संघटनात्मक कार्य करू इच्छिणाऱ्या वडार समाज बांधवा साठी " कुसाळकर ब्रदर्स " यांच्याकडून काही मार्गदर्शक तत्वे .
वडार समाज संघ व वडार समाज चारीटेबल ट्रस्ट च्या कार्यकर्त्यांना जे सामाजिक कार्यात कार्यरत राहू इच्छितात , संघटनेचा विचार करतात . आपल्या वडार समाजाची चांगली संघटना व्हावी असे ज्यांना वाटत आहे त्यांनी एक खूप महत्वाचे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे ते म्हणजे ----
" प्रत्येक कार्याला / कामाला कार्यकर्ता असायलाच हवा व प्रत्येक कार्यकर्त्याला नेमून दिलेले कार्य / काम हे असायलाच हवे . "
दुसरी एक खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे - - -
" संघटनेत / संस्थेत येणारा प्रत्येक जण हा तावून सुलाखून व समाजोन्मुख धडा घेवून तयार झालेला कार्यकर्ताच असावा व त्यानंतरच त्याला कुठलीही जबाबदारीचे पद दिले जावे व त्या कार्यकर्त्याला त्याच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव असायला हवी , "
संघटनात्मक कामात " संघटनेचे हित " याला प्राथमिकता असायला हवी , असे असले तरी प्रत्येकाने माणूसपण हे टिकवून ठेवलेच पाहिजे .
संस्थेत / संघटनात्मक कार्य करत असलेल्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक समाज बांधवांच्या घरी जाण्याचा अभ्यास ठेवला पाहिजे . लोकांना संघटनात्मक पातळीवर जोडण्यासाठी त्यांच्या पोटात शिरून प्रत्येकाशी मनमोकळे पणाने संवाद साधला पाहिजे व कुणी कितीही अडाणी , सदोष समाज बांधव असला तरी सदैव त्याला मदतीची भावना ठेवली पाहिजे .
संघटनात्मक जबाबदारी तून कार्यकर्ता निर्माण होवून त्या समाज बांधवाची कार्य करण्याची क्षमता , त्याची प्रतिभा यांचा विकास झाला पाहिजे . समाज बांधवाचा हर प्रकारच्या कामात सहभाग वाढला पाहिजे तसेच त्या समाज बांधवाला एक जीवन दृष्टी प्राप्त झाली पाहिजे हा हि शुद्ध हेतू असायला हवा .
अशा संघटनात्मक जडण घडणी तून खरा वडार समाज बांधव घडला पाहिजे , खरा कार्यकर्ता घडला पाहिजे , त्याच्यात असलेला राग - लोभ , रुसवा - फुगवा , आवड - निवड , स्वार्थ - अहंकार , यांचा नाश व्हायला हवा व त्याने पूर्णत समाजाभिमुख होणे गरजेचे आहे . असे झाले तरच पुढील नेतृत्वावरून अहंकाराच्या गोष्टी घडणार नाहीत व समाज हित प्रथम हे व्रत आचरता येईल .
कार्यकर्ता हा सदैव समरसून कार्य करणारा हवा , सम विचारी हवा , सुसंवादी हवा , सहकार्याचे तत्व स्वीकारलेला हवा . आपण एकटे सर्वज्ञानी व सर्वकार्य करू शकतो असा अहंकारी विचार कधीही मनाला शिवत| कामा नये तर " आपण एक अपूर्णांक आहोत व वडार समाज बांधवांच्या पूर्ण प्रगती शिवाय आपल्याला पूर्णत्व नाही " हे मनात चांगले ठसवायला हवे .
संघटने मध्ये काम करत असताना वैयक्तिक जबाबदारी व सामुहिक जबाबदारी हि कधीही टाळू नये . असे केल्याने संपूर्ण संघटनेला त्याचे परिणाम भोगावे लागतात हे कधीही लक्षात ठेवले पाहिजे .
संघटनेत कार्य करताना विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन हा ठेवलाच पाहिजे तसेच प्रत्येक धर्माचा आदर हि करता आला पाहिजे . एवढे सगळे करून आपल्या अंतर्मनाचा आवाज हि ऐकता आला पाहिजे म्हणजेच अध्यात्मिक बैठक हि असायलाच हवी .
कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्राच्या , अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा म|न राखला पाहिजे , भारतीय लोकशाहीचा आदर राखला पाहिजे . भारतीय घटने बद्दल त्याला निस्सीम प्रेम व आदर पाहिजे व त्याच्या रक्षणासाठी त्याने सदैव तत्पर राहिले पाहिजे .
संघटने मध्ये काम करताना सामुहिक निर्णय प्रक्रियेला अनन्य साधारण महत्व असते व तो एक संघटनेचा निर्णय प्रक्रिये मधील महत्वाचा भाग असतो त्यामुळे झालेल्या सामुहिक निर्णयाचा स्वीकार करणे हे सर्वावर बंधनकारक असते व तो स्वीकार कधी कडू असला तरी समाज हित म्हणून तो स्वीकारायला हवा व सामुहिक निर्णय म्हणून त्याचे दायित्व हि स्वीकारायला हवे .
आपल्या संघटने मुळे केवळ आपल्याच नाहीतर अन्य कुठल्याही समाजाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान , हानी , मानहानी होता कामा नये याचे भान असायला हवे .
संघटनेची भूमिका हि वाहत्या पाण्याच्या प्रवाहासारखी असायला हवी . पाण्याचा प्रवाह आपल्या वाटेने पुढे जात असतो व मध्येच एखादा खळगा / खड्डा लागला तर तो खळगा भरून नंतरच पुढे मार्गक्रमण करतो त्या प्रमाणे संघटनाने सर्व सामान्य समाज बांधवांचे दुख दूर करूनच पुढे मार्गक्रमण केले पाहिजे ,
संघटन हे ज्या समाजात सामाजिक एकता व सामाजिक समरसता आपसूकच आलेली असते त्यांच्यात लवकर व शिस्तबद्ध रित्या होते परंतु एकता व समरसता हे गुण नसलेल्या समाजात यावर खूप मेहनत व कष्ट घ्यावे लागतात . वडार समाजात या वर खूप चिकाटीने काम करण्याची गरज आहे . म्हणून संघटनेतील कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करणे गरजेचे आहे .
वडार समाज संघटना मध्ये कार्य करणाऱ्या वडार समाज बांधवानी " सामाजिक जाणीवा " निर्माण करून सर्व वडार समाज आरक्षण , सरकारी सवलती , मिळणाऱ्या सुविधा यांची सर्व - सामान्य समाज बांधवाना ओळख करून द्यावी . सगळीकडे सर्व समाजात सरकारी योजना व त्यांची अंमलबजावणी करून द्यावी म्हणजे आपल्या समाजाचा जीवनस्तर सुधारण्यास खूप मदत होईल .
आणखी काही मुद्दे परत कधी तरी …….
जय बजरंग . . जय वडार
— वडार समाज संघ व वडार समाज चारीटेबल ट्रस्ट च्या कार्यकर्त्यांना जे सामाजिक कार्यात कार्यरत राहू इच्छितात , संघटनेचा विचार करतात . आपल्या वडार समाजाची चांगली संघटना व्हावी असे ज्यांना वाटत आहे त्यांनी एक खूप महत्वाचे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे ते म्हणजे ----

No comments:
Post a Comment