्या पुढे ते आपल्याला स्थान देणार आहेत का ? ? ? . . . माझे काही आक्षेप आहेत . ते मी पुढे मांडतो . . .

१ ) भाजपा मध्ये आरक्षणाला विरोध करणारे खूप लोक आहेत . मंडल / कमंडल हा वाद आठवून पहा . . . .OBC ला विरोध कोण करत आहे ? . . . . . तुम्हाला काय वाटते भाजपा सत्तेत आल्यावर हे लोक गप्प बसतील ?

२ ) भाजपा मध्ये विवेकानंद ह्यांना अभिप्रेत हिंदू धर्मा पेक्षा " सनातन " हिंदू धर्माला मानणारे लोक जास्त आहेत , शस्त्रे , हत्यारे , व अतिरेकी विचारसरणी व भडकावू भाषणे करणारे आहेत व ह्यांचे गुप्त इरादे असतात . नरेंद्र दाभोलकरांचे उदाहरण समोर आहे . . . . . तुम्हाला काय वाटते भाजपा सत्तेत आल्यावर हे लोक गप्प बसतील ?

३ ) भाजपा हा पक्ष शहरी विचारसरणी चा पक्ष आहे , त्यांचे " शायनिंग इंडिया " चालते , विविध तन्द्रज्ञान वापरून खरे खोटे आकडे समोर मांडून " आकडेमोडीचा " खेळ करण्यात हे लोक खूप पटाईत आहेत , पटवून देण्यात हे कुणालाच ऐकत नाहीत व आपला हेका सोडत नाहीत . . . . . . . . . बहुजन समाज व मागासलेल्या समाजाचे हे उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करतील असे आपल्याला खरोखरच वाटते ?

४ ) आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो व आपण हि सर्व विविध धर्माचे लोक एकमेकांच्या धर्माचा आदर करून एकत्रितपने राहतो . . . . . परंतु " आसाराम " सारख्या ताज्या प्रकरणामध्ये फक्त हिंदू म्हणून हे लोक अशा लोकांना पाठीशी घालणार नाहीत कशावरून ? ? ? ( ताजा संदर्भ : राम जेठमलानी ह्यांनी ह्यांचे वकील पत्र घेतले आहे )

असो . . . अजून हि काही मुद्दे आहेत परंतु मला समाजाशी संदर्भातच बोलायचे आहे .

बंधुनो , वडार समाजात राजकीय व्यक्ती प्रत्येक पक्षात आहेत , परंतु ते त्यांच्या स्व हिमतीवर आहेत , संपूर्ण महाराष्ट्रातील वडार समाजाचा एका पक्षातील अमुक एक नेता म्हणून असे सांगता येणार नाही . तसे अद्याप झालेले नाही हे आपले दुर्दैव आहे .

आपल्याला वडार समाज ह्या नावाने अद्याप राजकारण करताच आलेले नाही . बंधुनो ते करता आले पाहिजे . संपूर्ण समाजाची एक मागणी हवी .

प्रत्येक पक्षात आपल्या समाजाचे लोक आहेत तसे ते राहतील . प्रत्येकाची एक विचारसरणी असते व प्रत्येकाला आदरणीय असा राजकीय नेता हि असतो . परंतु आपण विभागले गेलो आहोत ह्याचा अर्थ असा नाही कि आपण सर्वांनी एका पक्षाला समर्थन द्यावे असे मी सांगत आहे परंतु . . . .

प्रत्येक पक्षाला आपल्या " वडार समाज " व " भटके - विमुक्त समाज " ह्यांच्या बद्दल त्यांचे स्पष्ट व निर्धारित धोरण त्यांचा कडून वदवून घेतले पाहिजे .

२ ० १ ४ चे पडघम वाजू लागले आहेत . राजकीय वातावरण दिवसे दिवस तापणार आहे , मी हि एका एका पक्षाला व त्यांच्या नेत्याला टार्गेट करणार आहे . आमच्या " वडार समाजाचा " आपण काय विचार केला आहे ? ? ? हा प्रश्न खुले आम विचारणार आहे ? त्यांना ह्याची दखल घ्यावीच लागणार आहे कारण आम्ही हि त्यांच्या पक्षाला मानणारी माणसे आहोत .

जो पक्ष खुले आम समोर येवून समाजाला व समाजाच्या प्रश्नांना सकारात्मक राहील मला आशा आहे समाज हि त्यांना साथ दिल्या शिवाय राहणार नाही . परंतु मला हा आवडतो व मला तो आवडत नाही हि नेभळट भूमिका समाजाच्या हिताची नाही .

हे सर्व सामान्य वडार बांधवासाठी आहे , वेगवेगळ्या पक्षाशी संबंधित आहेत त्यांनी त्यांना योग्य वाटते तसे करावे व समाजहित साधावे .

शेवटी नरेंद्र मोदींना माझा वैयक्तिक विरोध असण्याचे काहीच कारण नाही , त्यांच्या भाषणाचा व विषय मांडण्याच्या त्यांच्या पद्धतीचा मी हि चाहता आहे . खरे तर हा खरेच बब्बर शेर आहे . ह्या माणसाला किती विरोधक आहेत परंतु खरेच ह्यांच्याकडे जिगर आहे .

वरील आमच्या काही शंकांचे त्यांनी अथवा त्यांच्या पक्षाने " खुले - आम " खंडन करावे व वडार समाजाला सहकार्य करू असा आम्हाला जाहीर शब्द द्यावा . आमचे बरेचसे वडार समाज बांधव श्री नरेंद्र मोदि ह्यांना पंतप्रधान पदी असावेत म्हणून आसुसलेले आहेत , आशावादी आहेत , त्यांना ही तुम्ही भ्रमनिराश करणार नाहीत अशी भाजपा कडून अपेक्षा .

ताजा कलम : सर्व पक्षीय लोकासाठी , महाराष्ट्रामध्ये वडार समाज हा प्रत्येक जिल्ह्यात असून समाजाची लोक संख्या हि अंदाजे सुमारे ४५ लाख ते ५० लाखाच्या आसपास असावी . काही लोक ७० / ७५ लाख म्हणतात .

वडार समाज व सर्व भटके - विमुक्त समाज हे मिळून महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बिघडवू शकतात त्यामुळे ह्या पुढे जास्तीत जास्त समाजाच्या मागण्या व आमचा जीवनस्तर सुधारण्यासाठी राजकीय पक्षाकडून प्रयत्न व्हावेत .

सुज्ञास व मुत्सद्धी लोकांना जास्त सांगावयाची गरज नाही .

जय बजरंग ! ! ! . . . . . . जय वडार ! ! !
 

No comments:

Post a Comment