५ ; ५८ ...........१७ /५ /२०११ .......मंगलवार
जिकडे पाहे तिकडे , तू ही दिसशी
चित्ताच्या देव्हार्यात तूच असशी
बुध्दिच्या दात्या,......ध्यानाच्या ध्यात्या
सत् चित्त स्वरूपा , चिद घन आनंदा
उत्पत्तीच्या कारणा , जगत प्रति पालका , अंति तूची विनाशका
आदि ॐ बिज तूची असशी
संचित , प्रारब्ध , आणि क्रियामानाचे " कर्म " तूची
भुत , भविष्य , आणि वर्तमाना चा " काळ " तूची
सत्वगुण , रजोगुण आणि तमोगुनांचा "गुण " तूची
जाग्रति , स्वप्न आणि सुषुम्ना ह्या " अवस्था " ही तूची
परा , पश्यन्ति , मध्यमा आणि वैखरी ह्या " वाणी " ही तूची होशी
( सर्वत्र असुनही त्याहूनही परता तूची असशी )
आकाश , वायु , अग्नि , जल आणि पृथ्वी हे " तत्व " ही तूची
तिन गुणांचा स्वामी अणि दहा इद्रियांचा " ज्ञानी " तूची
सत्य ही तूच , तूची असे आनंद .....चैतन्य ही तूच ...तूची असे ब्रह्मानंद
मूलाधार स्थित तुझी समाधी ,....जानू ना शकले पंडित , मौलवी अणि पाखंडी
" अमर " गळा घालुनी तुलसीची माला
करी नाम-चिंतन श्री-हरिचे , रात्र -दिनी निजध्यानी जपुनी
दगड मूर्त्या पुजिल्या ,
ज्ञानी माणसे पुजिले ,
ज्ञानी माणसे पुजिले ,
डोंगर चढलो ,
गंगेत न्हालो ,
फुले वाहिली ,
पारायणे केली
गंगेत न्हालो ,
फुले वाहिली ,
पारायणे केली
तरीही तुझा शोध संपलाच नाही
श्री गुरु-चरणाला शरण आलो
बध्द होतो ,...
स्वस्वरूपी विसावलो
( बध्द आत्म्याला स्व-स्वरुपचे ज्ञान झाले ..सत्य उमगले ...)
5 : 58 ............17/5/2011
No comments:
Post a Comment